आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ – जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषद 2024 च्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे उद्योग धुरिणांकडून कौतुक
October 15th, 02:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ – जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषद (आयटीयू-डब्ल्यूटीएसए) 2024 दरम्यान 8 व्या इंडिया मोबाइल काँग्रेसचे उद्घाटन केले. डब्ल्यूटीएसए ही डिजिटल तंत्रज्ञानासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ संस्थेच्या मानकीकरण कार्यासाठी दर चार वर्षांनी आयोजित केली जाणारी प्रशासकीय परिषद आहे. भारत आणि हिंद-प्रशांत क्षेत्र प्रथमच आयटीयू-डब्ल्यूटीएसए चे यजमानपद भूषवत आहे. 190 हून अधिक देशांतील दूरसंचार, डिजिटल आणि आयसीटी क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 3,000 हून अधिक उद्योग धुरीण, धोरणकर्ते आणि तंत्रज्ञान तज्ञांना एकत्र आणणारा हा एक महत्त्वाचा जागतिक कार्यक्रम आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, येत्या 12 डिसेंबर रोजी कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी वार्षिक शिखर परिषदेचं उद्घाटन
December 11th, 04:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, येत्या 12 डिसेंबर रोजी, संध्याकाळी पाच वाजता, नवी दिल्लीत भारत मंडपम इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेकृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी शिखर परिषदेचे उद्घाटन होणार आहे.पंतप्रधान 3 डिसेंबर रोजी इनफिनिटी फोरमचे उद्घाटन करणार
November 30th, 11:26 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता इन्फिनिटी फोरम या फिनटेकसंबंधी विचारमंथनावरील नेतृत्व मंचाचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करणार आहेत.तेल आणि वायू क्षेत्रातील जागतिक कंपन्यांचे कार्यकारी अधिकारी आणि तज्ञांशी पंतप्रधानांची चर्चा
October 09th, 02:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेल आणि वायू क्षेत्रातल्या जागतिक कंपन्यांच्या कार्यकारी अधिकाऱ्यांशी आणि तज्ञांशी चर्चा केली.