ओदिशामध्ये भुवनेश्वर येथे विविध विकास कामांच्या पायाभरणी/उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
September 17th, 12:26 pm
ओदिशाचे राज्यपाल रघुबर दास जी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री मोहन मांझी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी जुआल ओराम जी, धर्मेंद्र प्रधान जी, अन्नपूर्णा देवी जी, ओदिशाचे उपमुख्यमंत्री के. व्ही. सिंहदेव जी, श्रीमती प्रभाती परिडा जी, खासदार, आमदार, देशाच्या कानाकोपऱ्यातून आज आमच्यासोबत उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि ओदिशामधील माझ्या बंधू-भगिनींनो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशामध्ये भुवनेश्वर येथे ‘सुभद्रा’ या सर्वात मोठ्या महिला-केंद्रित योजनेचा केला शुभारंभ
September 17th, 12:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशामध्ये भुवनेश्वर येथे ‘सुभद्रा’ या ओदिशा सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ केला. केवळ महिलांसाठीची ही सर्वात मोठी योजना असून, 1 कोटीहून अधिक महिलांना त्याचा लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे. पंतप्रधानांनी 10 लाखांहून अधिक महिलांच्या बँक खात्यात निधी हस्तांतरित करण्याची सुरुवातही केली. पंतप्रधान मोदी यांनी रु. 2800 कोटीहून अधिक खर्चाच्या रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी केली आणि त्याचे लोकार्पण केले, तसेच रु.1000 कोटींहून अधिक खर्चाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली. पंतप्रधानांनी पीएमएवाय-जी, अर्थात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत, सुमारे 14 राज्यांमधील जवळजवळ 10 लाख लाभार्थ्यांना मदतीचा पहिला हप्ता जारी केला, देशभरातील पीएमएवाय, अर्थात प्रधानमंत्री आवास योजनेच्या (ग्रामीण आणि शहरी) 26 लाख लाभार्थ्यांच्या गृहप्रवेश सोहळ्यात ते सहभागी झाले, आणि पीएमएवाय (ग्रामीण आणि शहरी) योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या घराच्या चाव्या सुपूर्द केल्या. त्यानंतर त्यांनी पीएमएवाय –जी साठी अतिरिक्त घरांच्या सर्वेक्षणासाठी Awaas+ 2024 ॲप चे उद्घाटन केले आणि प्रधानमंत्री आवास योजना - शहरी (पीएमएवाय – यु ) 2.0 च्या कार्यान्वयनाबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.पंतप्रधानांनी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथून पीएम स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधताना केलेले संबोधन
March 14th, 05:49 pm
आजचा पीएम स्वानिधी महोत्सव अशा लोकांना समर्पित आहे जे आपल्या आजूबाजूला राहतात आणि ज्यांच्याशिवाय आपल्या दैनंदिन जीवनाची कल्पना देखील करणे कठीण आहे. आणि कोविड दरम्यान, प्रत्येकाने फेरीवाल्यांची क्षमता अनुभवली आहेच. आज या सोहळ्यानिमित्त मी आमच्या प्रत्येक फेरीवाल्याचे, हातगाडी वाल्यांचे, पदपथ विक्रेत्याचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. आज देशाच्या कानाकोपऱ्यातून जोडलेल्या मित्रांनाही या पीएम स्वनिधीचा विशेष फायदा झाला आहे. आज एक लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे वर्ग करून पीएम स्वनिधी योजनेचा लाभ देण्यात आला आहे. आणि अधिक चांगली गोष्ट म्हणजे आज येथे दिल्ली मेट्रोच्या लाजपत नगर ते साकेत जी ब्लॉक आणि इंद्रप्रस्थ ते इंद्रलोक मेट्रो प्रकल्पाच्या विस्ताराची पायाभरणीही झाली आहे. दिल्लीकरांसाठी ही दुहेरी भेट आहे. मी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.पंतप्रधानांनी दिल्लीत पीएम स्वनिधीच्या लाभार्थ्यांना केले संबोधित
March 14th, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये पीएम स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांना संबोधित केले आणि या योजनेचा भाग म्हणून दिल्लीतील 5000 फेरीवाल्यांसह 1 लाख फेरीवाल्यांना (SVs) कर्जाचे वितरण केले. त्यांनी पाच लाभार्थ्यांच्या हाती पीएम स्वनिधी कर्जाचे धनादेश सुपूर्द केले. पंतप्रधानांनी दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्याच्या दोन अतिरिक्त मार्गिकांची पायाभरणी देखील केली.पंतप्रधानांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे 15,400 कोटी रुपयांच्या बहुविध ‘कनेक्टिव्हिटी’ प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी
March 06th, 01:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलकाता येथे 15,400 कोटी रुपयांच्या बहुविध ‘कनेक्टिव्हिटी’ प्रकल्पांचे लोकार्पण केले तसेच काही प्रकल्पांची पायाभरणी केली. शहरी वाहतूक क्षेत्राला पूरक असलेल्या विकास प्रकल्पांमध्ये मेट्रो रेल्वे आणि प्रादेशिक जलद परिवहन प्रणाली (आरआरटीएस) यांचा समावेश आहे.नवसारी येथील विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन तसेच लोकार्पण करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 22nd, 04:40 pm
गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, राज्य सरकारमधील मंत्री, या भागाचे प्रतिनिधित्व करणारे संसदेतील माझे सहकारी तसेच भारतीय जनता पार्टीचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील, संसद सदस्य तसेच आमदार आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कसे आहात तुम्ही सगळे?गुजरातमध्ये नवसारी येथे 47,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी आणि लोकार्पण
February 22nd, 04:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील नवसारी येथे 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी केली आणि लोकार्पणही केले. या प्रकल्पांमध्ये वीज निर्मिती, रेल्वे, रस्ते, वस्त्रोद्योग, शिक्षण, पाणीपुरवठा, कनेक्टिव्हिटी आणि शहरी विकास यासारख्या विस्तृत क्षेत्रांचा समावेश आहे.उत्तर प्रदेशातील लखनौ येथे उत्तर प्रदेश वैश्विक गुंतवणूक शिखर परिषदेतील प्रकल्पांच्या पायाभरणी कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 19th, 03:00 pm
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, ऊर्जावान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, उपस्थित मान्यवर, देश-परदेशातून आलेले औद्योगिक क्षेत्रातील सर्व प्रतिनिधी आणि माझ्या परिवारातील सदस्य! आज आपण इथे विकसित भारतासाठी विकसित उत्तर प्रदेश निर्मितीचा संकल्प करण्यासाठी एकत्रित जमलो आहोत. आणि मला असे सांगण्यात आले की, आत्ता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याबरोबर उत्तर प्रदेशातील 400 पेक्षा जास्त विधानसभा मतदार संघातील लक्षावधी लोक या कार्यक्रमाबरोबर जोडले गेले आहेत. जे लोक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सहभागी झाले आहेत, त्या सर्वांचेही मी अगदी मनापासून स्वागत करतो. 7-8 वर्षांपूर्वी आपण विचारही करू शकत नव्हतो की, उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक आणि नोकरीच्या संधी निर्माण होण्याविषयी असे वातावरण तयार होईल. त्या काळामध्ये जर कोणी म्हणाले असते की, उत्तर प्रदेश विकसित राज्य बनेल, तर कदाचित ते कोणी ऐकूनही घेतले नसते. त्यामुळे यावर कोणी विश्वास ठेवण्याचा तर प्रश्नच येत नव्हता. परंतु आज पहा, लक्षावधी कोटी रूपयांची गुंतवणूक उत्तर प्रदेशमध्ये केली जात आहे आणि मी उत्तर प्रदेशचा खासदार आहे. माझ्या उत्तर प्रदेशमध्ये ज्यावेळी असे काही चांगले घडते, त्यावेळी सर्वात जास्त आनंद मला होतो. आज हजारो प्रकल्पांवर काम सुरू होत आहे. कारखान्यांची उभारणी केली जात आहे. हे सर्व उद्योग सुरू होत आहेत, त्यांच्यामुळे उत्तर प्रदेशचे चित्रच बदलून जाणार आहे. सर्व गुंतवणूकदारांचे आणि विशेषतः उत्तर प्रदेशातील सर्व युवकांचे मी आज विशेष अभिनंदन करतो.उत्तर प्रदेशातील लखनौ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारत विकसित उत्तर प्रदेश’ कार्यक्रमाला केले संबोधित
February 19th, 02:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील लखनौ येथे ‘विकसित भारत विकसित उत्तर प्रदेश’ कार्यक्रमाला संबोधित केले. उत्तर प्रदेश जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद - 2023 च्या चौथ्या कार्यक्रमामध्ये राज्यासाठी 10 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मंजूर झालेल्या 14000 प्रकल्पांचा प्रारंभ यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. या प्रकल्पांमध्ये उत्पादन, अक्षय ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवा, अन्न प्रक्रिया, गृहनिर्माण आणि मालमत्ता, आदरातिथ्य, मनोरंजन आणि शिक्षण यांच्यासह इतर क्षेत्रांमधील उद्योग व्यवसायांचा समावेश आहे.पंतप्रधानांनी नमो भारत या प्रादेशिक वेगवान रेल्वेगाडीतून प्रवास केला
October 20th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नमो भारत या प्रादेशिक वेगवान रेल्वे गाडीला झेंडा दाखवून रवाना केले तसेच त्यांनी या गाडीतून प्रवास देखील केला.उत्तर प्रदेशातील मेरठ येथे मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाच्या पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 02nd, 01:01 pm
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल जी, येथील लोकप्रिय आणि उत्साही मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री संजीव बाल्यान जी, व्ही के सिंहजी, मंत्री श्री दिनेश खटीकजी , श्री उपेंद्र तिवारीजी, श्री कपिल देव अग्रवालजी , संसदेतील माझे सहकारी श्री सत्यपाल सिंहजी , राजेंद्र अग्रवालजी , विजयपाल सिंह तोमरजी , श्रीमती कांता कर्दमजी , आमदार भाई सोमेंद्र तोमरजी , संगीत सोमजी , जितेंद्र सतवालजी, सत्य प्रकाश अग्रवालजी, मेरठ जिल्हा परिषद अध्यक्ष गौरव चौधरीजी, मुझफ्फरनगर जिल्हा परिषद अध्यक्ष वीरपालजी, इतर सर्व लोकप्रतिनिधी आणि मेरठ-मुझफ्फरनगर, दूरदूरवरून आलेल्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, तुम्हा सर्वांना 2022 च्या खूप खूप शुभेच्छा.उत्तर प्रदेशात मेरठ येथे मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी
January 02nd, 01:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात मेरठ येथे मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी केली.अंदाजे 700 कोटी रुपये खर्चून या क्रीडा विद्यापीठाची स्थापना करण्यात येईल आणि सिंथेटिक हॉकी मैदान, फुटबॉल मैदान, बास्केटबॉल/व्हॉलीबॉल/हँडबॉल/कबड्डी मैदान, लॉन टेनिस कोर्ट, जिम्नॅशियम हॉल, सिंथेटिक रनिंग स्टेडियम, जलतरण तलाव, बहुउद्देशीय सभागृह आणि सायकल शर्यतीसाठी असणारे रिंगण यासह आधुनिक आणि अत्याधुनिक क्रीडा पायाभूत सुविधांनी हे विद्यापीठ सुसज्ज असेल. विद्यापीठात नेमबाजी, स्क्वॉश, जिम्नॅस्टिक्स, भारोत्तोलन, तिरंदाजी, कॅनोईंग आणि कयाकिंग इत्यादी सुविधाही उपलब्ध असतील.या विद्यापीठात 540 महिला आणि 540 पुरुष खेळाडूंसह 1080 खेळाडूंना प्रशिक्षण देण्याची क्षमता असेल.कानपूर मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 28th, 01:49 pm
उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी हरदीप पुरी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, साध्वी निरंजन ज्योती, भानुप्रताप वर्मा, उत्तर प्रदेश सरकारमधले मंत्री सतीश महाना, नीलिमा कटियार, रणवेंद्र प्रताप, लखन सिंह, अजीत पाल, इथे उपस्थित असलेले सर्व आदरणीय खासदार, सर्व आदरणीय आमदार, इतर सर्व लोकप्रतिनिधी आणि माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो! ऋषी आणि मुनींचे तपस्थान, स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतीकारकांचे प्रेरणा स्थान, स्वतंत्र भारतामध्ये औद्योगिक सामर्थ्याला शक्ती-ऊर्जा देणा-या कानपूरला माझे शत-शत प्रणाम! ज्या शहराने पंडित दीनदयाळ उपाध्याय, सुंदरसिंह भंडारी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या महान द्रष्ट्या नेत्यांचे नेतृत्व तयार करण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली ते कानपूर हे शहर आहे. आणि आज फक्त कानपूरला आनंद होतो आहे असे नाही, कार वरूणदेवालाही या आनंदामध्ये सहभागी होण्याची इच्छा झाली आहे.कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले उद्घाटन
December 28th, 01:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी, कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पाहणी केली आणि आयआयटी मेट्रो स्थानक ते गीता नगर पर्यंत मेट्रोने प्रवासही केला. बिना-पानकी मल्टीप्रोडक्ट पाईपलाईन प्रकल्पाचेही त्यांनी उद्घाटन केले. मध्य प्रदेशातल्या बिना तेल शुद्धीकरण कारखान्यापासून कानपूरमधल्या पानकी पर्यंतच्या या प्रकल्पामुळे बीना तेल शुद्धीकरण कारखान्यातली उत्पादने या प्रदेशासाठी सहजसाध्य राहणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.