उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 13th, 02:10 pm
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल जी, मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य जी, ब्रजेश पाठक जी, उत्तर प्रदेशचे मंत्री, सहकारी खासदार आणि आमदार, प्रयागराजचे महापौर आणि जिल्हा पंचायत अध्यक्ष, इतर मान्यवर आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुमारे 5500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण
December 13th, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुमारे 5500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले. उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान संगमाची पवित्र भूमी असलेल्या प्रयागराजसमोर भक्तीभावाने नतमस्तक झाले आणि महाकुंभसाठी उपस्थित असलेल्या संत आणि साधूंना अभिवादन केले. मोदी यांनी कर्मचारी, श्रमिक आणि सफाई कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जे महाकुंभ यशस्वी होण्यासाठी मेहनत आणि समर्पित वृत्तीने कार्यरत आहेत. महाकुंभची भव्य व्याप्ती आणि आकार लक्षात घेत पंतप्रधान म्हणाले की, हा जगातील सर्वात मोठ्या मेळाव्यांपैकी एक आहे जिथे 45 दिवस चालणाऱ्या महायज्ञासाठी दररोज लाखो भाविकांचे स्वागत केले जाते आणि त्यासाठी संपूर्ण नवीन शहर उभारले जाते. प्रयागराजच्या भूमीवर नवा इतिहास लिहिला जात आहे, असे उद्गार पंतप्रधानांनी काढले. पुढील वर्षी होणाऱ्या महाकुंभाचे आयोजन देशाच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अस्मितेला नव्या उंचीवर नेईल असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले आणि एकतेच्या या ‘महायज्ञ’ची जगभरात चर्चा होईल असे सांगितले. महाकुंभच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान 13 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेश दौऱ्यावर
December 12th, 02:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 डिसेंबरला उत्तर प्रदेशला भेट देणार आहेत. प्रयागराज येथे ते दुपारी 12.15 च्या सुमाराला संगमावर दर्शन घेतील आणि पूजा करतील. त्यानंतर दुपारी 12:40 च्या सुमारास पंतप्रधान अक्षय वटवृक्षाची पूजा करतील आणि त्यानंतर हनुमान मंदिर आणि सरस्वती कूप येथे दर्शन आणि पूजा करतील. दुपारी दीडच्या सुमारास ते महाकुंभ प्रदर्शनाच्या ठिकाणाची पाहणी करतील. पंतप्रधान त्यानंतर दुपारी 2 च्या सुमारास प्रयागराज येथे 5500 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण करतील.भारतीय रेल्वेच्या तीन ‘मल्टीट्रॅकिंग’ प्रकल्पांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी : संपर्क यंत्रणा प्रदान करणे , प्रवास सुलभ करणे,वाहतूक खर्च कमी करणे, तेल आयात कमी करणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे उद्दिष्ट्य
November 25th, 08:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीची आज बैठक झाली. यामध्ये रेल्वे मंत्रालयाच्या एकूण अंदाजे 7,927 कोटी रूपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.गयानामधल्या भारतीय समुदायाला पंतप्रधानांनी केलेले संबोधन
November 22nd, 03:02 am
आपणा सर्वांसमवेत इथे उपस्थित राहताना मला आनंद होत आहे. आपल्यासमवेत इथे उपस्थित राहिल्याबद्दल राष्ट्रपती इरफान अली यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो. इथे दाखल झाल्यापासून मला दिलेला स्नेह आणि आपुलकी यामुळे मी भारावून गेलो आहे. राष्ट्रपती अली यांनी आपल्या निवासस्थानी केलेल्या माझ्या स्वागताबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्या कुटुंबियांचा स्नेह आणि आपुलकी यासाठीही मी आभारी आहे. आदरातिथ्य हा आपल्या संस्कृतीचा गाभा आहे, गेले दोन दिवस मी याचा अनुभव घेत आहे. राष्ट्रपती अली आणि त्यांच्या आजीसमवेत आम्ही वृक्षारोपणही केले. ‘एक पेड मां के नाम’ म्हणजेच आईसाठी वृक्षारोपण या आमच्या उपक्रमाचा हा भाग आहे. हा भावनिक क्षण माझ्या नेहमीच स्मरणात राहील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयाना मधील भारतीय समुदायाला केले संबोधित
November 22nd, 03:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयाना मधील जॉर्जटाऊन येथे आयोजित कार्यक्रमात आज तेथील भारतीय समुदायाशी संवाद साधला. गयानाचे राष्ट्रपती डॉ.इरफान आली. पंतप्रधान मार्क फिलिप्स, उपराष्ट्रपती भारत जगदेव, माजी राष्ट्रपती डोनाल्ड रमोतार यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. पंतप्रधान मोदी गयानामध्ये आल्यावर विशेष स्नेहासह त्यांचे भव्य स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी गयानाच्या राष्ट्रपतींचे आभार मानून आनंद व्यक्त केला. तसेच त्यांनी राष्ट्रपती आणि त्यांचे कुटुंबीय यांनी व्यक्त केलेला स्नेह आणि दयाळूपणा याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.“आदरातिथ्याचे तत्व आपल्या संस्कृतीच्या हृदयस्थानी आहे,”पंतप्रधान मोदी म्हणाले.भारत सरकारने सुरु केलेल्या ‘एक वृक्ष मातेसाठी’या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रपती आणि त्यांच्या आजी यांच्यासह एक रोपटे लावल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. हा एका अत्यंत भावनिक क्षण होता आणि तो आपल्या कायम स्मरणात राहील असे नोदी पुढे म्हणाले.भारत आता महामार्ग आणि उच्च तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधांमुळे ओळखला जातो: पंतप्रधान मोदी यूपीतील प्रयागराज येथे
May 21st, 04:00 pm
प्रयागराजमध्ये एका मोठ्या सार्वजनिक मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रदेशाचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित केले, आपल्या सरकारच्या काळात झालेल्या प्रगतीवर प्रकाश टाकत पूर्वीच्या शासनकाळातील परिस्थिती यांच्यातील तीव्र विरोधाभास विशद केला.पंतप्रधान मोदींची उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे प्रचार सभा
May 21st, 03:43 pm
प्रयागराजमध्ये एका भव्य प्रचार सभेला संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रदेशाचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित केले, आपल्या सरकारच्या काळात झालेल्या प्रगतीवर प्रकाश टाकत पूर्वीच्या शासनकाळातील परिस्थिती यांच्यातील तीव्र विरोधाभास विशद केला.गुजरातमध्ये अहमदाबाद येथील विकासकार्यांची पायाभरणी/उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 12th, 10:00 am
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रतजी, गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेलजी, संसदेतील माझे सहकारी आणि गुजरात प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सी.आर.पाटील आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमाशी जोडले गेलेले सर्व राज्यपाल, आदरणीय मुख्यमंत्रीगण, संसद सदस्य, आमदार, मंत्रीगण आणि मला माझ्यासमोर दिसत आहेत,ते 700 हून अधिक ठिकाणांहून तेथील खासदारांच्या नेतृत्वात, तेथील मंत्र्यांच्या नेतृत्वात लाखो लोक आज या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. कदाचित रेल्वेच्या इतिहासात एकाच वेळी भारताच्या कानाकोपऱ्यात इतका मोठा कार्यक्रम कधी झालेला नसेल. 100 वर्षांत पहिल्यांदाच असा कार्यक्रम होत असेल. या भव्य प्रमाणातील आयोजनासाठी मी रेल्वे विभागाचे देखील खूप खूप अभिनंदन करतो.गुजरातमध्ये अहमदाबाद येथे पंतप्रधानांच्या हस्ते 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण
March 12th, 09:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये अहमदाबाद येथील समर्पित मालवाहतूक मार्गिकेच्या परिचालन नियंत्रण केंद्रात 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये रेल्वेच्या पायाभूत सुविधा, जोडणी सुविधा आणि पेट्रोकेमिकल्स या क्षेत्रांसह विविध क्षेत्रांतील प्रकल्पांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी आज 10 नव्या वंदे भारत रेल्वे गाड्यांच्या सेवेची देखील सुरुवात केली.उत्तर प्रदेशमध्ये आझमगड येथे विविध प्रकल्पांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मूळ मजकूर
March 10th, 12:15 pm
आज आझमगड अभिमानाने चमकतो आहे. एक काळ असा होता की दिल्लीत कार्यक्रम आयोजित केलेला असे आणि देशातील इतर राज्ये त्यात सहभागी व्हायची. आज हा कार्यक्रम आझमगडमध्ये होतो आहे, आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक या कार्यक्रमात सामील झाले आहेत. अशा सहभागी झालेल्या हजारो लोकांचे देखील मी स्वागत करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो.पंतप्रधानांनी आझमगढमध्ये केले 34,000 कोटींहून अधिक खर्चांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी
March 10th, 11:49 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तरप्रदेशात आझमगढमध्ये 34,000 कोटींहून अधिक खर्चांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण तसेच पायाभरणी केली.शा प्रकारचा कार्यक्रम दिल्लीऐवजी आझमगढसारख्या ठिकाणी होत असल्याचा बदल झाल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी यावेळी केला. एकेकाळी मागास म्हणून गणल्या जाणाऱ्या आझमगढसारखा भाग आज विकासाचा नवीन अध्याय लिहीत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. आझमगढ मध्ये आज 34000 कोटींहून अघिक प्रकल्पांचे उद्घाटन किंवा पायाभरणी त्यांनी यावेळी केली.मन की बात, डिसेंबर 2023
December 31st, 11:30 am
नमस्कार, माझ्या प्रिय देशवासियांनो. ‘मन की बात’ म्हणजे तुम्हां सगळ्यांना भेटण्याची एक शुभ संधीच, आणि जेव्हा आपण आपल्या कुटुंबियांना भेटतो तो क्षण खूपच आनंददायी आणि समाधानकारक असतो. ‘मन की बात’ च्या माध्यमातून मी जेव्हा तुम्हाला भेटतो तेव्हा मला देखील हाच अनुभव येतो, आणि आज आपल्या एकत्रित प्रवासाचा हा 108 वा भाग आहे. आपल्याकडे 108 या अंकाचे महत्व, त्याचे पावित्र्य हा एक सखोल अध्ययनाचा विषय आहे. जपमाळेतील 108 मणी, 108 वेळा होणारा जप, 108 दिव्य क्षेत्र, मंदिरांच्या 108 पायऱ्या, 108 घंटा, 108 हा आकडा अपार श्रद्धेशी निगडीत आहे. म्हणूनच ‘मन की बात’ चा हा 108 वा भाग माझ्यासाठी अजूनच खास झाला आहे. या 108 भागांमध्ये आपण लोकसहभागाची अनेक उदाहरणे पहिली आहेत, त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे. आता या टप्प्यावर पोहोचल्यानंतर, आपल्याला नवीन जोमाने, नवीन उर्जेसह आणि अधिक वेगाने आगेकूच करण्याचा संकल्प केला पाहिजे. उद्याचा सूर्योदय हा 2024 चा पहिला सूर्योदय असणार आहे हा किती सुखद योगायोग आहे; आपण 2024 मध्ये प्रवेश केला असेल. तुम्हां सर्वाना 2024 च्या हार्दिक शुभेच्छा.नवी दिल्लीत कर्तव्यपथच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 08th, 10:41 pm
आजच्या या ऐतिहासिक कार्यक्रमाकडे संपूर्ण देशाचे डोळे लागले आहेत. सर्व देशवासीय यावेळी या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असलेल्या सर्व देशवासियांचे मी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. या ऐतिहासिक क्षणी, मंत्रीमंडळातील माझे सहकारी श्री हरदीप पुरी जी, श्री जी किशन रेड्डी जी, श्री अर्जुनराम मेघवाल जी, श्रीमती मीनाक्षी लेखी जी, श्री कौशल किशोर जी आज माझ्यासोबत मंचावर उपस्थित आहेत. देशातील अनेक मान्यवरही आज येथे उपस्थित आहेत.PM inaugurates 'Kartavya Path' and unveils the statue of Netaji Subhas Chandra Bose at India Gate
September 08th, 07:00 pm
PM Modi inaugurated Kartavya Path and unveiled the statue of Netaji Subhas Chandra Bose. Kingsway i.e. Rajpath, the symbol of colonialism, has become a matter of history from today and has been erased forever. Today a new history has been created in the form of Kartavya Path, he said.PM Modi addresses public meetings in Amethi and Prayagraj, Uttar Pradesh
February 24th, 12:32 pm
Prime Minister Narendra Modi today addressed public meetings in Uttar Pradesh’s Amethi and Prayagraj. PM Modi started his address by highlighting that after a long time, elections in UP are being held where a government is seeking votes based on development works done by it, based on works done in the interest of the poor and based on an improved situation of Law & Order.इंदूर येथे घन कचरा आधारित गोबर -धन संयंत्राच्या उदघाटन प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
February 19th, 04:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंदूर महानगरपालिकेच्या ‘गोबरधन (जैव-सीएनजी) प्रकल्पाचे” दूरदृश्य प्रणालीच्या आधारे लोकार्पण केले.मध्यप्रदेशचे राज्यपाल मधुभाई सी पटेल, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान; केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, डॉ विरेन्द्र कुमार आणि कौशल किशोर यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंदूर इथे घनकचरा आधारित ‘गोबर-धन’ या महापालिका प्रकल्पाचे उद्घाटन
February 19th, 01:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंदूर महानगरपालिकेच्या ‘गोबरधन (जैव-सीएनजी) प्रकल्पाचे” दूरदृश्य प्रणालीच्या आधारे लोकार्पण केले.मध्यप्रदेशचे राज्यपाल मधुभाई सी पटेल, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान; केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, डॉ विरेन्द्र कुमार आणि कौशल किशोर यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.उत्तर प्रदेशात प्रयागराज इथे महिलाकेन्द्री उपक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 21st, 04:48 pm
कार्यक्रमात उपस्थित उत्तर प्रदेशचे ऊर्जावान आणि कर्मयोगी मुख्यमंत्री श्रीमान योगी आदित्यनाथजी, प्रयागराजचे लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्यजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी साध्वी निरंजन ज्योतिजी, श्रीमती अनुप्रिया पटेलजी, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री डॉ महेंद्र सिंहजी, राजेन्द्र प्रताप सिंह मोतीजी, श्री सिद्धार्थनाथ सिंहजी, नन्दगोपाल गुप्ता नंदीजी, श्रीमती स्वाति सिंहजी, श्रीमती गुलाबो देवीजी, श्रीमती नीलिमा कटियारजी, संसदेतील माझ्या सहकारी भगीनी रीता बहुगुणाजी, श्रीमती हेमा मालिनीजी, श्रीमती केशरी देवी पटेलजी, डॉ संघमित्रा मौर्यजी, श्रीमती गीता शाक्यजी, श्रीमती कांता कर्दमजी, श्रीमती सीमा द्विवेदीजी, डॉ रमेश चंद बिन्दजी, प्रयागराजच्या महापौर श्रीमती अभिलाषा गुप्ताजी, जिल्हा पंचायत अध्यक्ष डॉ वीके सिंहजी, सर्व आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधी गण, तसेच इथे उपस्थित उत्तर प्रदेशचे सामर्थ्य वाढवणाऱ्या इथल्या सामर्थ्याच्या प्रतीक माझ्या माता, भगिनी ! आपणा सर्वांस माझा प्रणाम।पंतप्रधानांची प्रयागराजला भेट, लाखो महिला उपस्थित असलेल्या कार्यक्रमात घेतला सहभाग
December 21st, 01:04 pm
या प्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी विख्यात हिंदी साहित्यिक आचार्य महावीर प्रसाद द्विवेदी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली. ते म्हणाले, प्रयागराज ही गंगा-यमुना-सरस्वतीच्या संगमाची भूमी आहे, जी हजारो वर्षांपासून आपल्या मातृशक्तीचे प्रतीक आहे. आज हे तीर्थक्षेत्रही स्त्री-शक्तीचा असा अद्भुत संगम पाहत आहे, असे ते म्हणाले.