PM Modi arrives in Georgetown, Guyana
November 20th, 11:22 am
Prime Minister Narendra Modi arrived in Georgetown, Guyana. In a special gesture, he was warmly received by President Irfaan Ali, PM Mark Anthony Phillips, senior ministers and other dignitaries at the airport. During the visit, PM Modi will take part in various programmes including address to the Parliament of Guyana and an interaction with the Indian community.जॉर्जटाऊनमध्ये गयानाच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधानांचे केले स्वागत
November 20th, 11:18 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, 20-21 नोव्हेंबर 2024 दरम्यानच्या गयाना दौऱ्यावर जॉर्जटाउन येथे पोहोचले.गेल्या 56 वर्षांत गयानाला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. विशेष सन्मान म्हणून, विमानतळावर गयाना राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान अली आणि गयानाचे पंतप्रधान निवृत्त ब्रिगेडियर मार्क अँथनी फिलिप्स यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले आणि त्यांना औपचारिक सन्मान देण्यात आला. गयाना सरकारच्या एक डझनहून अधिक कॅबिनेट मंत्र्यांनीही या समारंभात सहभाग घेतला.पंतप्रधान मोदी नायजेरिया, ब्राझील आणि गयानाला भेट देणार
November 12th, 07:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत नायजेरिया, ब्राझील आणि गयाना या देशांच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. नायजेरियामध्ये ते धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यासंबंधीच्या उच्चस्तरीय चर्चेत सहभागी होणार असून भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. ब्राझीलमध्ये ते G20 शिखर परिषदेत सहभागी होतील. गयानामध्ये, पंतप्रधान वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील तसेच तेथील संसदेलाही ते संबोधित करणार असून कॅरिबियन प्रदेशासोबतचे संबंध दृढ करण्याची भारताची बांधिलकी अधोरेखित करणाऱ्या कॅरिकॉम-इंडिया समिटमध्ये सहभागी होतील.17 व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या पार्श्वभूमीवर गयानाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत पंतप्रधानांची भेट
January 09th, 05:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंदूरमध्ये 17 व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या निमित्ताने रिपब्लिक ऑफ गयानाचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान अली यांची भेट घेतली. गयानाचे राष्ट्राध्यक्ष इरफान अली 8-14 जानेवारी 2023 या कालावधीत भारताच्या भेटीवर आहेत. तसेच ते 17 व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत.पंतप्रधान 16 फेब्रुवारीला टेरीच्या जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेत उद्घाटनपर भाषण करणार
February 15th, 11:32 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी द एनर्जी अँड रिसोर्सेस (टेरी) या संस्थेच्या जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेमध्ये 16 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून उद्घाटनपर भाषण करणार आहेत.