रामोजी राव यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले.

June 08th, 11:33 am

रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये क्रांती घडवून आणणारे रामोजी राव हे दूरदर्शी होते, असे मोदी यांनी म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या अतिशय भरीव योगदानामुळे पत्रकारिता आणि चित्रपट विश्वावर अमिट ठसा उमटवला आहे. त्यांनी आपल्या उल्लेखनीय कार्याद्वारे प्रसारमाध्यम आणि मनोरंजन विश्वात नवोन्मेष आणि उत्कृष्टता यांचे नवे मापदंड प्रस्थापित केले.