पंतप्रधानांनी महात्मा गांधींना वाहिली आदरांजली
November 21st, 09:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गयानामध्ये जॉर्ज टाऊन इथल्या ऐतिहासिक प्रोमनेड गार्डनला भेट दिली आणि तिथल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याला आदरांजली अर्पण केली. बापूंचे शांतता व अहिंसा याबाबतचे विचार मानवतेला नेहमीच मार्गदर्शन करतील असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. 1969 मध्ये गांधीजींच्या शंभराव्या जयंतीनिमित्त हा पुतळा उभारण्यात आला.