पंतप्रधानांनी स्क्वॉशचे दिग्गज खेळाडू राज मनचंदा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला

December 04th, 03:42 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज मनचंदा यांच्या निधनाबद्दल आज शोक व्यक्त केला. भारतीय स्क्वॉश च्या क्षेत्रातील एक असामान्य खेळाडू असलेल्या मनचंदा यांच्या खेळातील प्राविण्य तसेच समर्पण भावनेचा त्यांनी आदराने उल्लेख केला. मनचंदा यांनी सैन्यदलात देशाप्रति बजावलेल्या कर्तव्याचीही त्यांनी प्रशंसा केली.