रामायण आणि महाभारताच्या अरबी भाषेतील भाषांतराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब्दुल्ला अल - बरौन आणि अब्दुल लतीफ अल - नसेफ यांची केली प्रशंसा

December 21st, 07:03 pm

रामायण आणि महाभारताचे अरबी भाषेत भाषांतर करून, हे भाषांतरीत साहित्य प्रकाशित करण्यासाठीच्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब्दुल्ला अल - बरौन आणि अब्दुल लतीफ अल - नसेफ यांची प्रशंसा केली आहे.

आज जगभरातील लोकांना भारताबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

October 27th, 11:30 am

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! ‘मन की बात’ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण कोणते असे कोणी विचारले तर अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतात, पण एक क्षण असा आहे जो अत्यंत विशेष आहे, तो क्षण आहे, जेव्हा मी गेल्या वर्षी १५ नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा ह्यांच्या जयंतीदिनी झारखंडमधील त्यांच्या जन्मस्थानी उलिहाटू गावाला भेट दिली होती. या प्रवासाचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. मी देशाचा पहिला पंतप्रधान आहे, ज्याला या पवित्र भूमीची धूळ (माती) मस्तकावर लावण्याचे भाग्य लाभले. त्या क्षणी मला स्वातंत्र्यलढ्याची ताकद तर जाणवलीच पण या मातीतील शक्तीशी जोडले जाण्याची संधीही मिळाली. मला जाणवले की संकल्प पूर्ण करण्याचे धाडस देशातील कोट्यवधी लोकांचे भविष्य कसे बदलू शकते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाओ रामायणाच्या सादरीकरणाला उपस्थिती

October 10th, 01:47 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी लाओस येथे लुआंग प्रबांगच्या प्रतिष्ठित रॉयल थिएटरने सादर केलेल्या लाओ रामायणाच्या सादरीकरणाला उपस्थित राहिले. लाओ रामायणाला फलक फलम किंवा फ्रा लक फ्रा राम असेही म्हणतात. लाओसमध्ये रामायणाचा उत्सव साजरा केला जात असून, हे महाकाव्य दोन्ही देशांमधील सामायिक वारसा आणि प्राचीन सांस्कृतिक संबंध प्रतिबिंबित करते. लाओसमध्ये भारतीय संस्कृती आणि परंपरेचे अनेक पैलू शतकानुशतके आचरणात आणले गेले आहेत, आणि त्याचे जतन करण्यात आले आहे. दोन्ही देश आपापल्या सामायिक वारशाच्या संवर्धनासाठी एकत्र येऊन काम करत आहेत. लाओसमधील वात फू मंदिर आणि संबंधित स्मारके पुनर्संचयित करण्याच्या कामात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचा सहभाग आहे.

The dreams of crores of women, poor and youth are Modi's resolve: PM Modi

February 18th, 01:00 pm

Addressing the BJP National Convention 2024 at Bharat Mandapam, Prime Minister Narendra Modi said, “Today is February 18th, and the youth who have reached the age of 18 in this era will vote in the country's 18th Lok Sabha election. In the next 100 days, you need to connect with every new voter, reach every beneficiary, every section, every community, and every person who believes in every religion. We need to gain the trust of everyone.

PM Modi addresses BJP Karyakartas during BJP National Convention 2024

February 18th, 12:30 pm

Addressing the BJP National Convention 2024 at Bharat Mandapam, Prime Minister Narendra Modi said, “Today is February 18th, and the youth who have reached the age of 18 in this era will vote in the country's 18th Lok Sabha election. In the next 100 days, you need to connect with every new voter, reach every beneficiary, every section, every community, and every person who believes in every religion. We need to gain the trust of everyone.

रामायणातील भावस्पर्शी शबरी भागावर आधारित मैथिली ठाकूर यांनी गायलेले गाणे पंतप्रधानांनी केले सामायिक

January 20th, 09:22 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैथिली ठाकूर यांनी रामायणातील भावनिक शबरी भागावर आधारित गायलेले गाणे सामायिक केले आहे.

महाराष्ट्रात सोलापूर येथे विविध प्रकल्पांचा प्रारंभ करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 19th, 12:00 pm

पंढरपूरचा विठ्ठल आणि सिद्धेश्वर महाराज यांना मी नमस्कार करीत आहे. हा काळ आपल्या सर्वांसाठी भक्तिभावाने भारलेला आहे. 22 जानेवारीला तो ऐतिहासिक क्षण येणार आहे जेव्हा आपले प्रभू राम त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. आपल्या सर्वांच्या आराध्याचं दर्शन तंबूत घेण्याची अनेक दशकांची जुनी वेदना आता दूर होणार आहे.

महाराष्ट्रातील सोलापूर येथे सुमारे 2,000 कोटी रुपयांच्या 8 अमृत प्रकल्पांची पंतप्रधानांनी केली पायाभरणी

January 19th, 11:20 am

महाराष्ट्रातील सोलापूर येथे सुमारे 2,000 कोटी रुपयांच्या 8 अमृत (अटल कायाकल्प आणि शहरी परिवर्तन अभियान) प्रकल्पांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पायाभरणी केली. महाराष्ट्रात पीएमएवाय-शहरी अंतर्गत पूर्ण झालेली 90,000 हून अधिक घरे आणि सोलापूरमधील रेनगर गृहनिर्माण सोसायटीची 15,000 घरे पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केली. याच्या लाभार्थ्यांमध्ये हजारो हातमाग कामगार, विक्रेते, यंत्रमाग कामगार, कचरा वेचणारे, बिडी कामगार, वाहनचालक आणि इतरांचा समावेश आहे. या कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्रातील पीएम-स्वनिधीच्या 10,000 लाभार्थ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यांच्या वितरणाची सुरुवातही त्यांनी केली. अयोध्या धाम येथील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्यानिमित्ताने संपूर्ण देश भक्ती रसात न्हाऊन निघाला आहे. “अनेक दशकांपासून तंबूत प्रभु रामांचे दर्शन घ्यावे लागण्याची वेदना आता दूर होईल, असे उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले. संत आणि साधूंच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत समर्पण आणि वचनबद्धतेसह 11 दिवसांच्या अनुष्ठानाचे नियम आणि व्रत ते पाळत आहेत तसेच सर्व नागरिकांच्या आशीर्वादाने प्राण प्रतिष्ठा आयोजित करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील नाशिक येथील पंचवटी येथे त्यांच्या 11 दिवसांच्या विशेष विधींचा शुभारंभ झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. भक्तीच्या या मंगल समयी महाराष्ट्रातील एक लाखाहून अधिक कुटुंबांचे 'गृहप्रवेश' होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. 22 जानेवारीच्या संध्याकाळी ही 1 लाख कुटुंबे त्यांच्या पक्क्या घरांमध्ये राम ज्योती प्रज्वलित करतील ही अतिशय आनंदाची बाब आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या विनंतीवरून लोकांनी त्यांचे मोबाईल फ्लॅश चालू करून राम ज्योतीची प्रतिज्ञा केली. पंतप्रधानांनी आज शुभारंभ झालेल्या प्रकल्पांबद्दल या भागातील जनतेचे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे अभिनंदन केले. महाराष्ट्राच्या गौरवासाठी महाराष्ट्रातील जनतेने केलेल्या मेहनतीचे आणि पुरोगामी राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

पंतप्रधान येत्या 20-21 जानेवारीला, तामिळनाडू इथल्या विविध मंदिरांत जाऊन घेणार देवदर्शन

January 18th, 06:59 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी, येत्या 20 -21 जानेवारी 2024 रोजी, तामिळनाडूतील काही महत्वाच्या मंदिरात दर्शन देणार आहेत.

पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी, लेपाक्षी इथल्या वीरभद्र मंदिरात दर्शन घेत केली पूजा

January 16th, 06:13 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी जवळच्या लेपाक्षी इथल्या वीरभद्र मंदिरात दर्शन आणि पूजा केली. मोदी यांनी तेलगू भाषेतील, रंगनाथ रामायणातील कवने ऐकली आणि आंध्र प्रदेशातील थोलू बोम्मालता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पारंपरिक छाया कठपुतळी कला प्रकाराअंतर्गत, सादर केलेली जटायूची कथाही पाहिली.

आई श्री सोनल मातेच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश

January 13th, 12:00 pm

वर्तमान गादीपति- पूज्य कंचन माता व्यवस्थापक- पूज्य गिरीश आपा पौषच्या पवित्र महिन्यात आज आपण सगळे आई श्री सोनल मातेच्या जन्मशताब्दी सोहळ्याला उपस्थित आहोत. आई श्री सोनल मातेच्या आशीर्वादामुळेच मला या पवित्र सोहळ्याच्या आयोजनात सहभागी होण्याचे सौभाग्य लाभले आहे. मी संपूर्ण चारण समाजाचे, सर्व व्यवस्थापकांचे आणि सोनल मातेच्या सर्व भक्तांचे अभिनंदन करतो. मधडा धाम हे चारण समाजासाठी श्रद्धेचे केंद्र आहे , शक्तीचे केंद्र आहे , संस्कार आणि परंपरांचे केंद्र आहे. श्री सोनल मातेच्या चरणी मी विनम्र अभिवादन करतो.

पंतप्रधानांनी आई श्री सोनल माता यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाला व्हिडिओ संदेशाद्वारे केले संबोधित

January 13th, 11:30 am

तीन दिवसीय जन्मशताब्दी सोहळ्यामध्ये आलेल्या सोनल माता यांच्या आठवणी आपल्यासमवेत आहेत असे त्यांनी नमूद केले आणि सांगितले की कोणत्याही युगामध्ये भारतात अवतारी व्यक्तिमत्त्वांची कधीही कमतरता नव्हती या वस्तुस्थितीचे भगवती स्वरुपा सोनल माँ या साक्षात उदाहरण होत्या. गुजरात आणि सौराष्ट्र ही विशेषत्वाने संत आणि महान विभूतींची भूमी आहे असे नमूद करत पंतप्रधान मोदी म्हणाले की या भागात अनेक संत आणि महान व्यक्तींनी संपूर्ण मानवतेसाठी आपल्या ज्ञानाचा प्रकाश पसरवला. पवित्र गिरनार पर्वत हा भगवान दत्तात्रय आणि अनेक संतांचे स्थान असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. पंतप्रधान म्हणाले, सौराष्ट्रच्या या शाश्वत संत परंपरेत श्री सोनल माता आधुनिक युगासाठी प्रकाशस्तंभासारख्या होत्या. त्यांची आध्यात्मिक ऊर्जा, मानवतावादी शिकवण आणि तपश्चर्येने त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक अद्भुत दैवी आकर्षण निर्माण केले जे आजही जुनागढ आणि मढडा येथील सोनल धाममध्ये अनुभवता येते.”

Social justice is not means of political sloganeering but an “Article of Faith for us: PM Modi on BJP Sthapana Divas

April 06th, 09:40 am

PM Modi addressed the Foundation Day celebrations of the BJP. He said, “BJP is born as a tribute to India’s democracy and will always strive to strengthen India’s democracy and its Constitutional values. BJP through its progressive mindset has always envisaged Sabka Saath, Sabka Vishwas, and Sabka Prayas.”

BJP Commemorates Sthapana Divas, PM Modi appreciates the role, support, and efforts of the party Karyakartas in this journey

April 06th, 09:30 am

PM Modi addressed the Foundation Day celebrations of the BJP. He said, “BJP is born as a tribute to India’s democracy and will always strive to strengthen India’s democracy and its Constitutional values. BJP through its progressive mindset has always envisaged Sabka Saath, Sabka Vishwas, and Sabka Prayas.”

दिल्ली-कर्नाटक संघाच्या अमृत महोत्सव कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण

February 25th, 05:20 pm

कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री बसावराज बोम्मई जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रल्हाद जोशी जी, संसदेतील आमचे वरिष्ठ सहकारी डॉ. विरेंद्र हेगडे जी, परमपूज्य स्वामी निर्मलानंद-नाथ स्वामी जी, परमपूज्य श्री श्री शिवरात्रि देशीकेन्द्र स्वामी जी, श्री श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामी जी, श्री श्री नंजावधूता स्वामी जी, श्री श्री शिवमूर्ति शिवाचार्य स्वामी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, खासदार, भाई सीटी रवि जी, दिल्ली-कर्नाटक संघातील सर्व सदस्य, बंधू आणि भगीनींनो, सर्वप्रथम, मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो, मी तुमचे अभिनंदन करतो. आज दिल्ली-कर्नाटक संघ एल्लादरु इरु, एँतादरु इरु, एँदेँदिगु नी कन्नड़ावागीरु’ असा गौरवशाली वारसा पुढे नेत आहे. 'दिल्ली कर्नाटक संघा'चा ७५ वर्षपूर्तीचा हा सोहळा अशा वेळी होत आहे, जेव्हा देशही स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. जेव्हा आपण 75 वर्षांपूर्वीची परिस्थिती पाहतो आणि त्यांचे मूल्यांकन करतो, तेव्हा आपल्याला या प्रयत्नात भारताचा अमर आत्मा दिसतो. दिल्ली-कर्नाटक संघाच्या स्थापनेवरून दिसून येते की, स्वातंत्र्याच्या त्या पहिल्या टप्प्यातील लोक देशाला मजबूत करण्याच्या अभियानात कसे एकवटले होते.

नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर पंतप्रधानांच्या हस्ते दिल्ली-कर्नाटक संघाच्या ‘बारिसू कन्नड दिम दिमावा’, अमृत महोत्सवाचे उद्घाटन

February 25th, 05:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत तालकटोरा स्टेडियमवर दिल्ली-कर्नाटक संघाच्या ‘बारिसू कन्नड दिम दिमावा’ या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन झालं. यावेळी त्यांनी इथल्या प्रदर्शनालाही भेट दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, कर्नाटकची संस्कृती, परंपरा आणि इतिहास साजरा करणारा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

स्काय इज नॉट दि लिमिटः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

November 27th, 11:00 am

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. ‘मन कि बात’ मध्ये पुन्ह: एकदा तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. या कार्यक्रमाचा हा 95 वा भाग आहे. आपण जलदगतीने या कार्यक्रमाच्या 100 व्या भागाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत. हा कार्यक्रम माझ्यासाठी 130 कोटी देशवासीयांशी संवाद साधण्याचे आणखी एक माध्यम आहे.प्रत्येक भागाच्या आधी, गावांमधून तसेच शहरांमधून आलेली असंख्य पत्रे वाचणे, लहान मुलांपासून ते वयोवृद्धांनी पाठवलेले ऑडीओ ऐकणे, या सगळ्या बाबी माझ्यासाठी एक अध्यात्मिक अनुभवासारख्या आहेत.

Vision of self-reliant India embodies the spirit of global good: PM Modi in Indonesia

November 15th, 04:01 pm

PM Modi interacted with members of Indian diaspora and Friends of India in Bali, Indonesia. He highlighted the close cultural and civilizational linkages between India and Indonesia. He referred to the age old tradition of Bali Jatra” to highlight the enduring cultural and trade connect between the two countries.

इंडोनेशियातील बाली येथे भारतीय समुदाय आणि भारत मित्रांशी पंतप्रधानांचा संवाद

November 15th, 04:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2022 रोजी इंडोनेशियातील बाली येथे भारतीय समुदाय आणि भारत मित्रांच्या 800 हून अधिक सदस्यांना संबोधित केले आणि त्यांच्याशी संवाद साधला. संपूर्ण इंडोनेशियामधून उत्साही आणि वैविध्यपूर्ण अशी गर्दी जमली होती.

बेंगलुरू इथल्या जाहीर सभेत पंतप्रधानांनी केलेले संबोधन

November 11th, 12:32 pm

आज या महान संतांप्रती आदरभाव व्यक्त करत बेंगळुरूचा, कर्नाटकचा विकास आणि वारसा दोन्ही आपण बळकट करत आहोत. आज कर्नाटकला पहिली मेड इन इंडिया वंदे भारत रेल्वे मिळाली आहे. ही गाडी चेन्नई, देशाची स्टार्ट अप्सची राजधानी बेंगळुरू आणि वारसा स्थळांचे शहर मैसूर यांना जोडते. कर्नाटकच्या लोकांना अयोध्या, प्रयाग राज आणि काशी यांचे दर्शन घडवणारी भारत गौरव काशी दर्शन रेल्वेचीही आज सुरुवात झाली आहे. आज केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दुसऱ्या टर्मिनलचेही उद्घाटन झाले आहे. सोशल मीडियावर नव्या विमानतळाची काही छायाचित्रे मी पोस्ट केली होती. आज तिथे गेल्यावर वाटले की नवे टर्मिनल, छायाचित्रात जितके सुंदर दिसते, त्यापेक्षाही जास्त भव्य आहे, आधुनिक आहे. बेंगळुरूच्या लोकांची ही खूप जुनी मागणी होती, ज्याची पूर्तता आता आमचे सरकार करत आहे.