उत्तर प्रदेशात बुलंद शहरमध्ये विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
January 25th, 02:00 pm
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, या ठिकाणचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उप-मुख्यमंत्री ब्रिजेश पाठक जी, केंद्रीय मंत्री व्ही. के सिंह जी, उत्तर प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष भूपेंद्र चौधरी, इतर प्रतिनिधी मंडळी आणि बुलंदशहरातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे 19,100 कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण आणि पायाभरणी
January 25th, 01:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे 19,100 कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. हे प्रकल्प रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू आणि शहरी विकास आणि गृहनिर्माण यां सारख्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांशी संबंधित आहेत.अयोध्येत श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
January 22nd, 05:12 pm
आज आपले राम आले आहेत, शतकांच्या प्रतीक्षेनंतर आपले राम आले आहेत, शतकांचे अभूतपूर्व धैर्य, अगणित बलिदाने, त्याग आणि तपस्येनंतर आपले प्रभू राम आले आहेत. या शुभ प्रसंगी, आपल्या सर्वांचे, समस्त देशबांधवांचे खूप खूप अभिनंदन !अयोध्येतील नवनिर्मित श्री रामजन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान सहभागी
January 22nd, 01:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशात अयोध्येतील नवनिर्मित श्री रामजन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा (अभिषेक) सोहळ्यात सहभागी झाले. श्री रामजन्मभूमी मंदिराच्या उभारणीत योगदान देणाऱ्या श्रमजीवींशी मोदी यांनी संवाद साधला.पीएम-जनमन योजने अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या एक लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता जारी करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 15th, 12:15 pm
जोहार, राम-राम। सध्या देशात उत्सवाचे वातावरण आहे. उत्तरायण, मकर संक्रांती, पोंगल, बिहू अशा अनेक सणांचा उत्साह सर्वत्र दिसून येत आहे. आजच्या या कार्यक्रमामुळे हा उत्साह अधिकच दिमाखदार आणि चैतन्यमय झाला आहे, आणि तुमच्याशी बोलणे, ही माझ्यासाठी मोठी पर्वणी ठरली आहे. आज एकीकडे अयोध्येत दिवाळी साजरी होत आहे, तर दुसरीकडे माझे एक लाख वंचित आदिवासी बंधू-भगिनी, जे माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत, माझे हे आदिवासी कुटुंबीय, अती वंचित आदिवासी कुटुंब, त्यांच्या घरी दिवाळी साजरी होत आहे, ही माझ्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे. आज त्यांच्या बँक खात्यात पक्क्या घरासाठी पैसे जमा केले जात आहेत. या सर्व कुटुंबांचे मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो. हे पुण्य कर्म करण्याची संधी मला मिळाली, ही माझ्या जीवनातील अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.पंतप्रधानांनी पीएम-जनमन अंतर्गत पंतप्रधान आवास योजना(ग्रामीण)च्या एक लाख लाभार्थ्यांना जारी केला पहिला हप्ता
January 15th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान (PM-JANMAN)अंतर्गत पंतप्रधान आवास योजना(ग्रामीण) (PMAY - G)च्या एक लाख लाभार्थ्यांना आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पहिला हप्ता जारी केला. यावेळी पंतप्रधानांनी पीएम-जनमनच्या लाभार्थ्यांसोबत संवाद देखील साधला.श्री राम लल्ला यांच्या स्वागताप्रित्यर्थ स्वाती मिश्रा यांनी सादर केलेले भजन मंत्रमुग्ध करणारे : पंतप्रधान
January 03rd, 08:07 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री राम लल्ला यांच्या स्वागताप्रित्यर्थ स्वाती मिश्रा यांनी गायलेले भक्तीमय भजन सामायिक केले आहे. हे भजन मंत्रमुग्ध करणारे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.अयोध्यातल्या विविध विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 30th, 02:15 pm
अयोध्येच्या सर्व लोकांना माझे नमस्कार. आज सर्व जग उत्सुकतेने 22 जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत आहे. अशावेळी अयोध्यावासीयांमध्ये असलेला हा उत्साह, उत्सुकता अगदी साहजिक आहे. मी भारताच्या मातीच्या कणाकणाचा आणि व्यक्ती व्यक्तीचा पुजारी आहे आणि आपल्या प्रमाणे मीसुद्धा तितकाच उत्सुक आहे. आपल्या सर्वांचा हा उत्साह, ही उत्सुकता थोड्या वेळापूर्वी अयोध्येच्या रस्त्यांवर देखील दिसून येत होती. असं वाटत होतं की संपूर्ण अयोध्या नगरीच रस्त्यावर उतरली आहे. हे प्रेम, हा आशीर्वाद यासाठी मी आपले मनापासून आभार मानतो. माझ्याबरोबर म्हणा सियावर रामचंद्र की जय सियावर रामचंद्र की जय सियावर रामचंद्र की जयपंतप्रधानांनी अयोध्या धाम येथे 15,700 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी
December 30th, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्या धाम येथे 15,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमीपूजन केले. यामध्ये अयोध्या आणि सभोवतालच्या भागांच्या विकासाच्या 11,100 कोटी रुपये खर्चाच्या आणि उत्तर प्रदेशातील 4,600 कोटी रुपये खर्चाच्या इतर प्रकल्पांचा समावेश आहे.140 कोटी जनता अनेक बदल घडवून आणत आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
November 26th, 11:30 am
‘मन की बात’ मध्ये आपले स्वागत आहे. आज 26 नोव्हेंबर. हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. याच दिवशी आपल्या देशावर सर्वात भीषण दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी मुंबई आणि संपूर्ण देशच हादरवून टाकला होता. पण हेच भारताचे सामर्थ्य आहे की त्या हल्ल्यातून आपण सावरलो आणि आता अत्यंत धैर्याने दहशतवादाचा पाडाव करत आहोत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी आपले प्राण गमावले त्या सर्वाना मी श्रद्धांजली अर्पण करतो. या हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आपल्या शूरवीरांचे आज देश स्मरण करत आहे.