पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रील प्रभूपाद जी यांच्या 150 व्या जयंतीदिनानिमत्त आयोजित कार्यक्रमामध्ये केलेले भाषण

February 08th, 01:00 pm

हरे कृष्ण! हरे कृष्ण! हरे कृष्ण! आज तुम्ही सर्वजण इथे आला आहात, त्यामुळे भारत मंडपम् ची भव्यता आणखी वाढली आहे. या भवनाची उभारणी करताना, त्याच्या मूळाशी असलेला विचार भगवान बसवेश्वर यांच्या अनुभव मंडपम् बरोबर या भारत मंडपम् ची सांगड घातली आहे. अनुभव मंडपम् प्राचीन भारतामध्ये आध्यात्मिक चर्चा-परिसंवाद यांचे केंद्र होते. अनुभव मंडपम् लोक कल्याणाची भावना आणि संकल्प यांचे ऊर्जा केंद्र होते. आज श्रील भक्तिसिद्धान्त सरस्वती गोस्वामी प्रभुपाद जी यांच्या 150 व्या जयंती निमित्त आयोजित या कार्यक्रमामध्येही अशीच ऊर्जा, असेच चैतन्य दिसून येत आहे. आमचा विचारही असाच होता की, हे भवन, भारताचे आधुनिक सामर्थ्य आणि प्राचीन मूल्ये अशा दोन्ही गोष्टींचे केंद्र बनले पाहिजे.अलिकडेच, काही महिन्यांपूर्वी जी -20 शिखर परिषदेच्या माध्यमातून इथूनच नवीन भारताच्या सामर्थ्याचे दर्शन अवघ्या जगाला झाले होते. आणि आज इथेच, ‘वर्ल्ड वैष्णव कन्व्हेंशन’चे आयोजन करण्याची संधी मोठ्या सद्भाग्याने मिळत आहे. आणि इतकेच नाही तर, भारताची जी प्रतिमा आहे... जिथे विकासही आहे आणि वारसाही आहे, अशा दोन्ही गोष्टींचा संगम घडून आला आहे. जिथे आधुनिकतेचे स्वागतही आहे आणि आपल्या ओळखीविषयी अभिमानही आहे.

पंतप्रधानांनी श्रील प्रभुपादजी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला केले संबोधित

February 08th, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत प्रगती मैदान येथील भारत मंडपम येथे श्रील प्रभुपादजी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी यावेळी आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली आणि त्यांच्या सन्मानार्थ एक स्मरणार्थ टपाल तिकीट तसेच नाणे जारी केले. गौडीया मिशनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांनी वैष्णव पंथाच्या मुलभूत तत्वांचे जतन करण्यात तसेच त्यांचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.

श्रील प्रभुपाद जी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 8 फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान करणार संबोधित

February 07th, 04:33 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12:30 वाजता भारत मंडपम, प्रगती मैदान येथे श्रील प्रभुपाद जी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. महान अध्यात्मिक गुरू श्रील प्रभुपाद जी यांच्या सन्मानार्थ पंतप्रधान तिकीट आणि नाणे जारी करतील.

पंतप्रधानांच्या हस्ते 27 ऑक्टोबर रोजी 7 व्या भारतीय मोबाइल परिषद (आयएमसी) 2023 चे होणार उद्‌घाटन

October 26th, 02:25 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 9:45 वाजता 7 व्या भारतीय मोबाइल परिषद (आयएमसी) 2023 चे नवी दिल्लीच्या प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे उद्घाटन करतील. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान देशभरातील शैक्षणिक संस्थांना 100 ‘5G यूज केस लॅब’ प्रदान करतील. या प्रयोगशाळा ‘100 5G लॅब उपक्रम’ अंतर्गत विकसित केल्या जात आहेत.

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

August 07th, 04:16 pm

काहीच दिवसांपूर्वी 'भारत मंडपमचे' लोकार्पण झाले आहे. तुमच्यापैकी अनेकजण पूर्वीही इथे यायचे आणि तंबूत आपले जग उभारायचे. आता आज तुम्ही इथला बदललेला देश पाहिला असेल आणि आज आपण या 'भारत मंडपम'मध्ये राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करत आहोत. 'भारत मंडपम'च्या या भव्यतेमध्येही भारतातील हातमाग उद्योगाची महत्त्वाची भूमिका आहे. प्राचीन आणि नव्याचा हा संगम आजचा भारत काय आहे ते सांगतो. आजचा भारत केवळ स्थानिक वस्तूंचा आग्रह धरत नाही तर त्या जगभरात पोहोचाव्या यासाठी जागतिक मंचही पुरवत आहे. काही वेळापूर्वी मला आमच्या काही विणकर मित्रांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. देशभरातील अनेक हॅण्डलूम क्लस्टर्समध्ये आमचे विणकर बंधू-भगिनी आमच्याशी जोडले जाण्यासाठी दूरदूरवरून आले आहेत. या भव्य सोहळ्यासाठी मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो, मी तुमचे अभिनंदन करतो.

नवी दिल्ली येथे राष्ट्रीय हातमाग दिन सोहळ्यात पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन

August 07th, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे प्रगती मैदानात ‘भारत मंडपम’ मध्ये राष्ट्रीय हातमाग दिन सोहळ्यामध्ये आपले विचार व्यक्त केले आणि नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीने विकसित केलेल्या ‘भारतीय वस्त्र एवं शिल्प कोष’- या वस्त्र आणि कलाकुसरीच्या वस्तू भांडाराच्या पोर्टलचे उद्घाटन केले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाला देखील पंतप्रधानांनी भेट दिली आणि तिथल्या विणकरांशी संवाद साधला. यावेळी उपस्थितांसमोर आपले विचार व्यक्त करताना पंतप्रधानांनी ‘भारत मंडपम’चा उद्घाटन सोहळा होण्यापूर्वी प्रदर्शनातील सहभागी प्रगती मैदानात कशा प्रकारे एका तंबूमध्ये आपली उत्पादने प्रदर्शित करायचे त्याची आठवण करून दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 ऑगस्ट रोजी दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय हातमाग दिन सोहळ्यात होणार सहभागी

August 05th, 10:27 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली इथे 7 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता होणाऱ्या राष्ट्रीय हातमाग दिन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे हा कार्यक्रम होणार आहे.

पंतप्रधानांनी नवी दिल्लीत प्रगती मैदानात भारत मंडपम येथे अखिल भारतीय शिक्षण समागम कार्यक्रमात केलेले भाषण

July 29th, 11:30 am

शिक्षण ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये देशाला सफल करण्याची, देशाचे भाग्य बदलण्याची, ज्यामध्ये सर्वाधिक ताकद आहे ते म्हणजे शिक्षणच. एकविसाव्या शतकातील भारत, जी उद्दिष्टे घेऊन पुढे जात आहे त्यात आपल्या शिक्षण व्यवस्थेचं महत्त्व खूप आहे. आपण सर्व या व्यवस्थेचे प्रतिनिधी आहात, ध्वजवाहक आहात. म्हणूनच ‘अखिल भारतीय शिक्षण समागम’ चा भाग व्हायला मिळाले हा माझ्यासाठीसुद्धा महत्त्वाचा क्षण आहे.

पंतप्रधानांनी दिल्लीतील भारत मंडपम् येथे अखिल भारतीय शिक्षा समागमचे केले उद्घाटन

July 29th, 10:45 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत भारत मंडपम् येथे अखिल भारतीय शिक्षा समागम् चे उद्घाटन केले. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या औचित्याने या कार्यक्रमाचे आयोजन झाले. यावेळी त्यांनी पीएम श्री या योजनेचा पहिला हप्ता देखील जारी केला. 6207 शाळांना एकूण 630 कोटी रुपयांचा पहिला हप्ता मिळाला. यावेळी त्यांना 12 भारतीय भाषांमध्ये भाषांतरित झालेल्या शिक्षण आणि कौशल्यविषयक पुस्तकांचे देखील प्रकाशन केले. तसेच यावेळी आयोजित करण्या आलेल्या प्रदर्शनाच्या ठिकाणी फेरफटका मारून पाहणी केली.

पंतप्रधानांच्या हस्ते 29 जुलै रोजी दिल्लीतील भारत मंडपम येथे होणार अखिल भारतीय शिक्षण समागमचे उद्घाटन

July 28th, 06:50 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 29 जुलै 2023 रोजी सकाळी दहा वाजता दिल्लीतील प्रगती मैदानात भारत मंडपम येथे अखिल भारतीय शिक्षण समागमचे उद्घाटन होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या तिसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन होत आहे.

नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि संमेलन केंद्र (आयईसीसी) संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

July 26th, 11:28 pm

माझ्या समोर एक अद्भुत दृश्य आहे. ते भव्य आहे, विराट आहे आणि विहंगम आहे. आणि आजचा हा जो प्रसंग आहे, त्यामागे जी कल्पना आहे आणि आपल्या डोळ्यांसमोर ते स्वप्न साकार होत असलेले पाहताना मला एका प्रसिद्ध कवितेतील ओळी गुणगुणाव्याशा वाटत आहेत :

पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रगती मैदानावरील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन तसेच संमेलन केंद्राचे (आयईसीसी) उद्घाटन

July 26th, 06:30 pm

पंतप्रधानांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथे प्रगती मैदानावरील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन तसेच संमेलन केंद्राचे (आयईसीसी) उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधानांनी यावेळी जी-20 नाणे आणि जी-20 टपाल तिकिटाचे अनावरण देखील केले. पंतप्रधानांच्या उपस्थितीत ड्रोनच्या सहाय्याने या संमेलन केंद्राचे ‘भारत मंडपम’ असे नामकरण करण्यात आले तसेच या सोहळ्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर करण्यात आला. पंतप्रधानांनी मांडलेल्या संकल्पनेतून तसेच 2700 कोटी रुपये खर्चून राष्ट्रीय प्रकल्प म्हणून विकसित करण्यात आलेले प्रगती मैदानावरील हे नवे आयईसीसी संकुल भारताला जागतिक व्यापार केंद्र म्हणून प्रसिध्द करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

पंतप्रधानांनी ITPO आंतरराष्ट्रीय प्रदर्शन-व-संमेलन केंद्रांच्या कामगारांचा केला सत्कार

July 26th, 04:47 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवीन ITPO आंतरराष्ट्रीय प्रदर्शन-सह-संमेलन केंद्राच्या इमारतीचे पूजन केले आणि केंद्राच्या बांधकामात सहभागी कामगारांचा सन्मान केला.

पंतप्रधान 26 जुलै रोजी प्रगती मैदान येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषद केंद्र (IECC) संकुल राष्ट्राला समर्पित करणार

July 24th, 07:45 pm

सुमारे 123 एकर परिसर असलेले हे संकुल भारतातील सर्वात मोठे बैठक, प्रोत्साहन, परिषद आणि प्रदर्शन स्थळ((MICE) म्हणून विकसित केले आहे. कार्यक्रमांसाठी उपलब्ध असलेल्या जागेच्या बाबतीत, जगभरातील अव्वल प्रदर्शन आणि परिषद संकुलांमधील हे एक संकुल आहे. प्रगती मैदानावर बांधण्यात आलेल्या या नवीन परिषद केंद्रात प्रदर्शन सभागृह, अॅम्फी थिएटर्स सह अनेक अत्याधुनिक सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत.

17 व्या भारतीय सहकारी महासंमेलनाला पंतप्रधान करणार संबोधित

June 30th, 03:09 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त नवी दिल्ली येथे प्रगती मैदानावर आयोजित 17 व्या भारतीय सहकारी महासंमेलनाला संबोधित करणार आहेत.

पहिल्या राष्ट्रीय प्रशिक्षण परिषदेचे पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन

June 11th, 06:02 pm

नवी दिल्ली येथील प्रगती मैदानातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि अधिवेशन केंद्रात आयोजित पहिल्या राष्ट्रीय प्रशिक्षण परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.

पंतप्रधान करणार पहिल्या राष्ट्रीय प्रशिक्षण परिषदेचे उद्घाटन

June 10th, 10:40 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावरील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि अधिवेशन केंद्रात 11 जून 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता पहिल्या-वहिल्या राष्ट्रीय प्रशिक्षण परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.

आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन -2023 च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

May 18th, 11:00 am

मंत्रिमंडळातील माझे सहकारी जी. किशन रेड्डी जी, मीनाक्षी लेखी जी, अर्जुन राम मेघवाल जी, Louvre (लुव्र) संग्रहालयाचे संचालक मॅन्युअल रबाते जी, जगातील विविध देशांतून आलेले पाहुणे, इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज संग्रहालय विश्वातील दिग्गज मंडळी इथे जमली आहेत. आजचा प्रसंगही खास आहे कारण भारत आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमृत महोत्सव साजरा करत आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन 2023 चे उद्घाटन

May 18th, 10:58 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर उभारलेल्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन 2023 चे उद्घाटन केले. तसेच त्यांनी दिल्ली परिसरातील उत्तर आणि दक्षिण ब्लॉक येथे उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या आभासी सफरीचे देखील उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी तंत्रज्ञान मेळा, संवर्धन प्रयोगशाळा तसेच या निमित्त सादर करण्यात आलेल्या प्रदर्शनांतून फेरफटका मारला. “संग्रहालये, शाश्वतता आणि स्वास्थ्य’ या यंदाच्या संकल्पनेसह 47 वा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस साजरा करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून हे आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते येत्या 18 मे रोजी, आंतरराष्ट्रीय वस्तूसंग्रहालय प्रदर्शन 2023 चे होणार उद्‌घाटन

May 16th, 06:56 pm

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत, हे आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, 47 व्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त त्याचे उद्‌घाटन होणार आहे. यंदाच्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाची संकल्पना, “संग्रहालये,शाश्वतता आणि कल्याण’ अशी आहे. या वस्तूसंग्रहालय प्रदर्शनामागचा उद्देश, संग्रहालयांबाबत या क्षेत्रातील व्यावसायिकांसोबत सर्वंकष चर्चा सुरु करणे आणि भारताच्या सांस्कृतिक मुत्सद्देगिरी मध्ये महत्वाची भूमिका पार पाडू शकतील, अशा सांस्कृतिक केंद्रांची निर्मिती करणे हा आहे.