पंतप्रधानांच्या व्हिएन्टिन, लाओ पीडीआर दौऱ्यादरम्यान (ऑक्टोबर 10 -11, 2024) करण्यात आलेल्या करार/सामंजस्य करारांची यादी

October 11th, 12:39 pm

भारताचे संरक्षण मंत्रालय आणि लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिकचे राष्ट्रीय संरक्षण मंत्रालय यांच्यात संरक्षण सहकार्याबाबत सामंजस्य करार

2023-24 या वर्षात भारताच्या संरक्षण उत्पादनात आतापर्यंतच्या सर्वोच्च वाढीची नोंद झाल्याबद्दल पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याकडून कौतुक

July 05th, 12:34 pm

2023-24 या आर्थिक वर्षात भारताच्या संरक्षण उत्पादनात 1,26,887 कोटी रुपयांच्या वाढीची नोंद झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या उत्पादन मूल्याच्या तुलनेत ही वाढ 16.8 टक्क्यापेक्षा अधिक आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरवोद्गार काढले आहेत.

राजस्थानातील पोखरण येथे ‘एक्सरसाइज भारत शक्ती’ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

March 12th, 02:15 pm

राजस्थानचे मुख्यमंत्री श्रीमान भजनलाल जी शर्मा, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी राजनाथ सिंह जी, गजेंद्र शेखावत जी, कैलाश चौधरी जी, पीएसए प्राध्यापक अजय सूद जी, सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान, एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी, नौदल प्रमुख अॅडमिरल हरी कुमार, लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे, वरिष्ठ अधिकारीवर्ग, तिन्ही सेनेतील सर्व शूर वीर.... आणि इथे उपस्थित असलेले पोखरणच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो !

राजस्थानातील पोखरण येथे 'भारत शक्ती "या तिन्ही सैन्यदलांच्या नेमबाजी आणि लष्करी डावपेचांच्या सराव कार्यक्रमात पंतप्रधान झाले सहभागी

March 12th, 01:45 pm

इथे आज दिसलेले शौर्य आणि कौशल्य हे नव्या भारताची हाक आहे. “आज पुन्हा एकदा पोखरण भारताच्या आत्मनिर्भरता, आत्मविश्वास आणि त्याच्या वैभवाच्या त्रिवेणीचे साक्षीदार बनले आहे”, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. हे तेच पोखरण आहे ज्याने भारताची अणुचाचणी पाहिली आणि आज आपण स्वदेशीकरणाच्या सामर्थ्याचे साक्षीदार झालो आहोत असे ते पुढे म्हणाले.

नवी दिल्लीतील करिअप्पा संचलन मैदान येथे एनसीसी छात्रसैनिकांच्या रॅलीला पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन

January 27th, 05:00 pm

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राजनाथ सिंह जी, अजय भट्ट जी, तिन्ही दलांचे प्रमुख, सीडीएस जनरल अनिल चौहान जी, संरक्षण सचिव, एनसीसीचे महासंचालक , सर्व अतिथी आणि एनसीसीचे माझे तरुण मित्रांनो...

पंतप्रधानांनी करिअप्पा परेड ग्राउंड, दिल्ली येथे एनसीसी पीएम रॅलीला केले संबोधित

January 27th, 04:30 pm

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की ते स्वत: एनसीसीचे माजी छात्रसैनिक असल्यामुळे एनसीसी कॅडेट्सबरोबर उपस्थित असताना त्या आठवणी जाग्या होणे स्वाभाविक आहे. “एनसीसी कॅडेट्सबरोबर उपस्थित राहताना एक भारत श्रेष्ठ भारत’ची प्रचिती येते”, असे सांगत पंतप्रधान म्हणाले की देशाच्या विविध भागांतील छात्रसैनिक इथे उपस्थित असल्याचे त्यांना आढळले आहे. एनसीसीची व्याप्ती सातत्याने वाढत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि आजचा हा प्रसंग एक नवीन सुरुवात असल्याचे नमूद केले. व्हायब्रंट व्हिलेज योजनेंतर्गत सरकार विकसित करत असलेल्या सीमावर्ती भागातील गावांचे 400 हून अधिक सरपंच आणि देशभरातील बचत गटांमधील 100 हून अधिक महिला इथे उपस्थित असल्याचे त्यांनी नमूद केले .

पंतप्रधानांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्र्यांचे केले स्वागत

November 10th, 08:04 pm

जूनमधील पंतप्रधानांचा अमेरिका दौरा आणि नवी दिल्लीत जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने उभय देशांच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर संरक्षण, सेमीकंडक्टर्स, उदयोन्मुख तंत्रज्ञान, अंतराळ , आरोग्य, यासह द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रातील प्रगतीचा त्यांनी उल्लेख केला.

भारताच्या संरक्षण क्षेत्राला स्वावलंबी बनवण्यासाठी सातत्याने होत असलेल्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

March 17th, 12:48 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या संरक्षण क्षेत्राला स्वावलंबी बनवण्यासाठी सातत्याने होत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला चालना दिल्याने भारतीय प्रतिभेवरील आपला विश्वासही दिसून येतो असे ते म्हणाले.

Seventh meeting of Governing Council of NITI Aayog concludes

August 07th, 05:06 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi, today heralded the collective efforts of all the States in the spirit of cooperative federalism as the force that helped India emerge from the Covid pandemic.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ आर. बायडेन यांच्यात होणार आभासी माध्यमातून संवाद

April 10th, 09:02 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ आर. बायडेन यांच्यात 11 एप्रिल 2022 रोजी आभासी माध्यमातून बैठक होणार आहे. दक्षिण आशियातील अलीकडील घडामोडी, हिंद - प्रशांत क्षेत्र आणि परस्पर हिताच्या जागतिक मुद्द्यांसंदर्भात सुरु असलेल्या द्विपक्षीय सहकार्याचा उभय नेते आढावा घेतील आणि विचारविनिमय करतील. द्विपक्षीय व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने,ही आभासी बैठक दोन्ही देशांची नियमित आणि उच्च-स्तरीय प्रतिबद्धता सुरू ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आजादी@75 परिषद आणि लखनौमधील एक्स्पोच्या उद्घाटनाच्या वेळी केलेले भाषण

October 05th, 10:31 am

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि लखनौचे खासदार, आमचे ज्येष्ठ साथी श्रीयुत राजनाथ सिंह, श्री हरदीप सिंह पुरी, महेंद्र नाथ पांडे, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री श्री केशव प्रसाद मौर्य, श्री दिनेश शर्मा, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्रीयुत कौशल किशोर, राज्य सरकारमधील मंत्रीगण, खासदार, आमदार, देशाच्या विविध भागातून आलेले तुम्ही सर्व आदरणीय मंत्रिगण, इतर सर्व मान्यवर आणि उत्तर प्रदेशातील माझ्या प्रिय बंधु भगिनींनो !

पंतप्रधानांच्या हस्ते ‘आझादी@75- नवा नागरी भारत: शहरी व्यवस्थेत परिवर्तन’ या विषयावरील परिषद आणि प्रदर्शनाचे लखनऊ येथे उद्‌घाटन

October 05th, 10:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, ‘आझादी@75- नवा नागरी भारत: शहरी व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन’ या परिषद आणि प्रदर्शनीचे लखनऊ येथे उद्‌घाटन झाले. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, हरदीप पुरी, महेंद्रनाथ पांडे, कौशल किशोर, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या कार्यक्रमाला उपस्थित होते.

देशाच्या काही भागांमध्ये झालेल्या तोडफोडीच्या घटनांचा पंतप्रधानांकडून तीव्र निषेध

March 07th, 10:44 am

देशाच्या काही भागांमध्ये नुकत्याच झालेल्या तोडफोडीच्या घटनांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. या घटनांमध्ये दोषी असणाऱ्यांवर कठोरकारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. देशाच्या काही भागांमध्ये पुतळे पाडले जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पंतप्रधानांनी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याशी चर्चा केली आणि अशा घटनांचा तीव्र निषेध केला आहे. गृहमंत्रालयही तोडफोडीच्या या घटनांकडे गांभिर्याने पाहत आहे. राज्यांनी अशा घटना रोखण्यासाठी तातडीने आवश्यक ती पावले उचलावित असे, निर्देश गृहमंत्रालयाने दिले आहेत. अशा घटनांशी सर्व संबंधितांवर योग्य त्या नियमांतर्गत खटले दाखल करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असेही गृहमंत्रालयाने सांगितले आहे.