भारतीय संस्कृतीच्या चैतन्याने जगभरातील लोकांना कायम आकर्षित केले आहे: पंतप्रधान मोदी

January 30th, 11:30 am

मित्रहो, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात, या प्रयत्नांच्या माध्यमातून आपल्या राष्ट्रीय प्रतीकांची देश पुनर्स्थापना करत आहे. इंडिया गेट जवळची अमर जवान ज्योत आणि जवळच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावरची प्रज्वलित ज्योत एकत्र करण्यात आल्याचे आपण पाहिले.या भावूक क्षणी अनेक देशवासीय आणि शहीदांच्या कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू तरळले.राष्ट्रीय युद्ध स्मारकावर, देशाच्या स्वातंत्र्यानंतर शहीद झालेल्या शूरवीरांची नावे कोरलेली आहेत.लष्कराच्या माजी सैनिकांनी मला पत्र लिहून कळवले आहे की शहिदांच्या स्मारकासमोर प्रज्वलित होत असलेली ‘अमर जवान ज्योत’ शहिदांच्या अमरत्वाचे प्रतिक आहे. खरोखरच अमर जवान ज्योतीप्रमाणेच आपले शहीद,त्यांची प्रेरणा आणि त्यांचे योगदानही अमर आहे. जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा राष्ट्रीय युध्द स्मारकाला आवर्जून भेट द्या असे माझे आपणा सर्वाना सांगणे आहे.आपले कुटुंबीय आणि मुलानाही घेऊन जा.इथे आपल्याला आगळीच उर्जा आणि प्रेरणा यांची प्रचीती येईल.

अलीगढ येथील राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

September 14th, 12:01 pm

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल जी, उत्तर प्रदेशचे यशस्वी आणि युवा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उप मुख्यमंत्री दिनेश शर्मा जी, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्रिगण, अन्य खासदार, आमदार आणि अलिगढचे माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिगढ इथे राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाचे केले भूमिपूजन

September 14th, 11:45 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अलिगढ इथे राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाचे भूमिपूजन केले. उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरच्या अलिगढ नोड आणि राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठ यांचा प्रस्तावित आराखडा मांडलेल्या प्रदर्शनाला पंतप्रधानांनी भेट दिली.

पंतप्रधान उद्या दिनांक 14 सप्टेंबर रोजी अलीगढ येथील राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाची कोनशीला बसवणार

September 13th, 11:20 am

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी उद्या दिनांक 14 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 12 च्या सुमारास उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाची कोनशीला बसवणार आहेत, त्यानंतर त्यांचे यानिमित्ताने भाषण होईल. पंतप्रधान उत्तर प्रदेश औद्योगिक संरक्षण कॉरिडॉरच्या अलीगढ नोड येथील आणि राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाच्या प्रतिकृतींच्या प्रदर्शनाला देखील भेट देतील.