अयोध्येत श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
January 22nd, 05:12 pm
आज आपले राम आले आहेत, शतकांच्या प्रतीक्षेनंतर आपले राम आले आहेत, शतकांचे अभूतपूर्व धैर्य, अगणित बलिदाने, त्याग आणि तपस्येनंतर आपले प्रभू राम आले आहेत. या शुभ प्रसंगी, आपल्या सर्वांचे, समस्त देशबांधवांचे खूप खूप अभिनंदन !अयोध्येतील नवनिर्मित श्री रामजन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान सहभागी
January 22nd, 01:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशात अयोध्येतील नवनिर्मित श्री रामजन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा (अभिषेक) सोहळ्यात सहभागी झाले. श्री रामजन्मभूमी मंदिराच्या उभारणीत योगदान देणाऱ्या श्रमजीवींशी मोदी यांनी संवाद साधला.अरिचल मुनई या राम सेतूच्या प्रारंभ स्थानाला पंतप्रधानांनी दिली भेट
January 21st, 03:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राम सेतूचा प्रारंभ असलेल्या अरिचल मुनईला भेट दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’(भाग 102) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
June 18th, 11:30 am
मित्रांनो, खूप लोकं सांगतात की, पंतप्रधान म्हणून मी अमुक एक चांगले काम केले आहे, एखादे मोठे काम केले आहे. ‘मन की बात’ चे कित्येक श्रोते पत्र लिहून खूप कौतुक करतात. कोणी म्हणतात हे केले, कोणी म्हणते ते काम केले, हे चांगले केले, हे अधिक चंगले केले, हे उत्कृष्ट केले परंतु, जेव्हा मी भारतातील सामान्य नागरिकांचे प्रयत्न, त्यांचे परिश्रम, त्यांची इच्छाशक्ती बघतो तेव्हा मी भारावून जातो. कोणतेही मोठे ध्येय असो, कठीणातील कठीण आव्हान असू दे, भारतीय जनतेची सामूहिक शक्ती प्रत्येक आव्हानावर तोडगा शोधून काढते. दोन-तीन दिवसांपूर्वी देशाच्या पश्चिमेकडे किती मोठे चक्रीवादळ आले हे आपण सगळ्यांनीच पाहिले. जोरदार वारा, मुसळधार पाऊस. बिपरजॉय ने कच्छमध्ये किती मोठे नुकसान केले, परंतु कच्छ मधील लोकांनी हिंमतीने आणि सतर्कतेने इतक्या धोकादायक चक्रीवादळाचा सामना केला हे खूपच अभूतपूर्व आहे. दोन दिवसांनी कच्छ मधील लोकं, त्यांचे नवीन वर्ष अर्थात आषाढ बीज साजरे करणार आहेत. आषाढ बीज, कच्छ मध्ये पावसाच्या आगमनाचे प्रतिक मानले जाते हा देखील एक संयोगच आहे. मी इतकी वर्षे कच्छला येत-जातो, तिथल्या लोकांची सेवा करण्याचे भाग्यही मला लाभले आहे आणि म्हणूनच मला कच्छच्या लोकांची हिंमत आणि उपजीविकेविषयी माहिती आहे. दोन दशकांपूर्वी झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर हा कच्छ पुन्हा कधीच सावरणार नाही, असे म्हंटले जायचे, तोच जिल्हा आज देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक आहे. मला खात्री आहे कच्छमधील लोक बिपरजॉय चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसातून देखील त्याच वेगाने बाहेर पडतील.