अहमदाबाद इथे प्रमुख स्वामी महाराज शताब्दी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 14th, 05:45 pm
परम पूज्य महंत स्वामी जी, पूज्य संत गण, राज्यपाल श्री आचार्य देवव्रत जी, मुख्यमंत्री श्री भूपेंद्र पटेल जी,आणि उपस्थित सर्व सत्संग परिवार, माझं हे भाग्य आहे, की मला या ऐतिहासिक कार्यक्रमाचा साक्षीदार बनण्याचे आणि सत्संगी बनण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. इतक्या मोठ्या स्तरावर आणि एक महिनाभर चालणारा हा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम केवळ संख्येच्या बळावर मोठा आहे किंवा कालावधी खूप जास्त आहे, म्हणून मोठा आहे असे नव्हे . तर ,जेवढा वेळ मी इथे घालवला, त्यावरून मला असं जाणवलं की ही दिव्यत्वाची अनुभूती आहे. इथे संकल्पांची भव्यता आहे. इथे आबालवृद्धांसाठी आपला वारसा काय आहे, आपली परंपरा काय आहे, श्रद्धा काय आहेत, आपले अध्यात्म काय आहे, संस्कृती काय आहे, आपला स्वभावधर्म काय आहे, या सगळ्या गोष्टी या परिवाराने सांभाळून ठेवल्या आहेत, त्यांचे जतन करत आहेत. इथे भारताचा प्रत्येक रंग आपल्याला दिसतो. मी या प्रसंगी, सर्व पूज्य संत गण यांना या आयोजनामागच्या कल्पनाशक्तिसाठी, आणि त्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी जे परिश्रम घेतले आहेत, त्यासाठी मी त्या सर्वांना वंदन करतो. मनापासून त्यांचे आभार मानतो. पूज्य महंत स्वामीजी यांच्या आशीर्वादाने इतके मोठे भव्य आयोजन देश आणि जगाला केवळ आकर्षित करणार नाही, तर प्रभावितही करेल, येणाऱ्या पिढ्यांनाही प्रेरणा देईल.PM addresses inaugural function of Pramukh Swami Maharaj Shatabdi Mahotsav
December 14th, 05:30 pm
PM Modi addressed the inaugural function of Pramukh Swami Maharaj Shatabdi Mahotsav in Ahmedabad. “HH Pramukh Swami Maharaj Ji was a reformist. He was special because he saw good in every person and encouraged them to focus on these strengths. He helped every inpidual who came in contact with him. I can never forget his efforts during the Machchhu dam disaster in Morbi”, the Prime Minister said.पंतप्रधानांनी शेअर केली नुकत्याच प्रक्षेपित EOS-06 उपग्रहाची अवर्णनीय छायाचित्रे
December 01st, 01:40 pm
नुकत्याच प्रक्षेपित केलेल्या EOS-06 उपग्रहाची छायाचित्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केली आहेत. अंतराळ तंत्रज्ञानाच्या जगातील या प्रगतीमुळे चक्रीवादळांचा योग्य अंदाज येण्यास मदत होईल आणि किनारपट्टी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.