
Monsoon Session is a symbol of India’s rising stature, and democratic strength: PM Modi
July 21st, 10:30 am
PM Modi has addressed the media during the commencement of the Monsoon Session of Parliament. In his remarks, he touched upon the horrific Pahalgam massacre and lauded the unified voice of India’s political leadership in exposing Pakistan’s role. The PM also noted the global recognition of Digital India, particularly UPI. He affirmed that Naxalism and Maoism are on the decline and also hailed the success of Operation Sindoor.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आरंभापूर्वी पंतप्रधान मोदींनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन
July 21st, 09:54 am
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी माध्यमांशी संवाद साधला. आपल्या या प्रास्तिविकात, त्यांनी पहलगाम येथील भीषण हत्याकांडाच्या मुद्द्याला स्पर्श करत पाकिस्तानच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी भारतातील राजकीय नेतृत्वाने एकमुखाने आवाज उठविल्याची त्यांनी प्रशंसा केली. डिजिटल इंडिया, विशेषत: यूपीआयला जगभरात मान्यता मिळत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. नक्षलवाद आणि माओवादाचे प्रमाण कमी होत असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला तसेच ऑपरेशन सिंदूरच्या यशाची प्रशंसा केली.
राष्ट्रपतींकडून राज्यसभेसाठी नामनिर्देशीत करण्यात आलेल्या चार मान्यवर व्यक्तींना पंतप्रधानांच्या शुभेच्छा
July 13th, 10:47 am
राष्ट्रपतींकडून राज्यसभेसाठी नामनिर्देशीत करण्यात आलेल्या चार मान्यवर व्यक्तींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनःपूर्वक शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
June 13th, 02:53 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.विजय रुपाणी यांचे काल अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाले.मोदी यांनी रुपाणी यांच्या अतुलनीय कारकिर्दीचा उल्लेख करत राजकोट महानगरपालिकेतील त्यांचा कार्यकाळ, राज्यसभेचे खासदार, गुजरात भाजपचे अध्यक्ष आणि राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री अशा त्यांच्या विविध भूमिकांमधील योगदानाचे स्मरण केले.राज्यसभा खासदार सदस्य थिरू इलैयाराजा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
March 18th, 04:54 pm
राज्यसभा खासदार थिरू इलैयाराजा यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरच्या चर्चेला पंतप्रधानांनी राज्यसभेत दिलेले उत्तर
February 06th, 04:21 pm
आदरणीय राष्ट्रपती जी यांनी भारताच्या कामगिरीविषयी,जगाच्या भारताकडून असलेल्या अपेक्षांविषयी आणि भारताच्या जनसामान्यांचा आत्मविश्वास, विकसित भारत हा संकल्प या सर्व विषयांवर विस्तृत चर्चा केली आहे आणि देशाला आगेकूच करण्यासाठी दिशाही दाखवली आहे. आदरणीय राष्ट्रपती जी यांचे भाषण प्रेरकही होते, प्रभावीही होते आणि भविष्यासाठी काम करण्याकरिता आम्हा सर्वांसाठी मार्गदर्शन करणारेही होते. आदरणीय राष्ट्रपती जी यांच्या संबोधनासाठी धन्यवाद देण्याकरिता मी उपस्थित आहे.Prime Minister Shri Narendra Modi’s reply to the Motion of Thanks on the President’s Address in Rajya Sabha
February 06th, 04:00 pm
PM Modi, replying to the Motion of Thanks on the President’s Address in Rajya Sabha, highlighted India’s development journey under his government since 2014. He emphasized Sabka Saath, Sabka Vikas as the guiding principle, focusing on inclusive growth, SC/ST/OBC empowerment, Nari Shakti, and economic self-reliance through initiatives like MUDRA and PM Vishwakarma Yojana.राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या एका गटासह पंतप्रधानांची भेट घेतली
December 18th, 02:13 pm
राज्यसभेतील खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज शेतकऱ्यांच्या एका गटासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.तेलक्षेत्र (नियमन आणि विकास) कायदा 1948 मध्ये प्रस्तावित सुधारणा संमत झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा
December 03rd, 08:17 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत तेलक्षेत्र (नियमन आणि विकास) कायदा 1948 मध्ये प्रस्तावित सुधारणा संमत झाल्याबद्दल कौतुक केले. ते म्हणाले की हा महत्त्वाचा कायदा आहे जो ऊर्जा सुरक्षेला चालना देईल आणि समृद्ध भारतासाठी देखील योगदान देईल.राज्यसभेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावाला पंतप्रधानांनी दिलेले उत्तर
July 03rd, 12:45 pm
राष्ट्रपतीजींच्या अभिभाषणाबद्दल आभार मानण्यासाठी मी ही या चर्चेत सहभागी झालो आहे. राष्ट्रपती महोदयांच्या अभिभाषणात देशवासियांना प्रेरणा आणि प्रोत्साहन तर होतेच आणि एकप्रकारे सत्याच्या मार्गाचा पुरस्कारही झाला.राष्ट्रपतींच्या अभिभाषणाविषयीच्या आभारप्रदर्शन ठरावावर पंतप्रधानांचे राज्यसभेत उत्तर
July 03rd, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावाला आज राज्यसभेत उत्तर दिले.माजी उपराष्ट्रपती, श्री एम. व्यंकय्या नायडू यांच्या जीवन आणि प्रवासावरील पुस्तकांच्या प्रकाशनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
June 30th, 12:05 pm
उद्या 1 जुलै रोजी व्यंकैय्या नायडू यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या जीवनयात्रेला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. ही 75 वर्षे असामान्य कामगिरीने परिपूर्ण आहेत. या 75 वर्षांतील टप्पे आश्चर्यकारक आहेत. आज त्यांच्या आत्मचरित्रासह आणखी दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. मला विश्वास आहे की ही पुस्तके लोकांना प्रेरणा देतील आणि त्यांना देशसेवेसाठी योग्य मार्गदर्शन करतील.माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे जीवन आणि कारकीर्द यावरील तीन पुस्तकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन
June 30th, 12:00 pm
पंतप्रधानांनी जारी केलेल्या पुस्तकांमध्ये ((i) माजी उपराष्ट्रपतींचे चरित्र “वेंकैया नायडू – लाइफ इन सर्व्हिस” हे द हिंदूंच्या हैदराबाद आवृत्तीचे माजी निवासी संपादक एस नागेश कुमार यांनी लिहिलेले पुस्तक. (ii) “सेलिब्रेटिंग भारत – द मिशन अँड मेसेज ऑफ श्री एम व्यंकय्या नायडू ॲज थर्टींथ व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया”, हे उपराष्ट्रपतींचे माजी सचिव डॉ. आय.व्ही. सुब्बाराव यांनी संकलित केलेले फोटो क्रॉनिकल आणि (iii) महानेता - लाईफ अँड जर्नी ऑफ श्री एम. व्यंकय्या नायडू नावाचे संजय किशोर यांनी लिहिलेले तेलुगु भाषेतील चित्रमय चरित्र, यांचा समावेश आहे.खासदार डी श्रीनिवास गारु यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
June 29th, 08:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी राज्यसभा सदस्य (खासदार) डी श्रीनिवास गारु यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
March 08th, 02:13 pm
सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.राज्यसभेतल्या निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 08th, 12:20 pm
दर दोन वर्षांनी असा प्रसंग या सभागृहात येतो, परंतु हे सभागृह निरंतरतेचे प्रतीक आहे. पाच वर्षांनंतर लोकसभा नवीन रंग रुपाने सजते. या सभागृहाला दर 2 वर्षांनी एक नवी प्राणशक्ती प्राप्त होते, नवी ऊर्जा मिळते, नवी उमेद आणि उत्साहाचे वातावरण तयार होते आणि म्हणून दर 2 वर्षांनी होणारा निरोप समारंभ हा एक प्रकारे निरोप नसतो. ते अशा स्मृती येथे सोडून जातात, ज्या येणाऱ्या नवीन फळीसाठी एक मौल्यवान वारसा आहेत. येथे त्यांच्या कार्यकाळात ते जो वारसा अधिक मौल्यवान बनवू इच्छितात.राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांना पंतप्रधानांनी निरोप दिला
February 08th, 12:16 pm
पंतप्रधानांनी याप्रसंगी सांगितले की अधिक व्यापक सामाजिक मंचासाठी राज्यसभेतून निवृत्त होत असलेल्या सदस्यांना या सभागृहातील अनुभवाचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल. “हे सभागृह म्हणजे सहा वर्षांच्या अनुभवांनी घडवलेले वैविध्यपूर्ण विद्यापीठ आहे. येथून जाणारा प्रत्येकजण समृद्ध होऊन जातो आणि जाताना देश उभारणीच्या कार्याला बळकटी देऊन जातो.” ते म्हणाले.राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला पंतप्रधानांचे उत्तर
February 07th, 02:01 pm
माननीय राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होण्यासाठी मी येथे उपस्थित आहे. आणि मी आदरणीय राष्ट्रपतींनी केलेल्या भाषणाबद्दल त्यांचे आदरपूर्वक आभार मानतो आणि अभिनंदन करतो.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधानांनी राज्यसभेत दिलेले उत्तर
February 07th, 02:00 pm
सभागृहाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की 75 वा प्रजासत्ताक दिन हा देशाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात भारताच्या आत्मविश्वासाबद्दल उल्लेख केला. राष्ट्रपतींनी त्यांच्या भाषणात भारताच्या उज्ज्वल भविष्याबद्दल विश्वास व्यक्त केला आणि भारतातील नागरिकांच्या क्षमतेची दखल घेतल्याचे पंतप्रधान मोदींनी अधोरेखित केले. विकसित भारताच्या संकल्पपूर्तीत मार्गदर्शक ठरणाऱ्या राष्ट्रपतींच्या प्रेरणादायी अभिभाषणाबद्दल त्यांनी राष्ट्रपतींचे आभार मानले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील ‘आभाराच्या प्रस्तावावर’ फलदायी चर्चेसाठी पंतप्रधान मोदींनी सभागृहातील सदस्यांचे आभार मानले. “राष्ट्रपतीजींच्या अभिभाषणात भारताच्या वाढत्या आत्मविश्वासावर, आशादायक भविष्यावर आणि जनतेच्या अफाट क्षमतेवर भर होता”,असे पंतप्रधानांनी उद्धृत केले.राष्ट्रपतींनी चंदीगड विद्यापीठाचे कुलगुरू सतनाम सिंग संधू यांना राज्यसभेवर नामनिर्देशित केल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
January 30th, 01:36 pm
राष्ट्रपतींनी चंदीगड विद्यापीठाचे कुलगुरू सतनाम सिंग संधू यांना राज्यसभेवर नामनिर्देशित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.