'मन की बात'चे श्रोते हेच या कार्यक्रमाचे खरे आधारस्तंभ: पंतप्रधान मोदी

September 29th, 11:30 am

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा एकत्र येण्याची संधी मिळाली आहे. आजचा हा भाग मला भावूक करणारा आहे, अनेक जुन्या आठवणी माझ्याभोवती रुंजी घालत आहेत याचं कारण असं की आपल्या या ‘मन की बात’ च्या प्रवासाला आता 10 वर्षे पूर्ण होत आहेत.दहा वर्षांपूर्वी 3 ऑक्टोबर रोजी, विजयादशमीच्या दिवशी ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. आणि पवित्र योगायोग असा की या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी ‘मन की बात’ ला 10 वर्षे पूर्ण होतील तेव्हा नवरात्रीचा पहिला दिवस असेल. ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या वाटचालीत असे अनेक प्रसंग आले आहेत ज्यांना मी कधीच विसरू शकत नाही. ‘मन की बात’ कार्यक्रमाचे कोट्यवधी श्रोते, आपल्या या प्रवासातील असे सहकारी आहेत ज्यांचा सहयोग मला निरंतर लाभत राहिला आहे. देशाच्या काना-कोपऱ्यातून त्यांनी मला माहिती उपलब्ध करून दिली. ‘मन की बात’चे श्रोतेच या कार्यक्रमाचे खरे सूत्रधार आहेत. सहसा असं मानलं जातं की जोपर्यंत एखाद्या कार्यक्रमात चटपटीत बाबींची चर्चा नसेल किंवा काही नकारात्मक बाबी समाविष्ट नसतील तर अशा कार्यक्रमाकडे श्रोते फारसे लक्ष देत नाहीत. पण ‘मन की बात’ या कार्यक्रमाने हे सिध्द करून दाखवले आहे की देशातील लोकांना सकारात्मक माहितीची किती ओढ आहे. सकारात्मक विचार, प्रेरणात्मक उदाहरणे, धैर्य वाढवणाऱ्या कहाण्या लोकांना फारच आवडतात. ‘चकोर’ नावाच्या पक्षाबद्दल असं म्हटलं जातं की तो पक्षी फक्त आकाशातून पडणारे पावसाचे थेंबच पितो. ‘मन की बात’ या कार्यक्रमात आपण पाहिलं की लोक देखील तशाच प्रकारे, चकोर पक्ष्याप्रमाणेच देशाची कामगिरी इतरांच्या सामुहिक यशोगाथा अत्यंत अभिमानाने ऐकतात. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 10 वर्षांच्या वाटचालीने एक अशी श्रुंखला तयार केली आहे ज्याच्या प्रत्येक भागात नव्या कहाण्या, नव्या सफलतेच्या गाथा आणि नवी व्यक्तिमत्वे यांची ओळख होते.आपल्या समाजात सामुदायिकतेच्या भावनेने जे जे कार्य केलं जात आहे त्या कार्याचा ‘मन की बात’ मध्ये गौरव केला जातो. जेव्हा मी ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी आलेली लोकांची पत्रे वाचतो तेव्हा माझं मन देखील अभिमानाने फुलून येतं. आपल्या देशात कितीतरी प्रतिभावंत आहेत आणि त्यांच्यामध्ये देश आणि समाजाची सेवा करण्याची उत्कट इच्छा आहे. असे लोक निःस्वार्थ भावनेनं सेवा करण्यात स्वतःचं संपूर्ण जीवन समर्पित करतात. अशा लोकांचं कार्य जाणून घेतल्यानंतर माझ्यात देखील उर्जेचा संचार होतो. ‘मन की बात’ ची ही संपूर्ण प्रक्रिया माझ्यासाठी एखाद्या मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेण्याप्रमाणे आहे. ‘मन की बात’ मधील प्रत्येक विषय, प्रत्येक घटना आणि प्रत्येक पत्राची मी आठवण काढतो तेव्हा असं वाटतं की माझ्यासाठी देवाचं रूप असलेली ही सर्वसामान्य जनता, तिचं जणूकाही दर्शन मी घेत आहे.

अंतराळ क्षेत्रातील सुधारणांचा देशातील तरुणांना फायदा: मन की बात दरम्यान पंतप्रधान मोदी

August 25th, 11:30 am

मित्रांनो, देशातील युवावर्गाला अंतराळ क्षेत्रातील सुधारणांमुळे देखील खूप फायदा झाला आहे, त्यामुळे मी असा विचार केला की आज 'मन की बात' मध्ये अंतराळ क्षेत्राशी संबंधित माझ्या काही तरुण मित्रांशी का बोलू नये! माझ्यासोबत बोलण्यासाठी स्पेस टेक स्टार्ट अप- गॅलेक्स आय चा चमू सहभागी होत आहे. हा स्टार्ट-अप- नवं उद्योग, आयआयटी-मद्रासच्या माजी विद्यार्थ्यांनी सुरू केला होता. ही सर्व तरुण मंडळी- सुयश, डेनिल, रक्षित, किशन आणि प्रणित, आज दूरध्वनीवरून आपल्यासोबत आहेत. चला, या तरुणांचे अनुभव जाणून घेऊया.

आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या मंत्रिस्तरीय बैठकीत पंतप्रधानांनी केलेले भाषण

February 14th, 02:45 pm

आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या मंत्रिस्तरीय बैठकीत सर्वांना अभिवादन.आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था 50 वा वर्धापन दिन साजरा करत आहे, हे महत्वपूर्ण आहे. हा महत्वाचा टप्पा गाठल्याबद्दल अभिनंदन. या बैठकीच्या सह-अध्यक्षतेबद्दल मी आयर्लंड आणि फ्रान्सचेही आभार मानतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या मंत्रिस्तरीय बैठकीला केले संबोधित

February 14th, 02:39 pm

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या स्थापनेच्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त अभिनंदन केले आणि या बैठकीच्या सह-अध्यक्षतेबद्दल आयर्लंड आणि फ्रान्सचे आभार मानले.

बेंगळुरूस्थित हृदयरोगतज्ज्ञ आणि त्यांच्या मुलाकडून वस्तूंच्या पुनर्वापरासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची पंतप्रधानांकडून दखल

March 07th, 02:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनर्वापर आणि ‘टाकाऊ पासून संपत्ती’ याविषयी जागरूकता निर्माण केल्याबद्दल बंगळुरू येथील वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ दीपक कृष्णमूर्ती आणि त्यांच्या मुलाच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे.

शहरी नियोजन, विकास आणि स्वच्छता’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

March 01st, 10:20 am

तुम्हा सर्वांचे ‘शहरी विकास ' सारख्या महत्वपूर्ण विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये स्वागत आहे.

पंतप्रधानांनी ‘शहरी नियोजन, विकास आणि स्वच्छता’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला केले संबोधित

March 01st, 10:00 am

स्वातंत्र्यानंतर देशात केवळ एक किंवा दोन नियोजित शहरे विकसित झाली आहेत. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांत भारताची 75 नियोजित शहरे विकसित झाली असती तर जगात भारताची स्थिती पूर्णपणे वेगळी असती, अशी टिप्पणी करत पंतप्रधानांनी खेद व्यक्त केला. 21व्या शतकातील गतिशील भारतात सुनियोजित शहरे ही काळाची गरज आहे, याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. नवीन शहरांचा विकास आणि सध्याच्या शहरांमधील सेवांचे आधुनिकीकरण हे शहरी विकासाचे दोन प्रमुख पैलू असल्याचे सांगत देशाच्या प्रत्येक अर्थसंकल्पात शहरी विकासाचे महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले. यंदाच्या अर्थसंकल्पात शहरी विकासाच्या मानकांसाठी 15,000 कोटी रुपयांचा प्रोत्साहन निधी जाहीर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे नियोजनबद्ध शहरीकरणाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यमंत्र्यांच्या अखिल भारतीय वार्षिक जल परिषदेतील पंतप्रधानांचा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून दिलेला संदेश

January 05th, 09:55 am

देशातील जलमंत्र्यांचे पहिले अखिल भारतीय संमेलन अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आज भारत, जलसुरक्षेवर अभूतपूर्व काम करत आहे, अभूतपूर्व गुंतवणूकही करत आहे. आपल्या संवैधानिक व्यवस्थेत पाण्याचा विषय हा राज्यांच्या अखत्यारित येतो. जल संरक्षणाकरिता राज्यांद्वारे केले जात असलेले प्रयत्न, देशाच्या सामूहिक लक्ष्यांना प्राप्त करण्यात खूपच सहाय्यक ठरतील. अशात 'वॉटर व्हिजन @ 2047 येत्या 25 वर्षांच्या अमृतयात्रेचा एक महत्वपूर्ण आयाम आहे.

राज्‍यातील जल मंत्र्यांच्या पहिल्या अखिल भारतीय वार्षिक जलपरिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्‍य प्रणालीद्वारे केले मार्गदर्शन

January 05th, 09:45 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्‍य प्रणालीद्वारे राज्यांच्या मंत्र्यांच्या पहिल्या अखिल भारतीय वार्षिक जलपरिषदेला मार्गदर्शन केले. ‘वॉटर व्हिजन @ 2047’ ही परिषदेची संकल्पना असून शाश्वत विकास आणि मानवी विकासासाठी जलस्रोतांचा वापर करण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यासाठी प्रमुख धोरणकर्त्यांना एकत्र आणणे हा या मंचाचा उद्देश्य आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 नोव्हेंबरला अरुणाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश दौऱ्यावर

November 17th, 03:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 नोव्हेंबर 2022 रोजी अरुणाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशला भेट देतील. पंतप्रधान, सकाळी सुमारे 9:30 वाजता, इटानगर इथल्या डोनी पोलो विमानतळाचे उद्घाटन करतील आणि 600 मेगावॅटचे कामेंग जलविद्युत केन्द्र राष्ट्राला समर्पित करतील. त्यानंतर ते उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे पोहोचतील, तेथे दुपारी 2 वाजता ते ‘काशी तमिळ संगमम्’चे उद्‌घाटन करतील.

Lifestyle of the planet, for the planet and by the planet: PM Modi at launch of Mission LiFE

October 20th, 11:01 am

At the launch of Mission LiFE in Kevadia, PM Modi said, Mission LiFE emboldens the spirit of the P3 model i.e. Pro Planet People. Mission LiFE, unites the people of the earth as pro planet people, uniting them all in their thoughts. It functions on the basic principles of Lifestyle of the planet, for the planet and by the planet.

PM launches Mission LiFE at Statue of Unity in Ekta Nagar, Kevadia, Gujarat

October 20th, 11:00 am

At the launch of Mission LiFE in Kevadia, PM Modi said, Mission LiFE emboldens the spirit of the P3 model i.e. Pro Planet People. Mission LiFE, unites the people of the earth as pro planet people, uniting them all in their thoughts. It functions on the basic principles of Lifestyle of the planet, for the planet and by the planet.

केंद्रीय मंत्रिमंडळाची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस(सीएसएमटी), मुंबईसह नवी दिल्ली आणि अहमदाबाद रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाला मंजुरी

September 28th, 04:58 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुमारे 10,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने 3 प्रमुख रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याच्या भारतीय रेल्वेच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.:

एकता नगर, गुजरात इथे झालेल्या पर्यावरण मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेत पंतप्रधानांचे भाषण

September 23rd, 04:26 pm

आपणा सर्वांचे या राष्ट्रीय परिषदेत आणि विशेषतः एकता नगरमध्ये आपले स्वागत आहे, अभिनंदन आहे. एकता नगर मध्ये ही राष्ट्रीय परिषद होत आहे, हे मला अतिशय महत्वपूर्ण वाटते. आपण जंगलांबद्दल बोललो तर, आपल्या आदिवासी बंधू - भगिनींविषयी बोलायचं, वन्यजीवांविषयी बोलायचं, जल संवर्धनावर चर्चा, पर्यटनावर चर्चा केली, आपण निसर्ग आणि पर्यावरण आणि विकास, एकप्रकारे एकता नगरचा जो सर्वांगीण विकास झाला आहे, तो हा संदेश देतो, विश्वास निर्माण करतो की वन आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात आज एकता नगर एक तीर्थक्षेत्र बनले आहे. आपण याच क्षेत्राशी संबंधित अधिकारी आला आहात. माझी इच्छा आहे एकता नगरमध्ये आपण जितका काळ घालवाल, त्या लहान लहान गोष्टींच जरूर निरीक्षण करा, ज्यात पर्यावरणाविषयी, आपल्या आदिवासी समाजाविषयी, आपल्या वन्य जीवांविषयी, किती संवेदनशील राहून काम केले आहे, सगळी रचना केली आहे, निर्माण कार्य झाले आहे आणि भविष्यात देशाच्या अनेक कानाकोपऱ्यात वन पर्यावरणाचे रक्षण करत विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जाता येते, हे आणि खूप काही इथे बघायला - शिकायला मिळेल.

PM inaugurates the National Conference of Environment Ministers of all States in Ekta Nagar, Gujarat

September 23rd, 09:59 am

PM Modi inaugurated National Conference of Environment Ministers in Ekta Nagar, Gujarat via video conferencing. He said that the role of the Environment Ministry was more as a promoter of the environment rather than as a regulator. He urged the states to own the measures like vehicle scrapping policy and ethanol blending.

पंतप्रधान 8 सप्टेंबर रोजी 'कर्तव्य पथ' चे उद्‌घाटन आणि इंडिया गेट येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे करणार अनावरण

September 07th, 01:49 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 सप्टेंबर 2022 रोजी संध्याकाळी 7 वाजता 'कर्तव्य पथ' चे उद्‌घाटन करणार आहेत. सत्तेचे प्रतीक असलेले पूर्वीचे राजपथ हे आता कर्तव्य पथाकडे अर्थात जनतेची मालकी आणि त्यांच्या सशक्तीकरणाचे प्रतिक म्हणून बदलले जाणार आहे. याप्रसंगी इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचेही पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण होणार आहे. ही पावले ‘वसाहतवादी मानसिकतेचा कोणताही लवलेश मागे ठेवू नका’ या पंतप्रधानाच्या अमृत कालमधील नव भारताच्या दुसऱ्या ‘पंच प्रणा’ शी सुसंगत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (90 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

June 26th, 11:30 am

ज्यांच्या मनामध्ये काही वर्षांपूर्वी अंतराळ क्षेत्राची प्रतिमा एखाद्या गुप्त मोहिमेसारखी होती, तेच हे युवक आज अंतराळ क्षेत्रामध्ये काम करीत आहेत. मात्र देशाने अंतराळ क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणल्या, आणि आता युवकही उपग्रह प्रक्षेपित करण्‍याचे काम करीत आहेत. ज्यावेळी देशाचा युवक आकाशाला गवसणी घालण्यासाठी सिद्ध असतो, तर मग आपला देश या कामामध्ये मागे कसा काय राहू शकेल?

लाइफ मूव्हमेंट उपक्रमाची सुरुवात करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

June 05th, 07:42 pm

आजचा प्रसंग आणि आजची तारीख, दोन्ही खूप समर्पक आहेत. आपण लाईफ म्हणजे लाइफस्टाइल फॉर द एनवायरन्मेन्ट या पर्यावरण संरक्षण चळवळीचा प्रारंभ करत आहोत. यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या मोहिमेचे घोषवाक्य आहे- ''केवळ एक पृथ्वी''. आणि लक्षित क्षेत्र आहे - ''निसर्गाशी सुसंवाद राखत एकरूप होत जगणे''. या वाक्यामध्ये महत्व आणि उपाय सुंदरपणे मांडले आहेत.

PM launches global initiative ‘Lifestyle for the Environment- LiFE Movement’

June 05th, 07:41 pm

Prime Minister Narendra Modi launched a global initiative ‘Lifestyle for the Environment - LiFE Movement’. He said that the vision of LiFE was to live a lifestyle in tune with our planet and which does not harm it.

जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या -जीतो कनेक्ट 2022 शिखर परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

May 06th, 02:08 pm

आपला भविष्यकालीन मार्ग आणि उद्दीष्ट दोन्ही स्पष्ट आहेत. आत्मनिर्भर भारत हाच आपला मार्ग आहे आणि हाच आपला संकल्पही आहे आणि हा काही फक्त कोणत्या सरकारचा नाही तर 130 कोटी देशवासियांचा आहे. गेल्या काही वर्षात आम्ही यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली. वातावरण सकारात्मक राखण्यासाठी सातत्याने परिश्रम केले आहेत. देशात निर्माण होत असलेल्या योग्य वातावरणाचा उपयोग करून संकल्प सिद्धीस नेण्याची जबाबदारी आता आपल्यासारख्या माझ्या साथीदारांवर आहे JITO सदस्यांवर आहे. आपण जिथे कुठे जाल, ज्याला भेटाल त्याच्याशी आपल्या दिवसातील अर्धा वेळ येणाऱ्या दिवसांबद्दल चर्चा कराल अशा स्वभावाचे आपण आहात. गेलेल्या परिस्थितीचा विचार करत त्यावर वेळ काढणारे लोक आपण नाही. भविष्याकडे लक्ष देणाऱ्या लोकांपैकी आपण आहात आणि मी आपल्यासारख्यांमध्येच मोठा झालो आहे, त्यामुळे आपला स्वभाव काय आहे हे मला माहिती आहे.