झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली
November 19th, 08:41 am
झाशीची निर्भीड राणी लक्ष्मीबाई, या शौर्य आणि देशभक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप आहेत असे सांगत, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज, त्यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.नवी दिल्लीतील करिअप्पा संचलन मैदान येथे एनसीसी छात्रसैनिकांच्या रॅलीला पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन
January 27th, 05:00 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राजनाथ सिंह जी, अजय भट्ट जी, तिन्ही दलांचे प्रमुख, सीडीएस जनरल अनिल चौहान जी, संरक्षण सचिव, एनसीसीचे महासंचालक , सर्व अतिथी आणि एनसीसीचे माझे तरुण मित्रांनो...पंतप्रधानांनी करिअप्पा परेड ग्राउंड, दिल्ली येथे एनसीसी पीएम रॅलीला केले संबोधित
January 27th, 04:30 pm
उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की ते स्वत: एनसीसीचे माजी छात्रसैनिक असल्यामुळे एनसीसी कॅडेट्सबरोबर उपस्थित असताना त्या आठवणी जाग्या होणे स्वाभाविक आहे. “एनसीसी कॅडेट्सबरोबर उपस्थित राहताना एक भारत श्रेष्ठ भारत’ची प्रचिती येते”, असे सांगत पंतप्रधान म्हणाले की देशाच्या विविध भागांतील छात्रसैनिक इथे उपस्थित असल्याचे त्यांना आढळले आहे. एनसीसीची व्याप्ती सातत्याने वाढत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि आजचा हा प्रसंग एक नवीन सुरुवात असल्याचे नमूद केले. व्हायब्रंट व्हिलेज योजनेंतर्गत सरकार विकसित करत असलेल्या सीमावर्ती भागातील गावांचे 400 हून अधिक सरपंच आणि देशभरातील बचत गटांमधील 100 हून अधिक महिला इथे उपस्थित असल्याचे त्यांनी नमूद केले .राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वाहिली आदरांजली
November 19th, 11:11 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला शक्तीच्या शौर्याचे प्रतीक असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण आदरांजली वाहिली.राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून त्यांचे स्मरण
November 19th, 08:58 am
राणी लक्ष्मीबाई जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्मरण केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांचे धैर्य आणि आपल्या देशासाठी दिलेले अतुलनीय योगदान कधीही विसरता येणार नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 76 व्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरुन केले भाषण
August 15th, 02:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 76 व्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरुन केले भाषण76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन
August 15th, 07:01 am
स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. खूप-खूप शुभेच्छा. केवळ हिंदुस्तानच्या कानाकोपऱ्यातल्या नव्हे तर जगभरातल्या ठिकठिकाणी आज कोणत्या ना कोणत्या स्वरुपात भारतीयांद्वारा किंवा भारताप्रती अपार प्रेम असणाऱ्या जगातल्या कानाकोपऱ्यात आपला तिरंगा आन-बान-शान दर्शवत डौलाने फडकत आहे. जगभरातल्या भारतप्रेमी, भारतीयांना स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.आजचा हा दिवस ऐतिहासिक दिवस आहे. एक पुण्य टप्पा , एक नवा मार्ग, एक नवा संकल्प,आणि नव्या सामर्थ्याने पुढे वाटचाल करण्याची ही शुभ संधी आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात, गुलामीचा संपूर्ण कालखंड, संघर्षात गेला आहे.भारताचा 76 वा स्वातंत्र्यदिन सोहळा
August 15th, 07:00 am
पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना विविधता हीच भारताची ताकद असल्याचे स्पष्ट केले. देश लोकशाहीची जननी असल्याचे सांगून विकसित भारताचे ध्येय, वसाहतवादी मानसिकतेच्या सर्व खुणा पुसून टाकणे, आपले मूळ तसेच एकतेचा आणि कर्तव्यभावनेचा अभिमान बाळगणे- हे 'अमृत काल'चे 'पंच प्राण' त्यांनी विशद केलेबर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंशी पंतप्रधानांनी साधलेला संवाद
August 13th, 11:31 am
सर्वांशी बोलणं माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायक असतं, मात्र सर्वांशी बोलणं शक्य नसतं. तरी वेगवेगळ्या वेळी आपल्यापैकी अनेक जणांशी कोणत्या ना कोणत्या स्वरुपात संपर्कात राहण्याची मला संधी मिळाली आहे, बोलण्याची संधी मिळाली आहे, पण माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे, की वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या निवासस्थानी आलात आणि परिवाराच्या सदस्याच्या रुपात आले आहात. तर, तुमच्या यशाचा जसा प्रत्येक हिंदुस्तानी नागरिकाला अभिमान आहे, तसाच मला देखील तुमच्याशी जोडले जाण्याचा अभिमान आहे. तुम्हां सर्वांचं माझ्याकडे खूप-खूप स्वागत आहे.राष्ट्रकुल स्पर्धा 2022 च्या भारतीय पथकाचा पंतप्रधानांनी केला सत्कार
August 13th, 11:30 am
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा(CWG) 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय पथकाचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यामध्ये क्रीडापटू आणि त्यांचे प्रशिक्षक सहभागी झाले होते. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि माहिती आणि प्रसारणमंत्री अनुरागसिंह ठाकूर आणि युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक या सोहळ्याला उपस्थित होते.भारताच्या विकास गाथेचा हाच टर्निंग पॉईंटः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
November 28th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज आपण पुन्हा एकदा मन की बात साठी एकमेकांसमोर आलो आहोत. अवघ्या दोन दिवसानंतर डिसेंबर महिना सुरू होणार आहे आणि डिसेंबर महिना आला की मनाला असे वाटू लागते की चला, हे वर्ष संपले. हा वर्षाचा शेवटचा महिना आहे आणि या महिन्यात आपण नव्या वर्षासाठीचे संकल्प विचारात घेऊ लागतो. या महिन्यात आपला देश नौदल दिवस आणि सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा करतो. येत्या 16 डिसेंबर रोजी आपला देश 1971च्या युद्धाचे स्वर्ण जयंती वर्ष साजरे करत आहे, हे आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. या सर्व दिनविशेषांनिमित्त मी देशाच्या संरक्षण दलांचे स्मरण करतो, आपल्या वीरांचे स्मरण करतो. आणि विशेष म्हणजे अशा वीरांना जन्म देणाऱ्या वीर मातांचे स्मरण करतो. नेहमीप्रमाणेच या वेळीसुद्धा मला नमो ॲप आणि माय गव्ह वर आपणा सर्वांकडून अनेक सूचना प्राप्त झाल्या आहेत. आपण सर्वांनीच मला आपल्या कुटुंबाचा एक भाग मानले आहे आणि आपल्या आयुष्यातली सुख-दुःखे माझ्यासोबत वाटून घेतली आहेत. या सर्वांमध्ये अनेक युवा आहेत, विद्यार्थी- विद्यार्थिनी आहेत. मन की बात चे आपले हे कुटुंब सातत्याने वाढते आहे, मनांशीही जोडले जाते आहे, उद्दिष्टांनीही जोडले जाते आहे आणि परिणामी दृढ होणाऱ्या आपल्या या नात्यामुळे आपल्या अंतर्मनात सातत्याने सकारात्मकतेचा एक प्रवाह खेळता राहतो आहे.उत्तर प्रदेशातील झाशी येथे 'राष्ट्र रक्षा समर्पण पर्व' मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 19th, 05:39 pm
जौन धरती पै हमाई रानी लक्ष्मीबाई जू ने, आजादी के लाने, अपनो सबई न्योछार कर दओ, वा धरती के बासियन खों हमाऔ हाथ जोड़ के परनाम पौंचे। झाँसी ने तो आजादी की अलख जगाई हती। इतै की माटी के कन कन में, बीरता और देस प्रेम बसो है। झाँसी की वीरांगना रानी लक्ष्मी बाई जू को, हमाओ कोटि कोटि नमन।उत्तर प्रदेशातील झाशी येथे ‘राष्ट्र रक्षा समर्पण पर्व’ला पंतप्रधानांची उपस्थिती
November 19th, 05:38 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील झाशी येथे ‘राष्ट्र रक्षा समर्पण पर्व’ला उपस्थिती दर्शवली. झाशी किल्ल्याच्या परिसरात आयोजित ‘राष्ट्र रक्षा समर्पण पर्व’ या भव्य समारंभात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्रालयाच्या अनेक नवीन उपक्रमांचे राष्ट्रार्पण केले. या प्रकल्पांमध्ये एनसीसी म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या माजी छात्र संघटनेचा शुभारंभ, या संघटनेत पंतप्रधानांनी पहिले सदस्य म्हणून नोंदणी केली ; यासह एनसीसी छात्रांसाठी सदृशीकरण प्रशिक्षणाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा शुभारंभ; राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे हुतात्मा वीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उभारलेला मंडप ; राष्ट्रीय युद्ध स्मारक मोबाईल अॅप; भारतीय नौदलाच्या जहाजांसाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने आरेखन आणि विकसित केलेले अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट 'शक्ती'; हलके लढाऊ हेलिकॉप्टर आणि ड्रोन यांचा समावेश आहे. उत्तरप्रदेश संरक्षण औद्योगिक मार्गिकेच्या झाशी नोड येथे भारत डायनॅमिक्स लिमिटेडच्या 400 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी त्यांनी केली.पंतप्रधानांनी राणी लक्ष्मीबाईंना त्यांच्या जयंतीनिमित्त केले नमन
November 19th, 10:31 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.निवारा, वीज, शौचालये, गॅस, रस्ते, रुग्णालये आणि शाळा यांसारख्या मुलभूत सुविधा नसण्याचे परिणाम महिलांना विशेषतः गरीब महिलांना भोगावे लागतात : पंतप्रधान
August 10th, 10:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महिला सबलीकरणाबाबतच्या सरकारच्या दृष्टीकोनाचे सविस्तर विवेचन केले. घर, वीज, शौचालये, गॅस, रस्ते, रुग्णालये आणि शाळा यांसारख्या सुविधा उपलब्ध नसण्याचा परिणाम महिलांनाच विशेषतः गरीब महिलांना अधिक प्रमाणात भोगावे लागतात असं ते म्हणाले. आता आपण स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश करत असताना गेल्या सात दशकातील प्रगतीचा वेध घेताना या मुलभूत प्रश्नांना काही दशकांपूर्वीच हात घातला जायला हवा होता अशी अटळ भावना मनात येते. आज उत्तर प्रदेशातील माहोबामध्ये उज्ज्वला 2.0 योजनेचा आरंभ दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करताना ते बोलत होते.उज्ज्वला 2.0 योजनेच्या उत्तर प्रदेशात झालेल्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
August 10th, 12:46 pm
आज आपल्या सर्वांबरोबर संवाद साधण्याची संधी मिळाली आणि माझ्यासाठी आनंदाची गोष्ट अशी आहे की, आता थोड्या दिवसांतच राखी पौर्णिमेचा सणही येतोय. आज मला या सणाच्या आधीच, ॲडव्हान्समध्ये माता-भगिनींचे आशीर्वाद मिळत आहेत. आणि त्याचबरोबर या काळात देशातल्या कोट्यवधी गरीब, दलित, वंचित, मागास, आदिवासी कुटुंबातल्या भगिनींना आज आणखी एक भेट देण्याची संधी मिळाली आहे. आज उज्ज्वला योजनेच्या पुढच्या टप्प्यामध्ये अनेक भगिनींना मोफत गॅस जोडणी आणि गॅस शेगडी मिळत आहे. या सर्व लाभार्थींचे मी पुन्हा एकदा खूप-खूप अभिनंदन करतो.पंतप्रधानांकडून उत्तर प्रदेशात महोबा येथे उज्ज्वला 2.0 योजनेचा शुभारंभ
August 10th, 12:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात महोबा येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून स्वयंपाकाच्या गॅसच्या (एलपीजी) जोडण्या देऊन उज्ज्वला 2.0 (प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- पीएमयूवाय) योजनेचा शुभारंभ केला. या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधानांनी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या महान व्यक्तींना पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली
March 12th, 03:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्य चळवळीतील सर्व स्वातंत्र्यसैनिक, चळवळ, उठाव आणि संघर्ष यांना आदरांजली वाहिली. त्यांनी चळवळी, संघर्ष आणि व्यक्तिमत्त्वांना विशेष आदरांजली वाहिली , ज्यांना भारताच्या गौरवशाली स्वातंत्र्यलढय़ातील कथेत योग्य ओळख मिळाली नाही. आज अहमदाबादच्या साबरमती आश्रमात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (भारत @ 75) सुरू केल्यानंतर ते बोलत होते.‘आझादी का अमृत महोत्सव’ यानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 12th, 10:31 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद इथे साबरमती आश्रमातून पदयात्रेला ( स्वातंत्र्य यात्रा) हिरवा झेंडा दाखवला. ‘आजादी का अमृत महोत्सव’ India@75 साठीच्या कार्यक्रमांचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. India@75 साठी विविध सांस्कृतिक आणि डिजिटल उपक्रमांचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते.‘आजादी का अमृत महोत्सव’ India@75 साठीच्या कार्यक्रमांचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन
March 12th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद इथे साबरमती आश्रमातून पदयात्रेला ( स्वातंत्र्य यात्रा) हिरवा झेंडा दाखवला. ‘आजादी का अमृत महोत्सव’ India@75 साठीच्या कार्यक्रमांचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. India@75 साठी विविध सांस्कृतिक आणि डिजिटल उपक्रमांचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते.