गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

February 22nd, 11:30 am

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी पुरुषोत्तम रुपाला जी, संसदेमधील माझे मित्र सी आर पाटील, अमूलचे अध्यक्ष श्यामल भाई, आणि एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या बंधू-भगिनींनो! गुजरात मधील गावांनी मिळून 50 वर्षांपूर्वी जे रोप लावले होते ते आज विशाल वटवृक्ष बनले आहे आणि या विशाल वटवृक्षाच्या फांद्या आज देश परदेशात पसरल्या आहेत. गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यानिमित्त मी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.गुजरात मधील दूध समितीशी संलग्न असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे, प्रत्येक पुरुषाचे, प्रत्येक महिलेचे मी अभिनंदन करतो. याचबरोबर आपले एक आणखी मित्र आहेत जे दुग्ध व्यवसाय क्षेत्रातले सर्वात मोठे भागीदार आहेत. मी त्यांना सुद्धा नमस्कार करतो. हे भागीदार आहेत, आपले पशुधन. मी आज या प्रवासाला यशस्वी बनवण्यामध्ये पशुधनाच्या योगदानाला सुद्धा सन्मानित करत आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करत आहे. त्यांच्या शिवाय दुग्ध व्यवसाय क्षेत्राची कल्पना सुद्धा केली जाऊ शकत नाही आणि यासाठीच माझ्या देशातल्या पशुधनाला सुद्धा माझा प्रणाम आहे.

गुजरातमध्ये अहमदाबाद येथे गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या सुवर्ण महोत्सवी सोहोळ्यात पंतप्रधानांचा सहभाग

February 22nd, 10:44 am

गुजरातमध्ये अहमदाबाद मधील मोटेरा येथे नरेंद्र मोदी स्टेडीयमवर आज आयोजित करण्यात आलेल्या गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या (जीसीएमएमएफ)सुवर्ण महोत्सवी सोहोळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाग घेतला. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनातून पंतप्रधानांनी फेरफटका मारला तसेच सुवर्णमहोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचे अनावरण देखील केले. जीसीएमएमएफ ही संस्था म्हणजे सहकारी संस्थांचा लवचिकपणा, या संस्थांची उद्योजकता विषयक उर्जा तसेच शेतकऱ्यांचा दृढ निश्चय यांचा पुरावाच आहे आणि त्याने अमूलला जगातील सशक्त दुग्धोत्पादन ब्रँड म्हणून स्थान मिळवून दिले आहे.

राजस्थान मधल्या भिलवाडा इथे भगवान श्री देवनारायण जी यांच्या 1111 व्या अवतरण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांचे संबोधन

January 28th, 03:50 pm

आज या पवित्र प्रसंगी भगवान देव नारायण जी यांचा सांगावा आला आणि जेव्हा भगवान देवनारायण जी यांच्याकडून आमंत्रण आले तर कोणी ही संधी सोडेल का ? मी सुद्धा हजर झालो.आपण लक्षात घ्या, इथे कोणी पंतप्रधान आलेले नाहीत. मी संपूर्णपणे भक्तिभावाने आपणा सर्वांप्रमाणेच एक भाविक म्हणून आशीर्वाद घ्यायला आलो आहे. यज्ञशाळेत पूर्णाहुती देण्याचे भाग्य ही मला लाभले.माझ्यासाठी हे भाग्य आहे की माझ्यासारख्या एका सामान्य व्यक्तीला आज आपणा सर्वांमध्ये येऊन भगवान देवनारायण जी आणि त्यांच्या सर्व भक्तांचा आशीर्वाद प्राप्त करण्याचे हे पुण्य लाभले आहे. भगवान देवनारायण आणि जनता जनार्दन, दोन्हीचे दर्शन घेऊन मी आज धन्य झालो आहे. देशभरातून आलेल्या सर्व भाविकांप्रमाणेच मी भगवान देवनारायण यांच्याकडून अविरत राष्ट्रसेवेसाठी, गरिबांच्या कल्याणासाठी आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे.

राजस्थानच्या भिलवाडा येथे भगवान श्री देवनारायण जी यांच्या 1111 व्या ‘अवतरण महोत्सवा’च्या स्मरणार्थ झालेल्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

January 28th, 11:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानच्या भिलवाडा इथे, भगवान श्री देवनारायण जी यांच्या 1111 व्या ‘अवतरण महोत्सवा’च्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात संबोधित केले. यावेळी, पंतप्रधानांनी मंदिराचे दर्शन घेतले, परिक्रमा केली आणि त्या परिसरात कडुलिंबाच्या रोपट्याचे रोपणही केले. तिथल्या यज्ञशाळेत सुरू असलेल्या विष्णू महायज्ञात पंतप्रधानांनी पूर्णाहुतीही अर्पण केली. राजस्थानमधील लोक भगवान श्री देवनारायण जी यांची पूजा करतात आणि त्यांचे अनुयायी देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहेत.सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या महान कार्यासाठी त्यांचे स्मरण केले जाते.

आंतरराष्ट्रीय डेअरी महासंघाच्या जागतिक दुग्धव्यवसाय परिषद 2022 च्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

September 12th, 11:01 am

दुग्धव्यवसाय क्षेत्राशी संबंधित जगभरातील तज्ञ आणि संशोधक या परिषदेसाठी एकत्र आले आहेत, याचा मला आनंद होत आहे. जागतिक डेअरी शिखर परिषदेमध्ये विविध देशांतून आलेल्या सर्व मान्यवरांचे भारतातील कोट्यवधी प्राण्यांच्या वतीने, भारतातील कोट्यवधी नागरिकांच्या वतीने, भारत सरकारच्या वतीने मी मनःपूर्वक स्वागत करतो. “दुग्धव्यवसाय क्षेत्राचे खरे सामर्थ्य केवळ ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देत नाही तर जगभरातील कोट्यवधी लोकांच्या उपजीविकेचे देखील प्रमुख साधन आहे. मला विश्वास आहे, ही शिखर परिषद कल्पना, तंत्रज्ञान , कौशल्य आणि दुग्धव्यवसाय क्षेत्राशी संबंधित परंपरांच्या बाबतीत एकमेकांचे ज्ञान वाढवण्यात आणि एकमेकांकडून शिकण्यात मोठी भूमिका बजावेल.

PM inaugurates International Dairy Federation World Dairy Summit 2022 in Greater Noida

September 12th, 11:00 am

PM Modi inaugurated International Dairy Federation World Dairy Summit. “The potential of the dairy sector not only gives impetus to the rural economy, but is also a major source of livelihood for crores of people across the world”, he said.

पशुसंवर्धन विभाग आणि दुग्धव्यवसाय योजनांच्या विविध पैलूंची पुनर्रचना करण्यास व पशुधनासाठी विशेष पॅकेजपोटी 54,618 कोटी रुपयांची गुंतवणूक उभी करण्यास मंत्रिमंडळ समितीची मंजुरी

July 14th, 07:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने पशुसंवर्धन क्षेत्रातील वाढीस चालना देण्यासाठी आणि त्यायोगे पशुसंवर्धनातून अधिक मोबदला देण्याच्या दृष्टीने 2021-22 पासून पुढील 5 वर्षांसाठी भारत सरकारच्या योजनांच्या विविध घटकांची पुनर्रचना करून पशुसंवर्धन क्षेत्राच्या पॅकेज अंमलबजावणीस मान्यता दिली आहे. पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित असलेल्या 10 कोटी शेतकऱ्यांना याचा मोबदला मिळू शकेल. या पॅकेजमध्ये केंद्र सरकारच्या 9800 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनात्मक रकमेची 5 वर्षांच्या कालावधीसाठी योजना आखण्यात आली आहे, ज्यात एकूण 54,618 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा 5 वर्षांसाठी फायदा होईल.