मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्यासमवेत अगालेगा बेटांवर हवाईपट्टी आणि जेटीच्या संयुक्त उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मजकूर

February 29th, 01:15 pm

महामहीम पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ, मॉरिशसच्या मंत्रिमंडळाचे उपस्थित सदस्य, भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. जयशंकर, अगालेगा येथील रहिवासी आणि आजच्या या कार्यक्रमाशी संबंधित सर्व सहकारी,

पंतप्रधान आणि मॉरिशसचे पंतप्रधान यांच्या हस्ते मॉरिशसमधील अगलेगा बेटावरील नवी धावपट्टी आणि जेट्टीचे संयुक्तपणे उद्‌घाटन

February 29th, 01:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मॉरिशसच्या अगलेगा बेटावरील नवी धावपट्टी आणि सेंट जेम्स जेट्टी यांसह अगलेगा बेटावरील सहा सामुदायिक विकास प्रकल्पांचे संयुक्तपणे उद्‌घाटन करण्यात आले. या प्रकल्पांचे उद्‌घाटन हा भारत आणि मॉरिशस या दोन देशांमधील भक्कम आणि अनेक दशके जुन्या विकासात्मक भागीदारीचा दाखला आहे. हे प्रकल्प मॉरिशसची मुख्य भूमी आणि अगलेगाबेट यांच्या दरम्यान अधिक चांगल्या वाहतुकीद्वारे संपर्क सुविधेची मागणी पूर्ण करेल, या भागातील सागरी सुरक्षा बळकट करेल आणि येथील सामाजिक आर्थिक विकासाला चालना देईल. नुकतेच 12 फेब्रुवारी 2024 ला या दोन्ही नेत्यांनी मॉरिशसमध्ये युपीआय आणि रूपे कार्ड या सेवांची सुरुवात केली होती, त्यापाठोपाठ आज झालेले प्रकल्पांचे हे उद्‌घाटन महत्त्वपूर्ण आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ 29 फेब्रुवारी रोजी मॉरिशसमधील अगालेगा बेटावर नवीन धावपट्टी आणि जेटीचे संयुक्तपणे करणार उद्‌घाटन

February 27th, 06:42 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ 29 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता दूरदृष्यप्रणालीद्वारे मॉरिशसमधील अगालेगा बेटावर सहा सामुदायिक विकास प्रकल्पांसह नवीन धावपट्टी आणि सेंट जेम्स जेट्टीचे संयुक्तपणे उद्‌घाटन करणार आहेत.

श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये यु पी आय सेवांची सुरूवात करताना पंतप्रधानांच्या संबोधनाचा मजकूर

February 12th, 01:30 pm

सन्माननीय राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे जी, सन्माननीय पंतप्रधान प्रविंद जुगनौथ जी, भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर जयशंकर जी, श्रीलंका, मॉरीशस आणि भारत यांच्या मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर आणि आज या महत्वपूर्ण कार्यक्रमाशी संबंधित सर्व सहकारी

पंतप्रधानांनी मॉरिशसचे पंतप्रधान आणि श्रीलंकेच्या अध्यक्षांसोबत संयुक्तपणे केले युपीआय सेवांचे उद्‌घाटन

February 12th, 01:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांच्यासोबत संयुक्तपणे श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये यूनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) सेवांचे आणि मॉरिशसमधील रुपे कार्ड सेवांचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्‌घाटन केले.

श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये यूपीआय सेवांच्या उद्घाटन समारंभाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ उपस्थित राहणार

February 11th, 03:13 pm

श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये युनीफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) या आर्थिक व्यवहारांच्या डिजिटल सेवांच्या, तसेच मॉरिशसमध्ये रुपे कार्डच्या उद्घाटन समारंभाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ, दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम उद्या 12 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी एक वाजता होणार आहे.