पंतप्रधान मोदींचा फ्रान्स दौरा: धोरणात्मक भागीदारीला बळकटी आणि AI सहकार्यात आघाडी
February 13th, 03:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स आणि युनायटेड स्टेट्सच्या नुकत्याच पार पडलेल्या राजनैतिक दौऱ्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), आर्थिक सुधारणा आणि ऐतिहासिक संबंधांचा आदर राखणे या मुद्यांना ठळकपणे केंद्रस्थानी ठेवण्यात आल्याने त्याचा भारताची जगासोबतची आघाडी अधिक बळकट करण्यावर लक्षणीय प्रभाव पाडला. या सर्वसमावेशक भेटीने AI चा जबाबदार विकास, आर्थिक सहकार्य आणि धोरणात्मक भागीदारी वाढवण्याप्रती भारताची वचनबद्धता प्रकट झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स भेटीदरम्यान जारी केलेले भारत - फ्रान्स संयुक्त निवेदन
February 12th, 03:22 pm
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10-12 फेब्रुवारी 2025 या काळात फ्रान्सला भेट दिली. भारत आणि फ्रान्स यांनी 10 आणि 11 फेब्रुवारी 2025 ला झालेल्या कृत्रिम बुद्धीमत्ता कृती शिखर परिषदेचे सहअध्यक्ष पद भूषवले.ब्लेचली पार्क (नोव्हेंबर 2023 ) आणि सेउल (मे 2024) शिखर परिषदांदरम्यान ठरवल्मया गेलेल्या महत्वाच्या मुद्यांबाबत पुढील पाऊलांसंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी देशांचे आणि प्रशासनाचे प्रमुख, आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रमुख,लघु आणि मोठे उद्योग,शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी,बिगर सरकारी संस्था,कलाकार आणि नागरी समाजाचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. जागतिक एआय क्षेत्र सार्वजनिक हितासाठी सामाजिक,आर्थिक आणि पर्यावरणविषयक फलनिष्पत्ती प्रदान करेल याची सुनिश्चिती करण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याप्रती त्यांनी आपली कटिबद्धता अधोरेखित केली. एआय कृती शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे अभिनंदन केले. पुढच्या एआय कृती शिखर परिषदेचे यजमानपद भारत भूषवणार असल्याबद्दल फ्रान्सने भारताचे स्वागत केले.AAP-da's sinking ship will drown in Yamuna Ji: PM Modi in Kartar Nagar, Delhi
January 29th, 01:16 pm
PM Modi today, addressed a massive crowd in Kartar Nagar, declared that Delhi had rejected excuses, fake promises, and deception. He asserted that the city demanded a double-engine BJP government focused on welfare and development, ensuring housing, modernization, piped water, and an end to the tanker mafia. Confident of victory, he proclaimed, On February 5th, AAP-da Jayegi, BJP Aayegi!”PM Modi’s power-packed rally in Kartar Nagar ignites BJP’s campaign
January 29th, 01:15 pm
PM Modi today, addressed a massive crowd in Kartar Nagar, declared that Delhi had rejected excuses, fake promises, and deception. He asserted that the city demanded a double-engine BJP government focused on welfare and development, ensuring housing, modernization, piped water, and an end to the tanker mafia. Confident of victory, he proclaimed, On February 5th, AAP-da Jayegi, BJP Aayegi!”दिल्लीतील करिअप्पा परेड मैदानातील एनसीसी रॅलीला संबोधित करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 27th, 05:00 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी राजनाथ सिंहजी, संजय सेठजी, सीडीएस जनरल अनिल चौहानजी, तिन्ही सेनादलांचे प्रमुख, संरक्षण सचिव, एनसीसीचे महासंचालक, इतर अतिथीवर्ग आणि एनसीसी म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेनेतील माझ्या प्रिय मित्रांनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) वार्षिक मेळाव्याला केले संबोधित
January 27th, 04:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील करिअप्पा परेड मैदानावर राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) वार्षिक मेळाव्याला संबोधित केले. सांस्कृतिक कार्यक्रमांना मोदी उपस्थित राहिले तसेच त्यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट कॅडेट पुरस्कार प्रदान करण्यात आले. एनसीसी दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा देताना पंतप्रधान म्हणाले की, 18 मित्र देशांमधील सुमारे 150 छात्रसैनिक इथे असून त्यांचे मी स्वागत करतो. मेरा युवा भारत (माय भारत) पोर्टलच्या माध्यमातून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झालेल्या भारतातील युवकांचे त्यांनी अभिनंदन केले.भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल फ्रान्सचे अध्यक्ष आणि आयर्लंडच्या पंतप्रधानांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले आभार
January 27th, 11:06 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सचे अध्यक्ष एम्मान्युएल मॅक्राँ आणि आयर्लंडचे पंतप्रधान मायकेल मार्टिन यांचे भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानले.भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधानांनी थायलंडच्या पंतप्रधानांचे मानले आभार
January 26th, 10:20 pm
भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थायलंडच्या पंतप्रधान सुश्री पैतोंगटार्न शिनावात्रा यांचे आभार मानले. थायलंडच्या पंतप्रधानांनी एक्स वर लिहिलेल्या पोस्टला उत्तर देताना मोदी म्हणाले:दिल्लीतील करिअप्पा परेड ग्राऊन्ड येथे 27 जानेवारीला होणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेना प्रधानमंत्री रॅलीला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित
January 26th, 07:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जानेवारी 2025 रोजी दुपारी 4:30 वाजता दिल्लीतील करिअप्पा परेड ग्राऊन्ड येथे वार्षिक राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) पीएम रॅलीला संबोधित करणार आहेत.भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जगभरातील नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले आभार
January 26th, 05:56 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जगभरातील नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि अभिनंदनासाठी आभार मानले.भव्य संचलनामध्ये सांस्कृतिक वारसा आणि लष्करी सामर्थ्याचे दर्शन घडलेः पंतप्रधान
January 26th, 03:41 pm
2025च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील क्षणचित्रे सामाईक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे भारताच्या विविधतेतील एकतेचे जिवंत दर्शन असल्याचे म्हटले आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले की, या भव्य संचलनातून सांस्कृतिक वारसा आणि लष्करी सामर्थ्याचे दर्शन घडले.भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा
January 26th, 12:30 pm
कर्तव्य पथावर पार पडलेल्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात भारताची एकता, सामर्थ्य आणि वारशाचे दर्शन घडवण्यात आले. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय समर स्मारकावर आदरांजली अर्पण केली. या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांची प्रमुख उपस्थिती होती. शिस्तबद्ध पद्धतीने जाणाऱ्या सशस्त्र दलांच्या पथकांनी शिस्त आणि शौर्याची चुणूक दाखवली, तर विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणातून भारताच्या समृद्ध विविधतेवर प्रकाश टाकण्यात आला. भारतीय हवाई दलाच्या चित्तथरारक हवाई कसरतींनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. या सोहळ्यासाठी जमलेल्या लोकांनाही पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.पंतप्रधानांकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
January 26th, 08:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपण आज प्रजासत्ताक म्हणून 75 गौरवशाली वर्षे साजरी करत आहोत, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.राष्ट्रपतींनी आपल्या प्रेरणादायी भाषणात अनेक विषयांवर प्रकाश टाकला आणि आपल्या संविधानाची महानता तसेच राष्ट्रीय प्रगतीसाठी काम करत राहण्याच्या आवश्यकतेवर भर दिला- पंतप्रधान
January 25th, 10:09 pm
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, राष्ट्राला उद्देशून केलेल्या प्रेरणादायी भाषणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींचे आभार मानले. राष्ट्रपतींनी अनेक विषयांवर प्रकाश टाकला आणि आपल्या संविधानाच्या महानतेवर तसेच राष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करत राहण्याच्या आवश्यकतेवर भर दिला .राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांचे स्वागत करून भारत गौरवान्वित झाला आहे: पंतप्रधान
January 25th, 05:48 pm
इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांचे स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की भारत-इंडोनेशिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या विविध पैलूंवर चर्चा झाली. इंडोनेशिया आमच्या ऍक्ट ईस्ट धोरणाच्या केंद्रस्थानी आहे आणि भारत इंडोनेशियाच्या ब्रिक्स सदस्यत्वाचे स्वागत करतो असे त्यांनी अधोरेखित केले.प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होणारे एनसीसी छात्र आणि एनएसएस स्वयंसेवक यांच्याशी पंतप्रधानांनी साधलेला संवाद
January 25th, 03:30 pm
सर, आज तुम्हाला पाहून माझे स्वप्न पूर्ण झालेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय छात्रसेनेचे छात्रसैनिक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, आदिवासी समाजाचे अतिथी आणि चित्ररथ कलाकार यांच्यासोबत साधला संवाद
January 25th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (24 जानेवारी 2025) लोककल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होणार असलेल्या राष्ट्रीय छात्रसेनेचे छात्रसैनिक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, आदिवासी समाजाचे अतिथी आणि चित्ररथ कलाकार यांच्यासोबत संवाद साधला. या संवादाच्या निमित्ताने पंतप्रधानांना प्रत्यक्ष भेटता आपल्याबद्दलचा आनंदही अनेकांनी व्यक्त केला. ही भारतीय लोकशाहीची ताकद दर्शवणारी बाब असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले.इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन
January 25th, 01:00 pm
भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनासाठी इंडोनेशिया आपला मुख्य अतिथी देश होता आणि आपल्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की, आपण आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना, इंडोनेशिया पुन्हा एकदा या महत्त्वाच्या प्रसंगाचा एक भाग बनत आहे. या प्रसंगी मी राष्ट्राध्यक्ष प्रबोवो यांचे भारतात हार्दिक स्वागत करतो.पंतप्रधानांनी एनसीसी छात्र, एनएसएस स्वयंसेवक, आदिवासी अतिथी आणि चित्ररथ कलाकारांशी साधला संवाद
January 24th, 08:08 pm
आगामी प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होणारे राष्ट्रीय छात्रसेनेचे छात्रसैनिक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक,आदिवासी अतिथी आणि चित्ररथ कलाकारांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोक कल्याण मार्ग येथील निवासस्थानी संवाद साधला. त्यानंतर देशाची समृद्ध संस्कृती आणि विविधता दर्शविणारे सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले.पराक्रम दिवसानिमित्त पंतप्रधानांनी दिलेला संदेश
January 23rd, 11:30 am
आज आपला देश विकसित भारताच्या संकल्पसिद्धीसाठी कार्यरत असताना नेताजी सुभाष यांच्या चरित्रातून आपल्याला निरंतर प्रेरणा मिळते. नेताजींच्या जीवनाचे सर्वात मोठे उद्दिष्ट होते- स्वतंत्र भारत. त्यांनी आपल्या संकल्पसिद्धीसाठी आपला निर्णय एकाच कसोटीवर पारखला- आझाद हिंद. नेताजींचा जन्म एका समृद्ध कुटुंबात झाला होता, त्यांनी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. जर त्यांची इच्छा असती तर ते ब्रिटिश राजवटीत वरिष्ठ अधिकारी बनून आरामदायी जीवन जगू शकले असते, परंतु त्यांनी स्वातंत्र्यासाठी कष्ट सोसणे निवडले, आव्हाने निवडली, देशात आणि परदेशात कष्टदायक भ्रमंती केली, नेताजी कम्फर्ट झोनच्या बंधनात बांधले गेले नाहीत. त्याचप्रमाणे, आज आपल्या सर्वांना विकसित भारत घडवण्यासाठी आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावे लागेल. आपल्याला जागतिक स्तरावर स्वतःला सर्वोत्तम बनवायचे आहे, आपल्याला उत्कृष्टतेची निवड करावीच लागेल, आपल्याला कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करायचे आहे.