पंतप्रधानांनी सुगम्य भारत अभियानाला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दिल्या शुभेच्छा

December 03rd, 04:22 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुगम्य भारत अभियानाला 9 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शुभेच्छा दिल्या. दिव्यांग भगिनी आणि बंधूंसाठी सुलभता,समानता आणि संधी वाढवण्याप्रति सरकारच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.दिव्यांग भगिनी आणि बंधूंच्या मनोधैर्याचे आणि कर्तृत्वाचे कौतुक करताना मोदी यांनी आपल्या सर्वांना त्याचा अभिमान वाटतो असे नमूद केले.