महाराष्ट्रातील 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा प्रारंभ करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 19th, 05:00 pm
नवरात्रीचा पवित्र उत्सव सुरु आहे. आज नवरात्रीचा पाचवा दिवस असून या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. प्रत्येक आई तिच्या मुलांना सुख आणि यश लाभो अशी प्रार्थना करते. सुख आणि यशाची प्राप्ति केवळ शिक्षण आणि कौशल्याद्वारेच शक्य आहे. आजच्या शुभ प्रसंगी महाराष्ट्रातील आपल्या मुलामुलींच्या कौशल्य विकासासाठी एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचा शुभारंभ होत आहे. आणि माझ्या समोर जे लाखो युवक बसले आहेत आणि ज्यांनी या कौशल्य विकासाच्या मार्गावर पुढे चालण्याचा संकल्प केला आहे, त्यांना मी अवश्य सांगेन की त्यांच्या जीवनात आजची ही सकाळ मंगल प्रभात बनून आली आहे. महाराष्ट्रात 511 ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांची स्थापना होणार आहे.पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रातील 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा प्रारंभ
October 19th, 04:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 511प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांचा प्रारंभ केला. ग्रामीण युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्राच्या 34 ग्रामीण जिल्ह्यांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या या केंद्रांमध्ये विविध क्षेत्रांतील कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जाणार आहेत.पंतप्रधान 19 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ करणार
October 18th, 11:04 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 4:30 वाजता दुरदृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ होणार आहे. महाराष्ट्रातील 34 ग्रामीण जिल्ह्यांमध्ये ही केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.