पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील 7600 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार
October 08th, 07:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील 7600 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील.स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2023 च्या महाअंतिम फेरीतील सहभागींसोबत झालेल्या संवादात पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन
December 19th, 11:32 pm
खरेच तुम्हा सगळ्यांशी बोलून खूप छान वाटले . देशासमोरील सध्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी देशातील तरुण पिढी अहोरात्र काम करत आहे ,याचा मला आनंद आहे. आधीच्या हॅकॅथॉनमधून मिळालेले उपाय खूप प्रभावी ठरले आहेत. हॅकॅथॉनमध्ये सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी स्वत:चे स्टार्टअपही सुरू केले आहेत. हे स्टार्टअप्स, हे उपाय सरकार आणि समाज दोघांनाही मदत करत आहेत. आज या हॅकॅथॉनमध्ये सहभागी झालेल्या संघांसाठी आणि हजारो विद्यार्थ्यांसाठी ही मोठी प्रेरणा आहे.स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2023 च्या महाअंतिम फेरीमधल्या स्पर्धकांना पंतप्रधानांनी केले संबोधित
December 19th, 09:30 pm
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2023 च्या महाअंतिम फेरीमधल्या स्पर्धकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि त्यांना संबोधित केले.पंतप्रधान 19 डिसेंबर रोजी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2023 च्या महाअंतिम फेरीमधील स्पर्धकांशी साधणार संवाद
December 18th, 06:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 डिसेंबर 2023 रोजी रात्री 9:30 वाजता स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2023 च्या महाअंतिम फेरीच्या स्पर्धकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत. यावेळी पंतप्रधान स्पर्धकांना मार्गदर्शन करतील.राजस्थानमधल्या जोधपूर येथे विविध प्रकल्पांच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण.
October 05th, 11:54 am
मंचावर उपस्थित राजस्थानचे राज्यपाल श्री कलराज मिश्रा, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि या भूमीचे सेवक भाई गजेंद्र सिंह शेखावत, कैलाश चौधरी, राजस्थान सरकारचे मंत्री भाई भजनलाल, खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. सी.पी. जोशी, आमचे इतर खासदार, सर्व लोकप्रतिनिधी, आणि सभ्य स्त्री-पुरूषहो!पंतप्रधानांच्या हस्ते राजस्थानमधील जोधपूर येथे सुमारे 5000 कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण
October 05th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील जोधपूर येथे सुमारे 5000 कोटी रुपयांच्या रस्ते, रेल्वे, विमान वाहतूक, आरोग्य आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. पायाभरणी झालेल्या प्रकल्पांमध्ये एम्स जोधपूर येथे 350 खाटांचे ट्रॉमा सेंटर आणि क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉक, पीएम-एबीएचआयएम अंतर्गत 7 क्रिटिकल केअर ब्लॉक, आणि जोधपूर विमानतळावर नवीन टर्मिनल इमारतीचा विकास यांचा समावेश आहे. त्यांनी आयआयटी जोधपूर संकुल आणि राजस्थानच्या केंद्रीय विद्यापीठाला अद्ययावत पायाभूत सुविधांचे लोकार्पण केले. त्यांनी अनेक रस्ते विकास प्रकल्पांची पायाभरणी केली आणि 145 किमी लांबीच्या देगना-राय का बाग, आणि 58 किमी लांबीच्या देगना-कुचमन सिटी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासह इतर दोन रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण केले. मोदी यांनी जैसलमेर ते दिल्लीला जोडणाऱ्या रुनिचा एक्सप्रेस आणि मारवाड जंक्शन - खांबळी घाटला जोडणाऱ्या नवीन हेरिटेज गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.पंतप्रधानांनी गुजरातमधील अहमदाबाद येथील सायन्स सिटीला दिली भेट
September 27th, 02:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील अहमदाबाद येथील सायन्स सिटीला भेट दिली. त्यांनी रोबोटिक्स गॅलरी, नेचर पार्क, एक्वाटिक गॅलरी आणि शार्क टनेलला भेट दिली, आणि यावेळी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनालाही भेट दिली.पंतप्रधानांनी नवी दिल्लीत प्रगती मैदानात भारत मंडपम येथे अखिल भारतीय शिक्षण समागम कार्यक्रमात केलेले भाषण
July 29th, 11:30 am
शिक्षण ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये देशाला सफल करण्याची, देशाचे भाग्य बदलण्याची, ज्यामध्ये सर्वाधिक ताकद आहे ते म्हणजे शिक्षणच. एकविसाव्या शतकातील भारत, जी उद्दिष्टे घेऊन पुढे जात आहे त्यात आपल्या शिक्षण व्यवस्थेचं महत्त्व खूप आहे. आपण सर्व या व्यवस्थेचे प्रतिनिधी आहात, ध्वजवाहक आहात. म्हणूनच ‘अखिल भारतीय शिक्षण समागम’ चा भाग व्हायला मिळाले हा माझ्यासाठीसुद्धा महत्त्वाचा क्षण आहे.पंतप्रधानांनी दिल्लीतील भारत मंडपम् येथे अखिल भारतीय शिक्षा समागमचे केले उद्घाटन
July 29th, 10:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत भारत मंडपम् येथे अखिल भारतीय शिक्षा समागम् चे उद्घाटन केले. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या औचित्याने या कार्यक्रमाचे आयोजन झाले. यावेळी त्यांनी पीएम श्री या योजनेचा पहिला हप्ता देखील जारी केला. 6207 शाळांना एकूण 630 कोटी रुपयांचा पहिला हप्ता मिळाला. यावेळी त्यांना 12 भारतीय भाषांमध्ये भाषांतरित झालेल्या शिक्षण आणि कौशल्यविषयक पुस्तकांचे देखील प्रकाशन केले. तसेच यावेळी आयोजित करण्या आलेल्या प्रदर्शनाच्या ठिकाणी फेरफटका मारून पाहणी केली.युवा शक्ती-कौशल्य आणि शिक्षण या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये केलेले भाषण
February 25th, 12:13 pm
कौशल्य आणि शिक्षण या गोष्टी अमृतकाळामध्ये देशाची दोन सर्वात महत्वपूर्ण हत्यारे-साधने आहेत. विकसित भारताचा दृष्टीकोन लक्षात घेवून देशाच्या अमृतयात्रेचे नेतृत्व आपले युवक करीत आहेत. म्हणूनच, अमृतकाळातल्या या पहिल्या अंदाजपत्रकामध्ये युवकांना आणि त्यांच्या भविष्याला सर्वात जास्त महत्व देण्यात आले आहे. आपली शिक्षणप्रणाली अधिक व्यवहार्य व्हावी, तसेच उद्योगांवर आधारित व्हावी, यासाठी पाया मजबूत करण्याचे काम या संकल्पामध्ये करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून आपले शैक्षणिक क्षेत्र एकप्रकारे कडकपणाचे, अलवचिकतेचे शिकार बनले आहे. आम्ही यामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. आम्ही शिक्षण आणि कौशल्य यांचा संबंध युवकांचा वाढता कल तसेच आगामी काळामध्ये कोणत्या गोष्टींचा मागणी येवू शकते, अशा सर्व गोष्टींचा हिशेब लावून त्याची पुनर्रचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्येही शिकणे आणि कौशल्य आत्मसात करणे यावर समान भर देण्यात आला आहे., या प्रयत्नांमध्ये आम्हाला शिक्षकवृंदाकडून खूप चांगला पाठिंबा मिळाला, याचा मला आनंद वाटतो. यामुळे आपल्या मुलांना, त्यांच्यावर असलेल्या भूतकाळाचा ओझ्यातून मुक्त करण्यासाठी धाडस मिळाले आहे. यामुळे सरकारला शिक्षण आणि कौशल्य क्षेत्रामध्ये आणखी काही सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.‘युवा शक्ती - कौशल्य आणि शिक्षण’ या विषयावरच्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला पंतप्रधानांनी केले संबोधित
February 25th, 09:55 am
‘युवा शक्ती-कौशल्य आणि शिक्षण’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये घोषित केलेल्या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कल्पना आणि सूचना मिळविण्यासाठी सरकारने आयोजित केलेल्या 12 पोस्ट-बजेट वेबिनारच्या मालिकेतील हा तिसरा वेबिनार होता.India has immense potential to become a great knowledge economy in the world: PM Modi
October 19th, 12:36 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi launched Mission Schools of Excellence at Trimandir, Adalaj, Gujarat today. The Mission has been conceived with a total outlay of 10,000 Crores. During the event at Trimandir, the Prime Minister also launched projects worth around Rs 4260 crores. The Mission will help strengthen education infrastructure in Gujarat by setting up new classrooms, smart classrooms, computer labs and overall upgradation of the infrastructure of schools in the State.PM launches Mission Schools of Excellence at Trimandir, Adalaj, Gujarat
October 19th, 12:33 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi launched Mission Schools of Excellence at Trimandir, Adalaj, Gujarat today. The Mission has been conceived with a total outlay of 10,000 Crores. During the event at Trimandir, the Prime Minister also launched projects worth around Rs 4260 crores. The Mission will help strengthen education infrastructure in Gujarat by setting up new classrooms, smart classrooms, computer labs and overall upgradation of the infrastructure of schools in the State.Technology in the judicial system an essential part of Digital India mission: PM
April 30th, 01:55 pm
PM Modi participated in inaugural session of Joint Conference of Chief Ministers of States and Chief Justices of High Courts. He reiterated his vision of use of technology in governance in judiciary. He said that the Government of India considers the possibilities of technology in the judicial system as an essential part of the Digital India mission.PM inaugurates the Joint Conference of CM of the States & Chief Justices of High Courts
April 30th, 10:00 am
PM Modi participated in inaugural session of Joint Conference of Chief Ministers of States and Chief Justices of High Courts. He reiterated his vision of use of technology in governance in judiciary. He said that the Government of India considers the possibilities of technology in the judicial system as an essential part of the Digital India mission.Embrace challenges over comforts: PM Modi at IIT, Kanpur
December 28th, 11:02 am
Prime Minister Narendra Modi attended the 54th Convocation Ceremony of IIT Kanpur. The PM urged the students to become impatient for a self-reliant India. He said, Self-reliant India is the basic form of complete freedom, where we will not depend on anyone.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कानपूर आयआयटीचा 54 वा दीक्षांत समारंभ संपन्न , ब्लॉकचेन आधारित डिजिटल पदव्यांचा केला प्रारंभ
December 28th, 11:01 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज कानपूर आयआयटीचा 54 वा दीक्षांत समारंभ झाला यावेळी त्यांनी ब्लॉकचेन आधारित तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल पदवी प्रदान केल्या.गुजरातमध्ये विविध प्रकल्पांच्या उद्घाटन आणि लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
July 16th, 04:05 pm
मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि गांधीनगरचे खासदार अमित शाह , रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव , गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी , उपमुख्यमंत्री नितिन भाई, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश , गुजरात सरकारचे अन्य मंत्रिगण, संसदेतले माझे सहकारी आणि गुजरात प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सीआर पाटील, अन्य खासदार, आमदार आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना नमस्कार.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधल्या विविध प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि लोकार्पण
July 16th, 04:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधे, रेल्वेच्या अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि राष्ट्रार्पण दूरदृश्य प्रणाली द्वारे केले. यावेळी गुजरात सायन्स सिटी मधल्या एक्वेटिक्स आणि रोबोटिक्स गॅलरीचे आणि नेचर पार्कचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. गांधीनगर राजधानी- वाराणसी अतिजलद गाडी आणि गांधीनगर राजधानी ते वरेठा दरम्यानच्या मेमू सेवा गाडी या दोन नव्या गाड्यांना पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला.पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जुलैला गुजरातमध्ये विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करणार
July 14th, 06:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जुलै 2021 ला गुजरातमध्ये रेल्वेच्या अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि राष्ट्रार्पण दूरदृश्य प्रणाली द्वारे करणार आहेत.यावेळी गुजरात सायन्स सिटी मधल्या ॲक्वेटिक्स आणि रोबोटिक्स गॅलरीचे आणि नेचर पार्कचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत.