महत्त्वाची माहिती: क्वाड नेत्यांची शिखर परिषद
September 25th, 11:53 am
24 सप्टेंबर रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा यांच्यासह क्वाड नेत्यांच्या पहिल्या प्रत्यक्ष वैयक्तिक उपस्थितीच्या शिखर परिषदेचे आयोजन केले होते. या नेत्यांनी या शिखर परिषदेत संघटनेच्या सदस्य देशांमधील संबध अधिक बळकट करण्याच्या आणि 21 व्या शतकातील आव्हानांचा सामना करण्यासाठी अधिक व्यावहारिक सहकार्यासाठी पुढाकार घेण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांवर भर दिला. कोविड-19 महामारीला संपुष्टात आणणे, लसींचे उत्पादन वाढवणे आणि सुरक्षित आणि प्रभावी लसी सर्वांसाठी उपलब्ध करून देणे,उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणे, हवामान संकटाचा सामना करणे, विकसित तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करणे, अंतराळ आणि सायबर सुरक्षा आणि सदस्य देशांमधील उच्च प्रतिभासंपन्न नव्या पिढीची जोपासना करणे यांचा यामध्ये समावेश होता.