Fact Sheet: Quad Countries Launch Cancer Moonshot Initiative to Reduce the Burden of Cancer in the Indo-Pacific
September 22nd, 12:03 pm
The Quad countries—US, Australia, India, and Japan—launched the Quad Cancer Moonshot to combat cervical cancer in the Indo-Pacific. This initiative aims to strengthen cancer care by enhancing health infrastructure, promoting HPV vaccination, increasing screenings, and expanding treatment. During the Quad Leaders' Cancer Moonshot event, India commited to providing HPV sampling kits, detection tools and cervical cancer vaccines worth $7.5 million to the Indo-Pacific region.क्वाड नेत्यांच्या कर्करोग मूनशॉट कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन
September 22nd, 06:25 am
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल मी राष्ट्राध्यक्ष बायडन यांचे हार्दिक अभिनंदन करतो. परवडण्याजोग्या, सहज उपलब्ध होण्याजोग्या आणि गुणवत्ता पूर्ण आरोग्य सेवे बाबतच्या आमच्या ठाम दृढ निश्चयाची यातून प्रचिती मिळत आहे. कोविड साथीदरम्यान आम्ही इंडो पॅसिफिक क्षेत्रासाठी ‘क्वाड लसीकरण उपक्रम’ राबवला होता आणि मला हे सांगताना आनंद होतो आहे की क्वाड च्या माध्यमातून आम्ही सर्व्हायकल कॅन्सर सारख्या समस्यांचा एकत्र येऊन सामना करायचा निर्णय घेतला आहे.क्वाड कर्करोग मूनशॉट कार्यक्रमात पंतप्रधान राहिले उपस्थित
September 22nd, 06:10 am
डेलावेर मध्ये विल्मिंग्टन येथे क्वाड शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आर बायडेन ज्युनियर यांनी आयोजित केलेल्या क्वाड कर्करोग मूनशॉट कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले.अमेरिकेत डेलावेर मध्ये विल्मिंग्टन इथे झालेल्या क्वाड देशांच्या नेत्यांच्या सहाव्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी
September 22nd, 05:21 am
या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. यजमान देश म्हणून ही शिखर परिषद आयोजित केल्याबद्दल तसेच जागतिक कल्याणासाठी एक शक्ती म्हणून क्वाडला बळकट करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर दाखवलेल्या वचनबद्धतेबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संबोधनातून आभार मानले. सद्यस्थितीत जग तणाव आणि संघर्षांने व्यापलेले आहे, अशावेळी सामायिक लोकशाही मूल्ये आणि तत्वांना अनुसरून क्वाड समूह देशांनी एकत्र येणे मानवतेसाठी महत्वाचे असल्याची बाबही पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात अधोरेखित केली. क्वाड संघटना ही कायमच सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करत तसेच जागतिक पातळीवरील वादांचे शांततापूर्ण निराकरण करण्याच्या वचनबद्धतेला अनुसरूनच नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था अबाधित राखण्यासाठी वाटचाल करत आली असल्याची बाबही त्यांनी आपल्या संबोधनात ठळकपणे अधोरेखित केली. स्वतंत्र, मुक्त, सर्वसमावेशक आणि समृद्ध हिंद-प्रशांत क्षेत्र हे क्वाड समूहाच्या सदस्य देशांचे परस्पर सामायिक उद्दिष्ट असल्याचेही ते म्हणाले. हिंद-प्रशांत क्षेत्रातील देशांसाठी क्वाड ही संघटना कायम उपलब्ध असेल, परस्परांना सहकार्य करत राहील, तसेच भागीदारीच्या प्रयत्नांमध्येही सहभागी असेल असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.