नवी दिल्लीतील करिअप्पा संचलन मैदान येथे एनसीसी छात्रसैनिकांच्या रॅलीला पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन

January 27th, 05:00 pm

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राजनाथ सिंह जी, अजय भट्ट जी, तिन्ही दलांचे प्रमुख, सीडीएस जनरल अनिल चौहान जी, संरक्षण सचिव, एनसीसीचे महासंचालक , सर्व अतिथी आणि एनसीसीचे माझे तरुण मित्रांनो...

पंतप्रधानांनी करिअप्पा परेड ग्राउंड, दिल्ली येथे एनसीसी पीएम रॅलीला केले संबोधित

January 27th, 04:30 pm

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की ते स्वत: एनसीसीचे माजी छात्रसैनिक असल्यामुळे एनसीसी कॅडेट्सबरोबर उपस्थित असताना त्या आठवणी जाग्या होणे स्वाभाविक आहे. “एनसीसी कॅडेट्सबरोबर उपस्थित राहताना एक भारत श्रेष्ठ भारत’ची प्रचिती येते”, असे सांगत पंतप्रधान म्हणाले की देशाच्या विविध भागांतील छात्रसैनिक इथे उपस्थित असल्याचे त्यांना आढळले आहे. एनसीसीची व्याप्ती सातत्याने वाढत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि आजचा हा प्रसंग एक नवीन सुरुवात असल्याचे नमूद केले. व्हायब्रंट व्हिलेज योजनेंतर्गत सरकार विकसित करत असलेल्या सीमावर्ती भागातील गावांचे 400 हून अधिक सरपंच आणि देशभरातील बचत गटांमधील 100 हून अधिक महिला इथे उपस्थित असल्याचे त्यांनी नमूद केले .

पंतप्रधानांचा 19 जानेवारीला महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू दौरा

January 17th, 09:32 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूला भेट देणार आहेत. पंतप्रधान सकाळी सुमारे 10:45 वाजता, महाराष्ट्रातील सोलापूर येथे अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. दुपारी 2:45 च्या सुमारास, पंतप्रधान कर्नाटकातील बेंगळुरू येथे बोइंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्राचे उद्‌घाटन करतील आणि बोईंग सुकन्या कार्यक्रमाचा शुभारंभ करतील. त्यानंतर, संध्याकाळी 6 वाजता, पंतप्रधान तामिळनाडूमधील चेन्नई येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 च्या उद्घाटन समारंभात सहभागी होतील.

सावित्रीबाई फुले आणि राणी वेलू नचियार यांना त्यांच्या जयंतीदिनी पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

January 03rd, 08:09 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावित्रीबाई फुले आणि राणी वेलू नचियार यांना त्यांच्या जयंतीदिनी आदरांजली वाहिली आहे. या दोघींनीही आपल्या करुणेने आणि धैर्याने समाजाला प्रेरित केले. त्यांनी राष्ट्रासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे, असे मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी 'मन की बात मधील काही उतारेही सामायिक केले ज्यात त्यांनी सावित्रीबाई फुले आणि राणी वेलू नचियार यांच्याविषयी आपले मत व्यक्त केले आहे.

मन की बात, डिसेंबर 2023

December 31st, 11:30 am

नमस्कार, माझ्या प्रिय देशवासियांनो. ‘मन की बात’ म्हणजे तुम्हां सगळ्यांना भेटण्याची एक शुभ संधीच, आणि जेव्हा आपण आपल्या कुटुंबियांना भेटतो तो क्षण खूपच आनंददायी आणि समाधानकारक असतो. ‘मन की बात’ च्या माध्यमातून मी जेव्हा तुम्हाला भेटतो तेव्हा मला देखील हाच अनुभव येतो, आणि आज आपल्या एकत्रित प्रवासाचा हा 108 वा भाग आहे. आपल्याकडे 108 या अंकाचे महत्व, त्याचे पावित्र्य हा एक सखोल अध्ययनाचा विषय आहे. जपमाळेतील 108 मणी, 108 वेळा होणारा जप, 108 दिव्य क्षेत्र, मंदिरांच्या 108 पायऱ्या, 108 घंटा, 108 हा आकडा अपार श्रद्धेशी निगडीत आहे. म्हणूनच ‘मन की बात’ चा हा 108 वा भाग माझ्यासाठी अजूनच खास झाला आहे. या 108 भागांमध्ये आपण लोकसहभागाची अनेक उदाहरणे पहिली आहेत, त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे. आता या टप्प्यावर पोहोचल्यानंतर, आपल्याला नवीन जोमाने, नवीन उर्जेसह आणि अधिक वेगाने आगेकूच करण्याचा संकल्प केला पाहिजे. उद्याचा सूर्योदय हा 2024 चा पहिला सूर्योदय असणार आहे हा किती सुखद योगायोग आहे; आपण 2024 मध्ये प्रवेश केला असेल. तुम्हां सर्वाना 2024 च्या हार्दिक शुभेच्छा.

राणी वेलू नचियार यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

January 03rd, 11:52 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणी वेलू नचियार यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.

राणी वेलू नचियार यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांचे पुण्यस्मरण केले

January 03rd, 11:49 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणी वेलू नचियार यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली आहे.