अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

November 06th, 01:57 pm

अमेरिकेच्‍या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय प्राप्त केल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.भारत-अमेरिकेतील समावेशी जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या हेतूने सहयोग पुनर्स्थापित करण्यासाठी उत्सुक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

अर्जेंटिनामधील अध्यक्षीय निवडणुकीत झालेल्या विजयाबद्दल पंतप्रधानांनी अल्बर्टो फर्नांडीज यांचे केले अभिनंदन

October 30th, 08:36 pm

“राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तुमच्या प्रभावी विजयाबद्दल अल्बर्टो फर्नांडीज आपले हार्दीक अभिनंदन. भारत आणि अर्जेंटिनामधील सामरिक भागीदारीचा विस्तार अधिक दृढ व्हावा यासाठी आपल्याबरोबर काम करण्याची अपेक्षा आहे, ”असे पंतप्रधान म्हणाले.

मेक्सिकोतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळविल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी आंद्रे मॅन्युएल यांचे अभिनंदन!

July 02nd, 06:30 pm

मेक्सिकोतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंद्रे मॅन्युएल यांचे अभिनंदन केले. “मेक्सिकोच्या राष्ट्रपतीपदावर निवडून आल्याबद्दल आंद्रे मॅन्युएल यांचे हार्दिक अभिनंदन. भारत-मेक्सिको संबंध पुढे नेण्यासाठी भरीव कार्य करण्यास आम्ही उत्सुक आहोत.” असे त्यांनी ट्वीट केले.

रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांच्याकडून अध्यक्ष पुतीन यांचे अभिनंदन

March 19th, 08:40 pm

रशियात काल झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी होत पुन्हा एकदा रशियाचे अध्यक्ष झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी श्री रामनाथ कोविंद यांचे राष्ट्रपती पदावर निवडून आल्याबद्दल अभिनंदन केले

July 20th, 05:26 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री रामनाथ कोविंद यांचे राष्ट्रपती पदावर निवडून आल्याबद्दल अभिनंदन केले

सोशल मीडिया कॉर्नर 17 जुलै 2017

July 17th, 08:40 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

जीएसटी म्हणजे 'ग्रोइंग स्ट्रॉंगर टूगेदर' : पंतप्रधान मोदी

July 17th, 10:40 am

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला वार्ताहरांशी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, जीएसटी म्हणजे 'ग्रोइंग स्ट्रॉंगर टूगेदर', मला आशा आहे की हीच भावना अधिवेशनात कायम राहील.