PM Modi's candid interaction with Rashtriya Bal Puraskar winners
December 26th, 09:55 pm
PM Modi interacted with the 17 awardees of Rashtriya Bal Puraskar in New Delhi. During the candid interaction, the PM heard the life stories of the children and encouraged them to strive harder in their lives. He congratulated all the youngsters and wished them the very best for their future endeavours.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी साधला संवाद
December 26th, 09:54 pm
पंतप्रधानांनी या मुलाच्या जगण्याविषयी जाणून घेतले आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास त्यांना प्रोत्साहन दिले. पुस्तके लिहिलेल्या एका लहान मुलीला त्यांनी पुस्तकांना कसा प्रतिसाद आहे असे विचारले असता तिने सांगितले की इतर लहान मुलेही आपापली पुस्तके लिहू लागली आहेत. तेव्हा मोदी यांनी इतर लहान मुलांना प्रेरणा दिल्याबद्दल तिचे कौतुक केले.वीर बाल दिनानिमित्त पंतप्रधानांचे भाषण
December 26th, 12:05 pm
आज आपण सगळे इथं आपला तिसरा वीर बाल दिवस साजरा करण्यासाठी जमलो आहोत. वीर साहिबजादांच्या बलिदानाच्या अमर स्मृतीप्रित्यर्थ तीन वर्षांपूर्वी आमच्या सरकारनं वीर बाल दिवस साजरा करायला सुरुवात केली. आज हा दिवस अख्ख्या देशासाठी, देशातल्या करोडो लोकांसाठी राष्ट्रीय प्रेरणेचा उत्सव ठरला आहे. या दिवसानं भारतातल्या कित्येक मुलांमध्ये आणि युवकांमध्ये अदम्य साहसाची भावना जागृत केली आहे. शौर्य, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, खेळ आणि कला यासारख्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या देशातल्या १७ मुलांचा आज सन्मान करण्यात आला. भारतातल्या लहान मुलांमध्ये, युवा पिढीत खूप काही करुन दाखवण्याची क्षमता आहे, हे या सर्वांनी दाखवून दिलं आहे. आजच्या या दिवशी मी आपल्या गुरुजनांना, वीर साहिबजादांना वंदन करुन पुरस्कार मिळालेल्या सर्व मुलांना शुभेच्छा देतो, त्यांच्या कुटुंबियांनाही शुभेच्छा देतो. या सर्वांचं मी संपूर्ण देशाच्या वतीनं अभिनंदन करतो.नवी दिल्ली येथे आयोजित वीर बाल दिवस कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी
December 26th, 12:00 pm
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आज आयोजित वीर बाल दिवस कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. तिसऱ्या वीर बाल दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना त्यांनी संबोधित केले. साहिबजादांच्या अतुलनीय शौर्य आणि बलिदानाच्या स्मृतीनिमित्त आपल्या सरकारने वीर बाल दिवस सुरू केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आता हा दिवस कोट्यवधी भारतीयांसाठी राष्ट्रीय प्रेरणेचा सण बनला असल्याचे त्यांनी सांगितले. या दिवसाने अनेक मुलांना आणि युवांना दुर्दम्य साहसाची प्रेरणा दिली आहे. मोदी यांनी आज शौर्य, नवनिर्मिती, विज्ञान आणि तंत्रज्ञान, क्रीडा आणि कला या क्षेत्रात वीर बाल पुरस्काराने सन्मानित झालेल्या 17 मुलांचे कौतुक केले. आजचे पुरस्कार विजेते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या भारतीय मुले आणि युवांच्या क्षमतेचे प्रतीक आहेत. पंतप्रधानांनी यावेळी गुरूंना आणि वीर साहिबजादांना आदरांजली अर्पण केली आणि पुरस्कार विजेत्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले.कैथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया द्वारा आयोजित ख्रिसमस समारंभातील पंतप्रधानांचे भाषण
December 23rd, 09:24 pm
आता तीन-चार दिवसापूर्वीच मी माझे सहकारी भारत सरकारमधील मंत्री जॉर्ज कुरियन जी यांच्याकडे ख्रिसमस निमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झालो होतो. आणि आज तुमच्या समवेत उपस्थित राहण्याचा आनंद मिळत आहे. कैथलिक बिशप्स कौन्फरन्स औफ इंडिया- सीबीसीआय चे हे आयोजन ख्रिसमसच्या आनंदात तुमच्याबरोबर सहभागी होण्याची ही संधी, हा दिवस आपणा सर्वांसाठी अविस्मरणीय राहणार आहे. ही संधी यासाठी देखील खास आहे, कारण याच वर्षी सीबीसीआय च्या स्थापनेला 80 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त मी सीबीसीआय आणि त्यांच्याशी संलग्न सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.कॅथोलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या नाताळ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी
December 23rd, 09:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील सीबीसीआय केंद्र परिसरातील ‘कॅथोलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडिया’च्या वतीने आयोजित केलेल्या नाताळ साजरा करण्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. भारतातील कॅथोलिक चर्चच्या मुख्यालयामध्ये होणा-या अशा प्रकारच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी हजेरी लावण्याची ही पहिलीच वेळ आहे. कार्डिनल, बिशप आणि चर्चमधील प्रमुख नेत्यांसह ख्रिश्चन समुदायातील प्रमुख नेत्यांशीही यावेळी पंतप्रधानांनी संवाद साधला.स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा मजकूर
December 11th, 05:00 pm
मी लाल किल्ल्यावरून बोलताना नेहमी एका गोष्टीचा उल्लेख केला आहे तो तुमच्या लक्षात असेलच. हे म्हणालो होतो ‘सबका प्रयास’, आजचा भारत सर्वांच्या प्रयत्नांनीच जलद गतीने प्रगती करू शकतो. आजचा हा दिवस याचेच उदाहरण आहे. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’च्या या ग्रँड फिनाले ची मला बरेच दिवसांपासून प्रतीक्षा होती. जेव्हा जेव्हा मला तुमच्यासारख्या युवा नवोन्मेषकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळते, मला खूप काही जाणून घेण्याची शिकण्याची आणि समजून घेण्याची नामी संधी मिळते. माझ्या तुम्हा सगळ्यांकडून खूप काही अपेक्षा देखील असतात. 21 व्या शतकातील भारताकडे पाहण्याचा तुम्हा सर्व नवोन्मेषकांचा दृष्टिकोन वेगळाच आहे आणि म्हणूनच तुमचे पर्याय देखील वेगळेच असतात. म्हणूनच जेव्हा तुमच्यासमोर नवीन आव्हाने उभी राहतात तेव्हा तुम्ही त्यांचे नवीन आणि अनोख्या प्रकारचे उत्तर शोधून काढता. मी यापूर्वी देखील अनेक हॅकेथॉन’चा भाग झालो होतो. तुम्ही माझी कधीही निराशा केली नाही. नेहमीच माझा विश्वास वाढवला आहे. तुमच्या पूर्वीचे जे संघ होते, त्यांनी पर्याय शोधून काढले होते. आज ते पर्याय वेगवेगळ्या मंत्रालयात खूप कमी येत आहेत. आता या हॅकेथॉन मध्ये देशाच्या विविध भागातून आलेले संघ काय करत आहेत? मी मी तुमच्या नवोन्मेषाबाबत जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहे. चला तर मग सुरुवात करू, सर्वप्रथम कोण आमच्याशी संवाद साधणार आहे?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 मधील सहभागींशी साधला संवाद
December 11th, 04:30 pm
नरेंद्र मोदी यांनी आज स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या ग्रँड फिनालेमध्ये तरुण नवोन्मेषकर्त्यांबरोबर दूरदृश्य प्रणालीमार्फत संवाद साधला. लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात आपण दिलेल्या 'सबका प्रयास' या मंत्राचा पुनरुच्चार केल्याची आठवण पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना करून दिली. आजचा भारत सबका प्रयास अर्थात सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी प्रगतीच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करू शकतो आणि आजचा उपक्रम हे त्याचेच उदाहरण आहे, असे ते म्हणाले. आपण स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या ग्रँड फिनालेची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होतो असे सांगून पंतप्रधान म्हणाले की युवा नवोन्मेषीच्या बरोबर असताना आपल्याला नेहमीच काहीतरी शिकण्याची आणि त्यांच्याकडून काहीतरी नवीन गोष्ट समजून घेण्याची संधी मिळते. आपल्याला तरुण नवोन्मेषांकडून खूप अपेक्षा असून त्यांच्याकडे एकविसाव्या शतकातील भारताकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असल्याचे त्यांनी सांगितले. तुमचे उपाय वेगळे असतात आणि म्हणूनच जेव्हा एखादे नवीन आव्हान उभे राहते तेव्हा तुम्ही नवीन आणि अभिनव उपाय सादर करता असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या काही हॅकेथॉनला आपण उपस्थित होतो याचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले की या उपक्रमातून मिळालेल्या यशाने आपल्याला कधीच निराश केले नाही. “तुम्ही माझा विश्वास वाढवला आहे”, हे अधोरेखित करत त्यांनी सांगितले की याआधीचे अभिनव उपाय विविध मंत्रालयांमध्ये अंमलात आणले जात आहेत. आपल्याला सहभागींबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल असे सांगत पंतप्रधानांनी संवादाला सुरुवात केली.तमिळ कवी सुब्रमण्यम भारती यांच्या संपूर्ण साहित्याच्या संपादित ग्रंथखंडांच्या प्रकाशन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 11th, 02:00 pm
आज देशाचे महाकवी सुब्रमण्यम भारती जी, यांची जयंती साजरी होत आहे. मी सुब्रमण्यम भारती जी यांना श्रद्धापूर्वक वंदन करतो. त्यांना आपली श्रद्धांजली अर्पण करतो. आज भारताच्या संस्कृती आणि साहित्यासाठी, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील स्मृतीच्या दृष्टीने आणि तामिळनाडूच्या गौरवासाठी एक खूप मोठा दिवस आहे. महाकवी सुब्रमण्यम भारती यांच्या कार्याचे , त्यांच्या साहित्यकृतींचे प्रकाशन म्हणजे, एक खूप मोठा सेवायज्ञ आहे आणि या खूप मोठ्या साधनेला आज पूर्णाहूती दिली जात आहे. 21 खंडांमध्ये ‘कालवरिसैयिल भारतियार पडैप्पुगळ्‘चे संकलन सहा दशकांच्या अथक परिश्रमाचे हे साहस, असामान्य आणि अभूतपूर्व आहे. सीनी विश्वनाथन यांचा हा जो समर्पणाचा भाव आहे, त्यांची ही साधना आहे, हे त्यांनी केलेले परिश्रम आहेत, मला पूर्ण विश्वास आहे की, आगामी पिढ्यांना, त्यांच्या कार्याचा खूप मोठा लाभ मिळणार आहे. आपण कधी कधी एक शब्द ऐकत होतो. ‘वन लाइफ , वन मिशन’! परंतु वन लाइफ वन मिशन नेमके असते तरी काय, हे सीनी यांनी दाखवून दिले. त्यांनी केलेली ही खूप मोठी साधना आहे. त्यांची तपस्या पाहून आज मला महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांचे स्मरण झाले. त्यांनीही आपल्या आयुष्यातील 35 वर्षे धर्मशास्त्राचा इतिहासाचे लेखन करण्यामध्ये खर्च केले. मला विश्वास आहे, सीनी विश्वनाथन यांचे हे काम अकादमीच्या जगतामध्ये एक ‘बेंच-मार्क’ निश्चित करणारे ठरेल. मी या कार्यासाठी विश्वनाथन जी आणि त्यांचे सर्व सहकारी आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महान तमिळ कवी सुब्रह्मण्य भारती यांच्या रचनांच्या संकलनाचे प्रकाशन
December 11th, 01:30 pm
महान तमिळ कवी सुब्रह्मण्य भारती यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहताना मोदी म्हणाले की, भारताची संस्कृती आणि साहित्य, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आणि तामिळनाडूच्या गौरवासाठी आजचा दिवस ही एक मोठी संधी आहे. महाकवी सुब्रह्मण्य भारती यांच्या कार्याचे प्रकाशन, एक सेवायज्ञ आज पूर्ण होत आहे असे ते म्हणाले.Our government has taken unprecedented steps for women empowerment in the last 10 years: PM in Panipat, Haryana
December 09th, 05:54 pm
PM Modi launched the ‘Bima Sakhi Yojana’ of Life Insurance Corporation, in line with his commitment to women empowerment and financial inclusion, in Panipat, Haryana. The Prime Minister stressed that it was imperative to ensure ample opportunities and remove every obstacle in their way to empower women. He added that when women were empowered, new doors of opportunities opened for the country.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला एलआयसीच्या बिमा सखी योजनेचा शुभारंभ
December 09th, 04:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महिला सक्षमीकरण आणि आर्थिक समावेशन या त्यांच्या बांधिलकीला अनुसरून हरयाणात पानिपत येथे भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या बिमा सखी योजना या योजनेचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी कर्नाल येथील महाराणा प्रताप फळबागायत विद्यापीठाच्या मुख्य संकुलाची देखील पायाभरणी केली.आज भारत महिला सक्षमीकरणाच्या दिशेने आणखी एक मजबूत पाऊल टाकत आहे, असे ते यावेळी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले. ते पुढे म्हणाले की आज महिन्याचा 9 वा दिवस विशेष आहे कारण 9 हा आकडा आपल्या धर्मग्रंथात शुभ मानला गेला होता आणि नवरात्री दरम्यान पूजल्या जाणाऱ्या नवदुर्गाच्या नऊ रूपांशी संबंधित होता. आजचा दिवस नारी शक्तीच्या उपासनेचाही आहे, असे त्यांनी सांगितले.तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या यशस्वी अंमलबजावणीच्या समर्पणाच्या वेळी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
December 03rd, 12:15 pm
चंदीगडमध्ये आलो की मला माझ्याच लोकांमध्ये आल्यासारखे वाटते. चंदीगडची ओळख शक्तीस्वरूपा माँ चंडिका देवीच्या नावाशी जोडलेली आहे. माँ चंडी म्हणजे शक्तीचे असे स्वरूप, जे सत्य आणि न्यायाची पाठराखण करते. हीच भावना भारतीय न्याय संहिता आणि नागरी सुरक्षा संहितेच्या संपूर्ण मसुद्याचा पाया आहे. आज देश विकसित भारताच्या संकल्पासह आगेकूच करतो आहे संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत... अशा वेळी संविधानाच्या भावनेने प्रेरित भारतीय न्यायिक संहितेची अंमलबजावणी होते आहे, ही एक मोठी सुरुवात आहे. आपल्या राज्यघटनेने देशातील नागरिकांसाठी कल्पना केलेल्या आदर्शांची पूर्तता करण्याच्या दिशेने हा एक ठाम प्रयत्न आहे. या कायद्यांची अंमलबजावणी कशी होईल, याचे प्रात्यक्षिक अर्थात लाईव्ह डेमो मी आता पाहत होतो. आणि मी इथल्या प्रत्येकाला विनंती करतो की त्यांनी वेळ काढून हा लाईव्ह डेमो पाहावा. कायद्याच्या विद्यार्थ्यांनी पहावे, बार मधील सहकाऱ्यांनी पहावे, न्यायपालिकेच्या मित्रांना शक्य असले, तर त्यांनीही पहावे. या निमित्ताने मी सर्व देशवासियांना भारतीय न्याय संहिता, नागरी संहिता लागू झाल्याबद्दल शुभेच्छा देतो आणि चंदीगड प्रशासनाशी संबंधित सर्वांचे मी अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या यशस्वी अंमलबजावणीचे लोकार्पण
December 03rd, 11:47 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चंदीगड येथे भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या तीन परिवर्तनकारी नवीन फौजदारी कायद्यांची यशस्वी अंमलबजावणी देशाला समर्पित केली. उपस्थितांना संबोधित करताना मोदी यांनी चंडीगढची ओळख सत्य आणि न्याय प्रस्थापित करणारी शक्ती माँ चंडी देवीशी निगडित असल्याचे नमूद केले . हेच तत्त्वज्ञान भारतीय न्याय संहिता आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या संपूर्ण स्वरूपाचा आधार असल्याचे ते म्हणाले. भारतीय राज्यघटनेच्या भावनेने प्रेरित भारतीय न्याय संहिता अंमलात आणणे हा एक गौरवशाली क्षण होता कारण देश विकसित भारताच्या संकल्पासह पुढे मार्गक्रमण करण्याच्या तसेच भारतीय राज्यघटनेची 75 वर्षे साजरी करण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर होता असे पंतप्रधान म्हणाले. ते पुढे म्हणाले की, आपल्या राज्यघटनेने देशातील नागरिकांसाठी ज्या आदर्शांची कल्पना केली , ती पूर्ण करण्याच्या दिशेने हा एक ठोस प्रयत्न आहे. मोदी म्हणाले की या कायद्यांची अंमलबजावणी कशी करायची याची झलक त्यांना थेट प्रात्यक्षिकातून पहायला मिळाली. पंतप्रधानांनी लोकांना कायद्यांचा हा लाईव्ह डेमो पाहण्याचे आवाहन केले. तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या यशस्वी अंमलबजावणी निमित्त त्यांनी सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. चंदीगड प्रशासनातील सर्व संबंधितांचेही त्यांनी अभिनंदन केले.भारतीय समुदायाने वेगवेगळ्या देशांमध्ये आपला ठसा उमटवला आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
November 24th, 11:30 am
मन की बात च्या 116 व्या भागात, पंतप्रधान मोदींनी NCC छात्रांचा विकास आणि आपत्ती निवारणाच्या कार्यातील त्यांची भूमिका यावर प्रकाश टाकत NCC दिनाचे महत्व विशद केले. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी तरुणांचे सक्षमीकरण होण्याची गरज त्यांनी स्पष्ट करण्यासोबतच विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगची चर्चा केली. ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास मदत करणाऱ्या तरुणांच्या प्रेरणादायी कथा आणि एक पेड माँ के नाम मोहिमेचे यशही त्यांनी शेअर केले.India has not given world 'Yuddha', but Buddha: PM Modi at International Abhidhamma Divas
October 17th, 10:05 am
PM Modi addressed the celebration of International Abhidhamma Divas and the recognition of Pali as a classical language at Vigyan Bhavan, New Delhi. He emphasized the significance of Pali in understanding Buddha's teachings and highlighted the importance of preserving linguistic heritage. The PM spoke about India's commitment to promoting Lord Buddha's teachings globally.PM Modi participates in International Abhidhamma Divas programme
October 17th, 10:00 am
PM Modi addressed the celebration of International Abhidhamma Divas and the recognition of Pali as a classical language at Vigyan Bhavan, New Delhi. He emphasized the significance of Pali in understanding Buddha's teachings and highlighted the importance of preserving linguistic heritage. The PM spoke about India's commitment to promoting Lord Buddha's teachings globally.Mission of cleanliness is not a one day ritual but a lifelong ritual: PM Modi
October 02nd, 10:15 am
PM Modi commemorated the 10th anniversary of the Swachh Bharat Mission at Vigyan Bhawan, New Delhi. He launched sanitation projects worth over Rs 9,600 crore and emphasized the movement's significance as a public initiative involving millions of citizens. Highlighting collective efforts and community contributions, PM Modi celebrated the mission as a historic achievement that showcases India's commitment to cleanliness and environmental sustainability. The theme for this year’s campaign is “Swabhav Swachhata, Sanskaar Swachhata.”पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत दिन 2024 मध्ये झाले सहभागी
October 02nd, 10:10 am
स्वच्छ भारत या एका महत्वाच्या लोकचळवळीच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 155 व्या गांधी जयंती निमित्त नवी दिल्ली इथे विज्ञान भवनात आयोजित स्वच्छ भारत दिवस 2024 च्या कार्यक्रमात सहभागी झाले. मोदी यांनी रु 9600 कोटी हुन जास्त खर्चाच्या अनेक स्वच्छता प्रकल्पांचा शुभारंभ केला आणि कोनशिला बसवली. यात अमृत आणि अमृत 2.0, स्वच्छ गंगा राष्ट्रीय प्रकल्प तसेच गोबरधन योजनेचा समावेश आहे. ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ हे स्वच्छता ही सेवा 2024 चे बोधवाक्य आहे.ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश येथे सेमीकॉन इंडिया 2024 कार्यक्रमात झालेले पंतप्रधानांचे भाषण
September 11th, 12:00 pm
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री-योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी-अश्विनी वैष्णव आणि जितीन प्रसाद, जागतिक सेमीकंडक्टर उद्योगाशी संबंधित सर्व दिग्गज, शिक्षण-संशोधन आणि नवोन्मेष क्षेत्रातील सर्व भागीदार, इतर मान्यवर पाहुणे, स्त्री-पुरुष आणि सज्जनहो, सर्वांना नमस्कार!