पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टी 20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघातील सदस्यांबरोबर साधलेला संवाद
July 05th, 04:00 pm
पंतप्रधान: मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आणि आमच्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे, तुम्ही विश्वचषक जिंकून आपल्या देशामध्ये उत्साहाचे आणि उत्सवाचे वातावरण तयार केले आहे. आणि देशवासियांच्या सर्व आशा -आकांक्षांना तुम्ही जिंकले आहे. माझ्यावतीने तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन! सर्वसाधारणपणे रात्री खूप उशीरपर्यंत मी कार्यालयामध्ये काम करीत असतो. विशेष म्हणजे यावेळी तर टी.व्हीसुद्धा सुरू होता आणि एकीकडे मी फायलीही पहात होतो. परंतु यावेळी त्या फायलींकडे माझे लक्ष केंद्रीत होत नव्हते. तुम्ही मंडळींनी आपल्यातील अतिशय उत्कृष्ट संघभावनेचे प्रदर्शन केले. आपल्यातील प्रतिभा दाखवली आणि तुमच्यामध्ये असलेले धैर्य स्पष्ट दिसून येत होते. मी सामना पहात होतो, तुमच्यामध्ये ‘पेशन्स’ होता, अजिबात गडबड नव्हती. पूर्ण आत्मविश्वास तुमच्यामध्ये होता. तुम्हा सर्वांचे माझ्यावतीने खूप-खूप अभिनंदन, मित्रांनो!!क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या अपघातामुळे पंतप्रधान व्यथित
December 30th, 04:44 pm
प्रसिद्ध क्रिकेटपटू ऋषभ पंत याला झालेल्या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.