स्थानिक खेळण्यांना वाव देण्यासाठी त्यांचा प्रसार करण्याची (व्होकल फॉर लोकल होण्याची) वेळ आली आहे – पंतप्रधानांनी ‘मन की बात’ मध्ये व्यक्त केले मत
August 30th, 03:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ या आकाशवाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. विविध विषयांबरोबरच त्यांनी या ताज्या कार्यक्रमामध्ये मुलांच्या खेळण्यांविषयी मनोगत व्यक्त केले. गांधीनगरची ‘चिल्ड्रेन युनिव्हर्सिटी, महिला आणि बाल विकास मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आणि सूक्ष्म-लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने मुलांसाठी चांगल्या दर्जाची खेळणी कशी बनविणे आवश्यक आहे, याविषयी काम केल्याचे सांगितले. खेळणी निर्मिती, उत्पादनामध्ये भारत एक मोठे केंद्र कसे बनू शकते, याच्याविषयी काम करीत असल्याचे सांगितले. मुलांच्या दृष्टीने खेळणी म्हणजे केवळ वेगवेगळ्या क्रियाकलापांचे साधन नाही, तर बालकांच्या आकांक्षांना पंख लावण्याचे काम खेळणी करतात. खेळण्यांमुळे मुलांचे केवळ मन रमते, मुलांचे मनोरंजन होते, असे नाही, तर खेळणी मुलांच्या मनाची निर्मिती करतात, त्यांना काही करण्याचा हेतू निर्माण करतात, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.