It’s owing to the efforts of Maharja Digvijay Singh of Jamnagar that India has great relations with Poland: PM Modi in Jamnagar

May 02nd, 11:30 am

Addressing a rally in Jamnagar, PM Modi said “It’s owing to the efforts of Maharja Digvijay Singh of Jamnagar that India has great relations with Poland.” He added that Maharaja Digvijay Singh gave safe haven to Polish citizens fleeing the country owing to World War-2.

Congress opposes abrogation of Article 370 and CAA to enable divisive politics: PM Modi in Junagadh

May 02nd, 11:30 am

Addressing a rally in Junagadh and attacking the Congress’s intent of pisive politics, PM Modi said, “Congress opposes abrogation of Article 370 and CAA to enable pisive politics.” He added that Congress aims to pide India into North and South. He said that Congress aims to keep India insecure to play its power politics.

Congress 'Report Card' is a 'Report Card' of scams: PM Modi in Surendranagar

May 02nd, 11:15 am

Ahead of the impending Lok Sabha elections, Prime Minister Narendra Modi addressed powerful rally in Surendranagar, Gujarat. He added that his mission is a 'Viksit Bharat' and added, 24 x 7 for 2047 to enable a Viksit Bharat.

PM Modi addresses powerful rallies in Anand, Surendranagar, Junagadh and Jamnagar in Gujarat

May 02nd, 11:00 am

Ahead of the impending Lok Sabha elections, Prime Minister Narendra Modi addressed powerful rallies in Anand, Surendranagar, Junagadh and Jamnagar in Gujarat. He added that his mission is a 'Viksit Bharat' and added, 24 x 7 for 2047 to enable a Viksit Bharat.

टीव्ही 9 कॉन्क्लेव्हमधील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर

February 26th, 08:55 pm

मी अनेकदा भारताच्या विविधतेबद्दल बोलत असतो. टीव्ही नाईनच्या न्यूजरूममध्ये आणि तुमच्या वार्ताहरांच्या चमूमध्ये ही विविधता स्पष्टपणे दिसून येते. टीव्ही नाईनचे अनेक भारतीय भाषांमध्ये माध्यम व्यासपीठ उपलब्ध आहेत. तुम्ही भारताच्या चैतन्यशील लोकशाहीचे प्रतिनिधीही आहात. विविध राज्यांतील, विविध भाषांतील टीव्ही नाइनमध्ये काम करणाऱ्या सर्व पत्रकार सहकाऱ्यांचे आणि तुमच्या तांत्रिक टीमचे मी अभिनंदन करतो.

पंतप्रधानांनी न्यूज 9 जागतिक शिखर परिषदेला केले संबोधित

February 26th, 07:50 pm

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की टीव्ही 9 ची रिपोर्टिंग टीम भारतातील विविधतेचे प्रतिनिधित्व करते. त्यांच्या बहुभाषिक वृत्त वाहिन्यांनी टीव्ही 9 ला भारताच्या चैतन्यशील लोकशाहीचा प्रतिनिधी बनवले आहे असे पंतप्रधान म्हणाले.

गुजरातमधील राजकोट येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

February 25th, 07:52 pm

आजच्या या कार्यक्रमात देशातील अनेक राज्यांमधून इतर लोकही मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल, आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, हे सर्वजण दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. त्या सर्वांचेही मी मनापासून अभिनंदन करतो.

गुजरातमध्ये राजकोट इथे 48,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे पंतप्रधानांनी केले राष्ट्रार्पण आणि पायाभरणी

February 25th, 04:48 pm

या संपूर्ण कार्यक्रमाला संबोधित करताना, पंतप्रधानांनी या कार्यक्रमात दूरदृष्य प्रणाली द्वारे, उपस्थित राज्यांचे माननीय राज्यपाल आणि मुख्यमंत्री, संसद सदस्य आणि विधानसभांचे सदस्य तसेच केंद्रीय मंत्री यांच्या उपस्थितीबद्दल त्यांचे आभार मानले. एकेकाळी सर्व प्रमुख विकास कार्यक्रम एकट्या नवी दिल्लीत पार पडत असत त्या काळाचा उल्लेख करत पंतप्रधानांनी, सध्याच्या सरकारने हा रिवाज बदलून भारत सरकारला देशाच्या कानाकोपऱ्यात नेले, या बाबीवर प्रकाश टाकला. “राजकोटमधील आजचा हा कार्यक्रम, या विश्वासाचा पुरावा आहे”, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, नवीन परंपरा पुढे नेत, प्रकल्पांचे राष्ट्रांर्पण आणि पायाभरणी समारंभ आता देशातील अनेक ठिकाणी होत आहेत. जम्मूमधील एका कार्यक्रमातून झालेल्या IIT भिलाई, IIT तिरुपती, IIIT कुर्नूल, IIM बोधगया, IIM जम्मू, IIM विशाखापट्टणम आणि IIS कानपूर या शैक्षणिक संस्थांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाची आठवण करून देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज एम्स राजकोट, एम्स रायबरेली, एम्स मंगलागिरी, एम्स भटिंडा आणि एम्स कल्याणी यांचे उद्घाटन असेच होत आहे. विशेषत: जेव्हा आपण या 5 एम्स कडे पाहतो तेव्हा विकसनशील भारतामध्ये वेगाने कामे पूर्ण केली जात आहेत हे लक्षात येते, असे मोदी पुढे म्हणाले.

राजकोटचे माझ्या हृदयात नेहमीच विशेष स्थान राहिल: पंतप्रधान नरेंद्र मोदी

February 24th, 08:17 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या राजकोटशी असलेल्या दृढ संबंधांचे स्मरण करत मोदी आर्काइव्हमधील X या समाज माध्यमावरील पोस्ट सामायिक केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 आणि 25 फेब्रुवारीला गुजरात दौऱ्यावर

February 24th, 10:45 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 आणि 25 फेब्रुवारी 2024 रोजी गुजरातला भेट देणार आहेत. 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:45 च्या सुमाराला ते बेट द्वारका मंदिरात पूजा करून दर्शन घेतील, त्यानंतर सकाळी 8:25 च्या सुमारास सुदर्शन सेतूला भेट देतील. सकाळी 9:30 च्या सुमाराला ते द्वारकाधीश मंदिराला भेट देतील.

विकसित भारत विकसित गुजरात कार्यक्रमात पंतप्रधानांचे संबोधन

February 10th, 01:40 pm

गुजरातच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, केम छो...मजा मा. आज विकसित भारत-विकसित गुजरात हे फार मोठे अभियान सुरु होत आहे. आणि मला असे सांगण्यात आले आहे की, गुजरातमधील विधानसभेच्या सर्वच्या सर्व 182 जागांवर गुजरातच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. विकसित गुजरातच्या या प्रवासात तुम्ही सर्वजण इतक्या उत्साहाने सहभागी झाला आहात...मी तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो.

‘विकसित भारत विकसित गुजरात’ कार्यक्रमात पंतप्रधानांचे मार्गदर्शन

February 10th, 01:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘विकसित भारत विकसित गुजरात’ या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी प्रधानमंत्री आवास योजना(PMAY) आणि इतर गृहनिर्माण योजनांतर्गत गुजरातमध्ये बांधण्यात आलेल्या 1.3 लाखांपेक्षा जास्त घरांचे उद्घाटन आणि भूमीपूजन केले. यावेळी त्यांनी आवास योजनेच्या काही लाभार्थ्यांसोबत संवाद देखील साधला.

अंमली पदार्थांच्या सेवनाविरुद्धच्या मोहिमेतील तरुणांचा वाढता सहभाग अतिशय उत्साहवर्धक: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

July 30th, 11:30 am

माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’मध्ये तुम्हां सर्वांचे खूप खूप स्वागत.जुलै महिना म्हणचे मान्सूनचा महिना, पावसाचा महिना. नैसर्गिक आपत्तींमुळे गेले काही दिवस चिंता आणि त्रासाने भरलेले होते.यमुनेसहअनेक नद्यांना आलेल्या पुरामुळे बऱ्याच भागांमधल्या लोकांना त्रास झाला. डोंगराळ भागात भूस्खलन होण्याच्या घटना देखील घडल्या. याच दरम्यान, काही काळापूर्वी देशाच्या पश्चिम भागात, पूर्व गुजरातच्या काही क्षेत्रामध्ये बिपरजॉय चक्रीवादळ देखील आले. पण मित्रांनो, या संकटांच्या काळात पुन्हा एकदा आपण सर्व देशवासीयांनी दाखवून दिले की, सामुहिक प्रयत्नांमध्ये किती शक्ती असते. स्थानिक लोकांनी, आपल्या एनडीआरएफच्या जवानांनी, स्थानिक प्रशासनात कार्यरत लोकांनी रात्रंदिवस झगडून अशा संकटांचा सामना केला आहे. कोणत्याही संकटातून बाहेत पडण्यासाठी आपले सामर्थ्य आणि साधनसंपत्ती यांची भूमिका फार मोठी असते – मात्र त्याबरोबरच आपली संवेदनशीलता आणि एकमेकांचा हात धरुन ठेवण्याची भावना देखील तितकीच महत्त्वाची असते. ‘सर्वजन हिताय’ ची हीच भावना भारताची ओळख देखील आहे आणि भारताची शक्ती देखील आहे.

पंतप्रधानांनी राजकोट, गुजरात येथे विविध विकासात्मक कामांच्या उद्घाटना वेळी केलेल्या भाषणाचा मजकूर

July 27th, 04:00 pm

सर्वजण कसे आहात? मजेत ना? गुजरातचे मुख्यमंत्री श्रीमान भूपेंद्र भाई पटेल, मंत्रिमंडळातले माझे सहकारी श्री ज्योतिरार्दित्य सिंदियाजी, गुजरातचे माजी मुख्यमंत्री भाई विजय रुपाणीजी, सी आर पाटील जी !

गुजरातमध्ये राजकोट येथे पंतप्रधानांनी केले राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण

July 27th, 03:43 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये राजकोट येथे राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि 860 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये सौनी योजना लिंक 3 पॅकेज 8 आणि 9, द्वारका ग्रामीण पाणी पुरवठा आणि स्वच्छता(RWSS) प्रकल्प दर्जासुधारणा, उपरकोट किल्ला संवर्धन, पूर्वस्थिती प्राप्ती आणि विकास प्रकल्प टप्पा 1 आणि 2, पाणी प्रक्रिया प्रकल्प, मलजल प्रक्रिया प्रकल्प आणि उड्डाणपूल यांची उभारणी आणि इतर प्रकल्पांचा समावेश आहे. नव्याने उद्घाटन झालेल्या राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनलमध्ये देखील पंतप्रधानांनी फेरफटका मारून पाहणी केली.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली प्रगती मंचाची 42वी बैठक

June 28th, 07:49 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी प्रगती मंचाच्या 42व्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. प्रगती हा माहिती दूरसंवाद तंत्रज्ञानावर आधारित बहुपद्धतीय मंच असून केंद्र आणि राज्य सरकारांच्या सहभागाने सक्रीय प्रशासन आणि तत्पर अंमलबजावणी यासाठी या मंचाची स्थापना करण्यात आली आहे.

गांधीनगर, गुजरातमध्ये विविध प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणी समारंभ सोहळ्यातील पंतप्रधानांचे भाषण

May 12th, 12:35 pm

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, सी.आर. पाटील, गुजरात सरकारचे मंत्री, पंतप्रधान आवास योजनेची सर्व लाभार्थी कुटुंबे, इतर सर्व मान्यवर आणि गुजरातच्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो,

पंतप्रधानांनी गुजरातमध्ये गांधीनगर येथे सुमारे 4400 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची केली पायाभरणी आणि राष्ट्रार्पण

May 12th, 12:34 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये गांधीनगर येथे सुमारे 4400 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. या प्रकल्पांमध्ये शहर विकास विभाग, पाणीपुरवठा विभाग, रस्ते आणि परिवहन विभाग आणि खाणकाम आणि खनिज विभाग यांच्याशी संबंधित 2450 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनाचा समावेश होता. पंतप्रधानांनी पंतप्रधान आवास योजनेच्या(ग्रामीण आणि शहरी) सुमारे 1950 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि पायाभरणी केली आणि या योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या सुमारे 19,000 घरांच्या गृहप्रवेश कार्यक्रमात ते सहभागी झाले आणि त्यांनी या घरांच्या चाव्या लाभांर्थ्यांकडे सुपूर्द केल्या. या लाभार्थ्यांसोबत त्यांनी व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून संवाद देखील साधला.

श्री स्वामीनारायण गुरूकुल राजकोट संस्थानच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

December 24th, 11:10 am

पूज्य शास्त्रीजी महाराज धर्मजीवन दासजी स्वामींच्या प्रेरणेने, त्यांच्या आशीर्वादाने राजकोट गुरूकुलाला 75 वर्ष होत आहेत. राजकोट गुरूकुलच्या 75 वर्षांच्या या प्रवासाबद्दल मी आपल्या सर्वांचे अगदी हृदयापासून अभिनंदन करतो. भगवान श्री स्वामी नारायण यांच्या नामःस्मरणानेच एका नवचैतन्याचा संचार होतो आणि आज तुम्हा सर्व संतांच्या सानिध्यामध्ये स्वामीनारायण यांचे नामःस्मरण करण्‍याची एक वेगळीच संधी मला मिळाली आहे. या ऐतिहासिक संस्थानाचे भविष्य अधिक उज्ज्वल असेल, ही संस्था अधिक उत्तम प्रकारे आपले योगदान देईल, असा मला विश्वास आहे.

श्री स्वामीनरायण गुरुकुल राजकोट संस्थानच्या अमृत महोत्सवी समारंभात पंतप्रधानांचे दृकश्राव्य पद्धतीने संबोधन

December 24th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री स्वामीनारायण गुरुकुल राजकोट संस्थानच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाला दुरदृश्य प्रणालीद्वारे आज संबोधित केले.