पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी विविध नेत्यांची भारतभेट

June 08th, 12:24 pm

2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा 9 जून 2024 रोजी शपथविधी होणार आहे. यावेळी भारताच्या शेजारील आणि हिंद महासागर प्रदेशातील देशांच्या नेत्यांना सन्माननीय अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंगे, मालदीव्जचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मोईज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफीफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कुमार दहल प्रचंडा आणि भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोगबे यांनी या शपथविधीचे निमंत्रण स्वीकारले आहे.

पंतप्रधानपदाच्या ऐतिहासिक अशा तिसऱ्या कार्यकाळासाठी नेपाळच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान मोदी यांचे केले अभिनंदन

June 05th, 08:07 pm

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूरध्वनीवरून संभाषण झाले. भारतात नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्या ऐतिहासिक कार्यकाळासाठी मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान प्रचंड यांनी त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत- नेपाळ संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जागतिक नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी सर्व नेत्यांचे मानले आभार

August 15th, 04:21 pm

77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जागतिक नेत्यांनी केलेल्या अभिनंदनांचा स्वीकार करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या पंतप्रधानांशी साधला संवाद

August 05th, 06:16 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणि नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांचे आज दूरध्वनीवरून संभाषण झाले.

नेपाळच्या पंतप्रधानांच्या पत्नी सीता दहल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

July 12th, 01:05 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या पत्नी सीता दहल यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे आणि नेपाळच्या पंतप्रधानांप्रती शोक व्यक्त केला आहे.

नेपाळच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी पुष्पकमल दहल 'प्रचंड' यांचे केले अभिनंदन

December 25th, 10:15 pm

नेपाळच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉम्रेड 'प्रचंड' यांचे अभिनंदन केले आहे.

नेपाळचे माजी पंतप्रधान श्री पुष्पा कमल दहेल ‘ प्राचंदा’ यांची पंतप्रधानांशी भेट

September 08th, 05:07 pm

नेपाळचे भूतपूर्व पंतप्रधान आणि नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे सह-अध्यक्ष श्री पुष्पा कमल दहेल ‘ प्राचंदा’ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान मोदी यांनी नेपाळचे माजी पंतप्रधान श्री पुष्पकमल दहल 'प्रचंड' यांची भेट घेतली

May 12th, 01:27 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेपाळच्या माजी पंतप्रधान श्री पुष्पकमल दहल प्रचंड यांच्यासह विविध विषयांवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत-नेपाळ संबंधांच्या अनेक पैलूंवर चर्चा केली.