अंतरिम अर्थसंकल्प 2024 बाबत पंतप्रधानांचे भाष्य
February 01st, 02:07 pm
आजचा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प असला तरी तो सर्वसमावेशक आणि नाविन्यपूर्ण अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात सातत्य राखण्याचा विश्वास आहे. हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या युवा, गरीब, महिला आणि शेतकरी, या सर्व चार स्तंभांना सक्षम करेल. निर्मलाजींचा हा अर्थसंकल्प देशाचे भविष्य घडवणारा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प 2047 सालच्या विकसित भारताचा पाया मजबूत करण्याची हमी देणारा आहे. मी निर्मला जी आणि त्यांच्या टीमचे खूप खूप अभिनंदन करतो.आज सादर झालेला अर्थसंकल्प हा केवळ अंतरिम अर्थसंकल्प नसून, सर्वसमावेशक आणि नाविन्यपूर्ण अर्थसंकल्प असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
February 01st, 12:36 pm
“आज सादर झालेला अर्थसंकल्प हा केवळ अंतरिम अर्थसंकल्प नसून, सर्वसमावेशक आणि नाविन्यपूर्ण अर्थसंकल्प आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. “या अर्थसंकल्पात सातत्त्याचा विश्वास आहे,” असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे. पंतप्रधानांनी पुढे म्हटले आहे, हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या सर्व आधार स्तंभांना, म्हणजेच तरुण, गरीब, महिला आणि शेतकरी यांना सक्षम करेल.स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2023 च्या महाअंतिम फेरीतील सहभागींसोबत झालेल्या संवादात पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन
December 19th, 11:32 pm
खरेच तुम्हा सगळ्यांशी बोलून खूप छान वाटले . देशासमोरील सध्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी देशातील तरुण पिढी अहोरात्र काम करत आहे ,याचा मला आनंद आहे. आधीच्या हॅकॅथॉनमधून मिळालेले उपाय खूप प्रभावी ठरले आहेत. हॅकॅथॉनमध्ये सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी स्वत:चे स्टार्टअपही सुरू केले आहेत. हे स्टार्टअप्स, हे उपाय सरकार आणि समाज दोघांनाही मदत करत आहेत. आज या हॅकॅथॉनमध्ये सहभागी झालेल्या संघांसाठी आणि हजारो विद्यार्थ्यांसाठी ही मोठी प्रेरणा आहे.स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2023 च्या महाअंतिम फेरीमधल्या स्पर्धकांना पंतप्रधानांनी केले संबोधित
December 19th, 09:30 pm
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2023 च्या महाअंतिम फेरीमधल्या स्पर्धकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि त्यांना संबोधित केले.भारत आणि स्वीडन यांनी कॉप -28 मध्ये उद्योग संक्रमणासाठी नेतृत्व गटाच्या दुसऱ्या टप्प्याचे भूषवले सह-यजमानपद
December 01st, 08:29 pm
दुबई येथे कॉप-28 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनी संयुक्तपणे 2024-26 या कालावधीसाठी उद्योग संक्रमणासाठी नेतृत्व गटाच्या दुसऱ्या टप्प्याचे (LeadIT 2.0) उदघाटन केले. भारत आणि स्वीडन यांनी इंडस्ट्री ट्रांझिशन प्लॅटफॉर्मचे देखील उदघाटन केले . हा प्लॅटफॉर्म दोन्ही देशांची सरकारे, उद्योग, तंत्रज्ञान पुरवठादार, संशोधक आणि विचारवंत यांना एकमेकांशी जोडेल.Every student of the Scindia School should strive to make India a Viksit Bharat: PM Modi
October 21st, 11:04 pm
PM Modi addressed the programme marking the 125th Founder’s Day celebration of ‘The Scindia School’ in Gwalior, Madhya Pradesh. “It is the land of Nari Shakti and valour”, the Prime Minister said as he emphasized that it was on this land that Maharani Gangabai sold her jewellery to fund the Swaraj Hind Fauj. Coming to Gwalior is always a delightful experience”, the PM added.मध्यप्रदेशात ग्वाल्हेर इथे ‘द सिंधीया स्कूल’च्या 125 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन
October 21st, 05:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर इथे, 'द सिंधिया स्कूल' च्या 125 व्या स्थापना दिन सोहळ्याला संबोधित केले. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी शाळेतील बहुउद्देशीय क्रीडा संकुलाची पायाभरणी केली तसेच शाळेचे प्रतिष्ठित माजी विद्यार्थी आणि अव्वल कामगिरी करणाऱ्यांना शाळेचे वार्षिक पुरस्कार प्रदान केले. 1897 साली स्थापन झालेली सिंधिया शाळा ग्वाल्हेरच्या ऐतिहासिक किल्ल्यावर आहे. याप्रसंगी पंतप्रधानांनी शाळेच्या स्मरणार्थ टपाल तिकिटही जारी केले.चांद्रयान-3 च्या यशाबाबत अभिनंदनपर संदेशांसाठी पंतप्रधानांनी जागतिक नेत्यांचे मानले आभार.
August 24th, 10:03 am
चांद्रयान-3 च्या यशस्वीरित्या चंद्रावर उतरल्याबद्दल अनेक जागतिक नेत्यांनी भारताचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर प्रतिसाद देऊन शुभेच्छांबद्दल या नेत्यांचे आभार मानले आहेत.PM Modi and First Lady of the US Jill Biden visit the National Science Foundation
June 22nd, 02:49 am
PM Modi and First Lady of the US Jill Biden visited the National Science Foundation. They participated in the ‘Skilling for Future Event’. It is a unique event focused on promoting vocational education and skill development among youth. Both PM Modi and First Lady Jill Biden discussed collaborative efforts aimed at creating a workforce for the future. PM Modi highlighted various initiatives undertaken by India to promote education, research & entrepreneurship in the country.रिपब्लिक टीव्ही कॉन्क्लेव्हमधील पंतप्रधानांचे भाषण
April 26th, 08:01 pm
अर्णब गोस्वामी जी, रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे सर्व सहकारी, रिपब्लिक टीव्हीचे देश-विदेशातील सर्व प्रेक्षक, महिला -पुरुषगण , माझे म्हणणे मांडण्यापूर्वी मला तुम्हाला माझ्या लहानपणी जो विनोद ऐकायचो, तो सांगायचा आहे. एक प्राध्यापक होते आणि त्यांच्या मुलीने आत्महत्या केली, मी जीवनाला कंटाळले आहे, मला जगायचे नाही, म्हणून मी कांकरिया तलावात उडी मारून जीव देईन अशा आशयाची चिट्ठी तिने लिहून ठेवली होती . सकाळी पाहिले की मुलगी घरात नाही. तेव्हा पलंगावर चिट्ठी बघून वडिलांना खूप राग आला. ते म्हणाले, मी प्राध्यापक आहे, इतकी वर्षे मी शिकवले, तरीही कांकरिया स्पेलिंग चुकीचं लिहून गेली आहे. असो, मला आनंद आहे की अर्णब उत्तम हिंदी बोलू लागले आहेत . ते काय म्हणाले मी ऐकले नाही, मात्र हिंदी बरोबर आहे की नाही, हे मी अतिशय लक्षपूर्वक ऐकत होतो आणि कदाचित मुंबईत राहिल्यामुळे तुम्ही हिंदी चांगले शिकले असावेत .नवी दिल्लीत आयोजित रिपब्लिक समिटला पंतप्रधानांनी केले संबोधित
April 26th, 08:00 pm
नवी दिल्लीतील हॉटेल ताज पॅलेस येथे आयोजित रिपब्लिक समिटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले.कर्नाटकमध्ये हुबळी-धारवाड इथल्या विकास कामांचा शुभारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 12th, 04:01 pm
मला या वर्षाच्या सुरुवातीलाही हुबळीला भेट देण्याचं भाग्य लाभलं. हुबळीच्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनी रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून मला जे आशीर्वाद दिले, इतकं प्रेम, खूप आशीर्वाद दिले, ते मी कधीही विसरणार नाही. गेल्या काही काळात मला कर्नाटकच्या अनेक भागांना भेट देण्याची संधी मिळाली. बंगळूरू पासून ते बेळगावी पर्यंत, कलबुर्गी पासून ते शिमोगा पर्यंत, म्हैसूर पासून ते तुमकुरु पर्यंत, कन्नडिगा जनतेने मला जे अधिकाधिक प्रेम दिलं, आपलेपणा दिला, आपलं हे प्रेम, आपले आशीर्वाद भारावून टाकणारे आहेत. आपलं हे प्रेम माझ्यावर मोठं ऋण आहे, कर्ज आहे, आणि कर्नाटकच्या जनतेची सातत्त्याने सेवा करून मी या कर्जाची परतफेड करणार आहे. कर्नाटकच्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आनंद असावा, इथल्या युवा वर्गाला सतत पुढे जाण्यासाठी, रोजगाराच्या नवनवीन संधी मिळाव्यात, इथल्या माता-भगिनी अधिक सक्षम व्हाव्यात, याच दिशेने आम्ही एकत्र येऊन काम करत आहोत. भाजपाचं डबल इंजिन सरकार, कर्नाटकचा प्रत्येक जिल्हा, प्रत्येक गाव, प्रत्येक वस्तीच्या संपूर्ण विकासाकरता प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. आज धारवाडच्या या भूमीवर विकासाचा एक नवा प्रवाह सुरु होत आहे. विकासाचा हा प्रवाह हुबळी, धारवाड बरोबरच, संपूर्ण कर्नाटकच्या भविष्याचं सिंचन करण्याचं, त्याला फुलवण्याचं, भरभराटीला आणण्याचं काम करेल.कर्नाटकमध्ये हुबळी-धारवाड येथे पंतप्रधानांकडून महत्त्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण आयआयटी धारवाडचे केले लोकार्पण
March 12th, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटक मध्ये हुबळी धारवाड येथे महत्त्वाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. लोकार्पण केलेल्या या प्रकल्पांमध्ये आयआयटी धारवाडचा समावेश आहे ज्याची पायाभरणी पंतप्रधानांनी फेब्रुवारी 2019 मध्ये केली होती तसेच श्री सिद्धारूढ स्वामीजी हुबळी स्थानका मधील 1507 मीटर लांबीचा जगातील सर्वात जास्त लांब रेल्वे फलाट म्हणून ज्याला अलीकडेच जागतिक विक्रमांच्या गिनेस बुकने मान्यता दिली आहे तो प्रकल्प आणि होस्पेट हुबळी तिनईघाट सेक्शनचे विद्युतीकरण आणि या भागातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी होस्पेट रेल्वे स्थानकाच्या दर्जात सुधारणा आदी प्रकल्पांचा समावेश होता.युवा शक्ती-कौशल्य आणि शिक्षण या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये केलेले भाषण
February 25th, 12:13 pm
कौशल्य आणि शिक्षण या गोष्टी अमृतकाळामध्ये देशाची दोन सर्वात महत्वपूर्ण हत्यारे-साधने आहेत. विकसित भारताचा दृष्टीकोन लक्षात घेवून देशाच्या अमृतयात्रेचे नेतृत्व आपले युवक करीत आहेत. म्हणूनच, अमृतकाळातल्या या पहिल्या अंदाजपत्रकामध्ये युवकांना आणि त्यांच्या भविष्याला सर्वात जास्त महत्व देण्यात आले आहे. आपली शिक्षणप्रणाली अधिक व्यवहार्य व्हावी, तसेच उद्योगांवर आधारित व्हावी, यासाठी पाया मजबूत करण्याचे काम या संकल्पामध्ये करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून आपले शैक्षणिक क्षेत्र एकप्रकारे कडकपणाचे, अलवचिकतेचे शिकार बनले आहे. आम्ही यामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. आम्ही शिक्षण आणि कौशल्य यांचा संबंध युवकांचा वाढता कल तसेच आगामी काळामध्ये कोणत्या गोष्टींचा मागणी येवू शकते, अशा सर्व गोष्टींचा हिशेब लावून त्याची पुनर्रचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्येही शिकणे आणि कौशल्य आत्मसात करणे यावर समान भर देण्यात आला आहे., या प्रयत्नांमध्ये आम्हाला शिक्षकवृंदाकडून खूप चांगला पाठिंबा मिळाला, याचा मला आनंद वाटतो. यामुळे आपल्या मुलांना, त्यांच्यावर असलेल्या भूतकाळाचा ओझ्यातून मुक्त करण्यासाठी धाडस मिळाले आहे. यामुळे सरकारला शिक्षण आणि कौशल्य क्षेत्रामध्ये आणखी काही सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.‘युवा शक्ती - कौशल्य आणि शिक्षण’ या विषयावरच्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला पंतप्रधानांनी केले संबोधित
February 25th, 09:55 am
‘युवा शक्ती-कौशल्य आणि शिक्षण’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये घोषित केलेल्या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कल्पना आणि सूचना मिळविण्यासाठी सरकारने आयोजित केलेल्या 12 पोस्ट-बजेट वेबिनारच्या मालिकेतील हा तिसरा वेबिनार होता.पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
January 24th, 09:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षीच्या पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) विजेत्या बालकांची प्रशंसा केली आहे. नवोन्मेष, समाज सेवा, विद्वत्ता, क्रीडा, कला आणि संस्कृती तसेच शौर्य या सहा क्षेत्रांमध्ये अद्वितीय कामगिरी करणाऱ्या मुलांना भारत सरकारतर्फे पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार 2023 देण्यासाठी विविध श्रेणीअंतर्गत देशभरातील 11 बालकांची निवड करण्यात आली. यामध्ये 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 6 मुले आणि 5 मुलींचा समावेश आहे.प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद
January 24th, 07:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 7 लोककल्याण मार्ग इथल्या त्यांच्या निवासस्थानी, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधला.पंतप्रधान 11 डिसेंबर रोजी महाराष्ट्र आणि गोव्याच्या दौऱ्यावर
December 09th, 07:39 pm
पंतप्रधान सकाळी 9.30 वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचतील, तिथे ते वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. सकाळी सुमारे 10 वाजता, पंतप्रधान फ्रीडम पार्क मेट्रो स्थानकापासून खापरी मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोमधून प्रवास करतील ,तिथे ते 'नागपूर मेट्रो टप्पा I' राष्ट्राला समर्पित करणार आहेत .या कार्यक्रमादरम्यान ते ‘नागपूर मेट्रो टप्पा -II’ ची पायाभरणीही करतील. सकाळी 10:45 वाजता पंतप्रधान नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करणार आहेत आणि महामार्गाचा दौरा करतील. सकाळी 11.15 वाजता पंतप्रधानांच्या हस्ते एम्स नागपूर चे राष्ट्रार्पण होणार आहे.रोजगार मेळाव्यात नोकरी मिळालेल्या जवळपास 71,000 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्याच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण
November 22nd, 10:31 am
तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. आज देशाच्या 45 शहरांत 71 हजारांपेक्षा जास्त तरुणांना नियुक्तीपत्रे दिली जात आहेत. म्हणजे, आज एकाच वेळी हजारो घरांत सुखाच्या नव्या पर्वाची सुरवात झाली आहे. गेल्या महिन्यात आजच्याच दिवशी धनत्रयोदशीला केंद्र सरकार तर्फे 75 हजार तरुणांना नियुक्तीपत्रे वितरीत करण्यात आली होती. आणि आजचा हा विशाल रोजगार मेळावा हेच दाखवतो आहे, की सरकार कशाप्रकारे सरकारी नोकऱ्या देण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे.रोजगार मेळाव्या अंतर्गत नव्याने भर्ती झालेल्या सुमारे 71,000 जणांना पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण
November 22nd, 10:30 am
रोजगार मेळाव्या अंतर्गत नव्याने भर्ती झालेल्या सुमारे 71,000 जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचे वितरण केले. रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी, तरुणांच्या सक्षमीकरण तसेच राष्ट्रीय विकासात थेट सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करण्याकरता रोजगार मेळावा उत्प्रेरक म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे. याआधी ऑक्टोबरमध्ये रोजगार मेळाव्या अंतर्गत नव्याने भर्ती झालेल्या 75,000 जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती.