कतारच्या अमीरांनी पंतप्रधानांचे दूरध्वनीवरून केले अभिनंदन

June 10th, 09:24 am

कतारचे अमीर, महामहिम शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी दूरध्वनीवरून

उत्तर प्रदेशातील लखनौ येथे उत्तर प्रदेश वैश्विक गुंतवणूक शिखर परिषदेतील प्रकल्पांच्या पायाभरणी कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

February 19th, 03:00 pm

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, ऊर्जावान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, उपस्थित मान्यवर, देश-परदेशातून आलेले औद्योगिक क्षेत्रातील सर्व प्रतिनिधी आणि माझ्या परिवारातील सदस्य! आज आपण इथे विकसित भारतासाठी विकसित उत्तर प्रदेश निर्मितीचा संकल्प करण्यासाठी एकत्रित जमलो आहोत. आणि मला असे सांगण्यात आले की, आत्ता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याबरोबर उत्तर प्रदेशातील 400 पेक्षा जास्त विधानसभा मतदार संघातील लक्षावधी लोक या कार्यक्रमाबरोबर जोडले गेले आहेत. जे लोक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सहभागी झाले आहेत, त्या सर्वांचेही मी अगदी मनापासून स्वागत करतो. 7-8 वर्षांपूर्वी आपण विचारही करू शकत नव्हतो की, उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक आणि नोकरीच्या संधी निर्माण होण्याविषयी असे वातावरण तयार होईल. त्या काळामध्ये जर कोणी म्हणाले असते की, उत्तर प्रदेश विकसित राज्य बनेल, तर कदाचित ते कोणी ऐकूनही घेतले नसते. त्यामुळे यावर कोणी विश्वास ठेवण्याचा तर प्रश्नच येत नव्हता. परंतु आज पहा, लक्षावधी कोटी रूपयांची गुंतवणूक उत्तर प्रदेशमध्ये केली जात आहे आणि मी उत्तर प्रदेशचा खासदार आहे. माझ्या उत्तर प्रदेशमध्ये ज्यावेळी असे काही चांगले घडते, त्यावेळी सर्वात जास्त आनंद मला होतो. आज हजारो प्रकल्पांवर काम सुरू होत आहे. कारखान्यांची उभारणी केली जात आहे. हे सर्व उद्योग सुरू होत आहेत, त्यांच्यामुळे उत्तर प्रदेशचे चित्रच बदलून जाणार आहे. सर्व गुंतवणूकदारांचे आणि विशेषतः उत्तर प्रदेशातील सर्व युवकांचे मी आज विशेष अभिनंदन करतो.

उत्तर प्रदेशातील लखनौ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारत विकसित उत्तर प्रदेश’ कार्यक्रमाला केले संबोधित

February 19th, 02:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील लखनौ येथे ‘विकसित भारत विकसित उत्तर प्रदेश’ कार्यक्रमाला संबोधित केले. उत्त‍र प्रदेश जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद - 2023 च्या चौथ्या कार्यक्रमामध्‍ये राज्यासाठी 10 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मंजूर झालेल्या 14000 प्रकल्पांचा प्रारंभ यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. या प्रकल्पांमध्‍ये उत्पादन, अक्षय ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवा, अन्न प्रक्रिया, गृहनिर्माण आणि मालमत्ता, आदरातिथ्‍य, मनोरंजन आणि शिक्षण यांच्यासह इतर क्षेत्रांमधील उद्योग व्यवसायांचा समावेश आहे.

हरियाणातील रेवाडी येथे विकासकामांच्या उदघाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले संबोधन

February 16th, 01:50 pm

शूरवीरांची भूमी असलेल्या रेवाडीमधून संपूर्ण हरियाणातील जनतेला माझा नमस्कार! मी जेव्हा जेव्हा रेवाडीला येतो तेव्हा अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. रेवाडीशी माझे काही वेगळेच नाते आहे. मला माहित आहे रेवाडीतील लोकांचा मोदींवर खूप जास्त लोभ आहे. आणि आता, माझे स्नेही राव इंद्रजीत जी यांनी सांगितल्याप्रमाणे, मुख्यमंत्री मनोहर लाल जी यांनी सांगितल्याप्रमाणे, 2013 मध्ये, भारतीय जनता पक्षाने मला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते, तेव्हा माझा पहिला कार्यक्रम रेवाडीमध्ये झाला होता आणि त्या वेळी रेवाडीने मला 272 पार करण्याचा आशीर्वाद दिला होता आणि तुमचा तो आशीर्वाद फळला. आता लोक म्हणत आहेत की, मी पुन्हा एकदा रेवाडीत आलो आहे, तर तुमचा आशीर्वाद आहे, यावेळी 400 पार, एनडीए सरकार 400 हून अधिक जागा मिळवेल.

पंतप्रधानांनी हरियाणातील रेवाडी येथे 9,750 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी

February 16th, 01:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणातील रेवाडी येथे 9750 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी केली. शहरी वाहतूक, आरोग्य, रेल्वे आणि पर्यटन यासंबंधी अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांतील हे प्रकल्प आहेत. इथल्या प्रदर्शनांचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.

विकसित भारत विकसित राजस्थान कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

February 16th, 11:30 am

विकसित भारत विकसित राजस्थान या महत्त्वपूर्ण कार्यक्रमामध्ये यावेळेस राजस्थानच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून लाखो मित्र सहभागी झाले आहेत. मी आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो आणि मी मुख्यमंत्री जी यांना सुद्धा शुभेच्छा देतो की त्यांनी तंत्रज्ञानाचा एवढा अप्रतिम वापर करून लोकांपर्यंत पोचण्यासाठी मला संधी प्राप्त करून दिली. काही दिवसांपूर्वी फ्रान्सच्या राष्ट्रपतींचे आपण जयपुर मध्ये ज्या प्रकारे स्वागत सत्कार केला त्याचा आवाज संपूर्ण भारतात दुमदुमत आहे. एवढेच नाही तर फ्रान्स मध्ये सुद्धा त्याचीच चर्चा ऐकू येत आहे.आणि हीच तर राजस्थानच्या लोकांची खरी ओळख आहे.

पंतप्रधानांनी ‘विकसित भारत विकसित राजस्थान’ कार्यक्रमाला केले संबोधित

February 16th, 11:07 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'विकसित भारत विकसित राजस्थान' कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी 17,000 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी केली. रस्ते, रेल्वे, सौर ऊर्जा, वीज पारेषण, पेयजल, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांतील हे प्रकल्प आहेत.

पंतप्रधानांनी घेतली कतारच्या पंतप्रधानांची भेट

February 15th, 05:45 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारचे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी यांची भेट घेतली. हा त्यांचा कतार दौऱ्यातील पहिला कार्यक्रम होता.

कतारमधील दोहा येथे पंतप्रधानांचे आगमन

February 15th, 01:30 am

कतारच्या अधिकृत दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज दोहा येथे आगमन झाले. पंतप्रधानांची ही दुसरी कतार भेट आहे, याआधी जून 2016 मध्ये पंतप्रधानांनी कतारला भेट दिली होती.

जागतिक अव्वल बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनवर विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधानांनी कार्तिकेयन मुरलीची केली प्रशंसा

October 19th, 06:27 pm

कतार मास्टर्स 2023 स्पर्धेत मॅग्नस कार्लसन या जगात अव्वल स्थानावर असलेल्या बुद्धिबळपटूवर विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधानांनी कार्तिकेयन मुरली याची प्रशंसा केली आहे.

पर्यटनाचा मिशन मोडवर विकास साधणे या विषयावर आयोजित केलेल्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधानांनी केलेलं संबोधन

March 03rd, 10:21 am

या वेबिनार मध्ये उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत आहे. आजचा नवा भारत नव्या कार्यसंस्कृतीसह पुढे वाटचाल करत आहे. यावेळच्या अर्थसंकल्पाचीही खूप प्रशंसा झाली आहे, देशातील लोकांनी या अर्थसंकल्पाला खूप सकारात्मकपणे घेतलं आहे. देशात जुनी कार्य संस्कृती असती तर अर्थसंकल्पाबाबत अशा प्रकारचे वेबिनार आयोजित करण्याचा कुणी विचारही केला नसता. मात्र आज आमचं सरकार अर्थसंकल्पाच्या आधी आणि अर्थसंकल्पानंतरही अर्थसंकल्पाशी संबंधित प्रत्येक भागधारकाशी विस्तृत चर्चा करत असते, या सर्वांना सोबत घेऊन जायचा प्रयत्न करत असते. अर्थसंकल्पातून जास्तीत जास्त फलनिष्पत्ती कशी करता येईल, अर्थसंकल्पाची अंमलबजावणी निर्धारित कालमर्यादेच्या आत कशी पूर्ण होईल याबाबत, तसच अर्थसंकल्पातून मांडण्यात आलेली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, अशा प्रकारचे वेबिनार उत्प्रेरकाप्रमाणे काम करतात. आपण हे जाणताच की सरकारचा प्रमुख म्हणून(गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान म्हणून) काम करण्याचा मला वीस वर्षाहून जास्त अनुभव आहे. या अनुभवाचं सार हे आहे की जेव्हा कुठल्याही धोरणात्मक निर्णयाशी त्या निर्णयाशी संबंधित भागधारक सुद्धा जोडले जातात, सहभागी होतात तेव्हा त्या धोरणाचे परिणाम सुद्धा मनासारखे आणि वेळेत मिळतात. आपण पाहत आहात की गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वेबिनार मध्ये आमच्या सोबत हजारो लोक सहभागी झाले, संपूर्ण दिवसभरात सर्वांनी मिळून खूप विचार मंथन केलं आणि मी हे सांगू शकतो की खूपच महत्त्वपूर्ण सूचना या वेबिनार मधून मांडल्या गेल्या आणि विशेष करुन आगामी काळाच्या अनुषंगाने पुढे आल्या. या वेबिनार मधून, जो अर्थसंकल्प आहे त्यावरच फक्त लक्ष केंद्रित केलं गेलं आणि त्यातूनच प्राप्त परिस्थितीत कसं पुढे जाता येईल याबद्दल खूप उत्तम सूचना आल्या. आज आता आपण देशाच्या पर्यटन क्षेत्राचा कायापालट करण्याबाबत विचार मंथन करण्यासाठी हा वेबिनार करत आहोत.

‘मिशन मोडमध्ये पर्यटन विकास’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला पंतप्रधानांनी केले संबोधित

March 03rd, 10:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन मोडमध्ये पर्यटनाचा विकास’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला आज संबोधित केले. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये घोषित करण्यात आलेल्या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कल्पना आणि सूचना प्राप्त करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे आयोजित 12 अर्थसंकल्पोत्तर वेबिनार्सच्या मालिकेतील हे सातवे वेबिनार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कतारचे आमीर आमीर तामिम बिन हमद अल थानी यांच्याशी चर्चा

October 29th, 06:05 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, कतारचे आमीर तामिम बिन हमद अल थानी, यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली आणि त्यांनी दिलेल्या दिवाळी शुभेच्छांबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच कतार इथे होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

पाणी वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यकः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

March 27th, 11:00 am

गेल्या आठवड्यात आपण एक असे यश संपादन केलं आहे, ज्याचा आपल्या सर्वांनाच अभिमान वाटेल. आपण ऐकले असेल, की भारतानं गेल्या आठवड्यात, 400 अब्ज डॉलर्स म्हणजे 30 लाख कोटी रुपयांच्या निर्यातीचे लक्ष्य साध्य केलं. पहिल्यांदा हे ऐकल्यावर असं वाटेल की ही तर अर्थव्यवस्थेशी संबंधित गोष्ट आहे. मात्र, ही अर्थव्यवस्थेपेक्षाही, भारताचे सामर्थ्य, भारताच्या क्षमतेशी संबंधित बाब आहे.एक काळ असा होता, जेव्हा भारतातून होणाऱ्या निर्यातीचा आकडा देखील 100 अब्ज, कधी 200 अब्ज इतका राहत असे. मात्र, आज भारताची निर्यात, 400 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. याचा एक अर्थ असा आहे, की जगभरात, भारतात तयार होत असलेल्या उत्पादनांची मागणी वाढते आहे. आणि दूसरा अर्थ असा आहे की भारताची पुरवठा साखळी व्यवस्था देखील दिवसेंदिवस मजबूत होत चालली आहे. यातून एक खूप मोठा संदेशही आपल्याला मिळाला आहे,तो असा, की देशाच्या स्वप्नांपेक्षाही जेव्हा देशाचे संकल्प मोठे असतात, तेव्हाच देश विराट पावले उचलू शकतो. जेव्हा संकल्पपूर्ती करण्यासाठी अहोरात्र प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातात, तेव्हाच ते संकल्प खरे होतात, आणि आपण बघा, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात देखील, असेच घडते, नाही का? जेव्हा कोणाचेही संकल्प, त्यांचे प्रयत्न, त्यांच्या स्वप्नांपेक्षाही मोठे होतात, तेव्हा यश स्वतःच त्यांच्याकडे चालत येते.

योगाभ्यासासाठी अनेक राष्ट्रांतील लोकांना एकत्र आणल्याबद्दल पंतप्रधानांनी कतारमधील दोहा येथील भारतीय दूतावासाचे केले कौतुक

March 26th, 10:14 am

कतारमधील दोहा इथल्या भारतीय दूतावासाने योगाभ्यासासाठी अनेक राष्ट्रांतील लोकांना एकत्र आणण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. आरोग्य, उत्तम आणि निरोगी राखण्यासाठी योग जगाला एकत्र आणत आहे, असेही ते म्हणाले.

कोविड संदर्भात भारतीय नौदलाच्या उपक्रमांचा पंतप्रधानांनी घेतला आढावा

May 03rd, 07:40 pm

नौदल प्रमुख एडमिरल करमबीर सिंग यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

PM Modi's telephonic conversation with Amir of the State of Qatar

December 08th, 01:52 pm

Prime Minister conveyed his felicitations to H.H. The Amir for the forthcoming National Day of Qatar. While thanking Prime Minister for the greetings, H.H. The Amir appreciated the enthusiasm with which the Indian community in Qatar participates in the National Day celebrations. He also conveyed warm greetings to Prime Minister for the recent Diwali festival.

Phone call between Prime Minister Shri Narendra Modi and His Highness Sheikh Tamim Bin Hamad Al-Thani, Amir of the State of Qatar

May 26th, 08:04 pm

PM Narendra Modi spoke to HH Sheikh Tamim Bin Hamad Al-Thani, Amir of the State of Qatar. The PM highlighted attention being paid by Indian authorities to avoid any disruption in the supply of essential goods from India to Qatar during the present situation.

Telephonic Conversation between PM and Amir of the State of Qatar

March 26th, 11:25 pm

Prime Minister Shri Narendra Modi had a telephonic conversation today with His Highness Sheikh Tamim Bin Hamad al Thani, the Amir of the State of Qatar.

कतारच्या एमिरांशी पंतप्रधानांचे संभाषण

March 02nd, 09:26 pm

कतारचे अमीर शेख तामीम बिन अहमद बिन खलीफा अल थानी यांच्याशी पंतप्रधानांचे फोनवर संभाषण