केंद्रीय मंत्रिमंडळाने मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत केंद्रीय क्षेत्राची “प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह-योजना” (पीएम-एमकेएसएसवाय) या उपयोजनेला दिली मंजुरी आणि या योजनेमध्ये येत्या चार वर्षांत सहा हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीची परिकल्पना

February 08th, 08:58 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये आर्थिक वर्ष 2023-24 ते आर्थिक वर्ष 2026-27 या चार वर्षांच्या कालावधीत 6,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या गुंतवणुकीसह मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील सूक्ष्म आणि लघु उद्योगांच्या औपचारिकीकरणासाठी पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत केंद्रीय क्षेत्रातील “पंतप्रधान किसान समृद्धी सह-योजना” (पीएम-एमकेएसएसवाय) उपयोजनेला मंजुरी दिली आहे.