सशक्त नारी- विकसित भारत कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

March 11th, 10:30 am

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, श्री. गिरीराज सिंह जी, श्री. अर्जुन मुंडा जी, श्री. मनसुख मांडविया जी, आणि देशाच्या विविध भागातून आलेल्या, मोठ्या संख्येने इथे आलेल्या आणि तुमच्यासोबतच व्हिडिओच्या माध्यमातूनही देशभरातील लाखोंच्या संख्येने दिदी आज आपल्या सोबत सहभागी झाल्या आहेत. मी तुम्हा सर्वांचे स्वागत आणि अभिनंदन करतो. आणि या सभागृहात मला दिसतंय की कदाचित हा तर छोटा भारतच आहे. भारतातील प्रत्येक भाषेतील आणि कानाकोपऱ्यातील लोक इथे दिसत आहेत. तर, तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन.

सशक्त नारी - विकसित भारत कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी

March 11th, 10:10 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सशक्त नारी - विकसित भारत कार्यक्रमात सहभाग घेतला आणि ते नवी दिल्लीतील पुसा येथील भारतीय कृषी संशोधन संस्था येथे नमो ड्रोन दिदीद्वारे केलेल्या कृषी ड्रोन प्रात्यक्षिकांचे साक्षीदार झाले.देशभरातील 10 वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या नमो ड्रोन दीदींनीही एकाच वेळी ड्रोन प्रात्यक्षिकात भाग घेतला.कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी 1000 नमो ड्रोन दीदींना ड्रोनही सुपूर्द केले.पंतप्रधानांनी प्रत्येक जिल्ह्यात बँकांनी स्थापन केलेल्या बँक जोडणी शिबिराद्वारे बचत गटांना अनुदानित व्याजदरावर सुमारे 8,000 कोटी रुपयांचे बँक कर्ज वितरित केले.पंतप्रधानांनी सुमारे 2,000 कोटी रुपयांचा भांडवली सहाय्य निधी बचतगटांना वितरित केला. पंतप्रधानांनी लाभार्थ्यांशी संवादही साधला.

पंतप्रधान 11 मार्च रोजी नवी दिल्लीत सशक्त नारी-विकसित भारत कार्यक्रमात सहभागी होणार

March 10th, 11:14 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 मार्च रोजी सकाळी 10 वाजता नवी दिल्लीत पुसा इथे भारतीय कृषी संशोधन संस्थेत सशक्त नारी - विकसित भारत कार्यक्रमात सहभागी होतील आणि नमो ड्रोन दिदी सादर करणार असलेल्या कृषी ड्रोन प्रात्यक्षिकांना उपस्थित राहतील. देशभरातल्या विविध 11 ठिकाणांहून देखील नमो ड्रोन दिदी एकाचवेळी या ड्रोन प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी होतील. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान 1,000 नमो ड्रोन दिदींना ड्रोनसुद्धा हस्तांतरित करणार आहेत.

Today's massive program underscores BJP's commitment to harnessing the power of women for India's development: PM

March 06th, 12:30 pm

Prime Minister Narendra Modi addressed the Barasat event, in West Bengal and greeted the audience with full vigour. The PM positively remarked, “Today's massive program underscores BJP's commitment to harnessing the power of women for India's development” and added that BJP has engaged thousands of women self-help groups nationwide. Today, in West Bengal, we witness a significant conference uniting sisters from these groups, furthering the cause of empowerment and progress.”

PM Modi addressed at an enthusiasm-filled event in Barasat, West Bengal

March 06th, 12:09 pm

Prime Minister Narendra Modi addressed the Barasat event, in West Bengal and greeted the audience with full vigour. The PM positively remarked, “Today's massive program underscores BJP's commitment to harnessing the power of women for India's development” and added that BJP has engaged thousands of women self-help groups nationwide. Today, in West Bengal, we witness a significant conference uniting sisters from these groups, furthering the cause of empowerment and progress.”

स्वयं सहाय्यता गटाच्या दोन कोटी दीदींना लखपती बनवण्याच्या आपल्या स्वप्नावर पंतप्रधानांनी दिला भर

December 27th, 02:31 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विकसित भारत संकल्प यात्रा अभियानाच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला आणि उपस्थितांना संबोधित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत यात्रा कार्यक्रमांमध्ये दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलेले संबोधन

December 27th, 12:45 pm

विकसित भारताच्या संकल्पात सहभागी होण्याचा आणि देशवासीयांना जोडण्याचे हे अभियान सतत विस्तारत चालले आहे. दूर दूरच्या गावांमध्ये हे अभियान पोहोचत आहे. गरिबातल्या गरिबाला सहभागी करून घेत आहे.युवक असतील, महिला असतील, गावातील ज्येष्ठ नागरिक असतील, सर्वजण आज मोदींच्या गाडीची वाट पाहत असतात आणि मोदीच्या गाडीच्या कार्यक्रमाचे आयोजन ही करत असतात आणि यासाठी या महाअभियानाला यशस्वी बनवण्यासाठी मी आपल्या सर्व देशवासीयांचे विशेष करून माझ्या माता , भगिनींचे आभार व्यक्त करत आहे. तरुण युवकांची ऊर्जा याबरोबर जोडली गेली आहे तरुण युवकांचे परिश्रम याबरोबर जोडले गेले आहेत.सर्व तरुण मंडळी सुद्धा या कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी अभिनंदनास पात्र आहेत.काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काही कामाची वेळ असते.तेव्हा सुद्धा जेव्हा ही गाडी त्यांच्याजवळ पोहोचते तेव्हा ते आपले शेतीतले काम चार सहा तास सोडून या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. तर अशाप्रकारे खऱ्या अर्थाने गावागावात एक खूप मोठा विकासाचा महोत्सव साजरा होत आहे.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद

December 27th, 12:30 pm

या कार्यक्रमात देशभरातून विकसित भारत संकल्प यात्रेचे हजारो लाभार्थी सहभागी झाले होते . कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

वाराणसी, मधील विविध प्रकल्पांच्या उद्घाटन आणि लोकार्पण प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

December 18th, 02:16 pm

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, गुजरात विधानसभेचे अध्यक्ष आणि बनास डेयरीचे अध्यक्ष आणि आज विशेष रूपाने शेतकऱ्यांना भेट, उपहार देण्यासाठी आलेले शंकर भाई चौधरी, राज्याच्या मंत्रिमंडळातले सदस्य, आमदार, इतर मान्यवर आणि बनारसच्या माझ्या कुटुंबीयांनो…

पंतप्रधानांच्या हस्ते उत्तर प्रदेशात वाराणसी येथे 19,150 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचा कोनशीला समारंभ आणि लोकार्पण

December 18th, 02:15 pm

या प्रकल्पांमध्ये इतर अनेक रेल्वे प्रकल्पांसह 10,900 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नवीन पंडित दीनदयाळ उपाध्याय नगर- नवीन भौपूर समर्पित फ्रेट मार्गिका प्रकल्पाचा समावेश आहे. पंतप्रधानांनी नव्याने उद्घाटन झालेल्या फ्रेट मार्गिका येथे वाराणसी-नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस गाडी, डोहरीघाट-मऊ मेमू रेल्वे या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. त्यांनी बनारस लोकोमोटीव्ह वर्क्स येथे उत्पादित दहा हजाराव्या इंजिनाला देखील झेंडा दाखवून रवाना केले. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी, 370 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करून बांधण्यात आलेल्या शिवपूर-फुलवारिया-लहरतारा ग्रीन फिल्ड मार्ग तसेच दोन रेल्वे पुलांचे उद्घाटन देखील केले. पंतप्रधानांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलेल्या इतर महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये 20 रस्त्यांचे बळकटीकरण आणि विस्तारीकरण; कैथी गावातील संगम घाट रस्ता तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयाच्या निवासी इमारतीचे बांधकाम, पोलीस लाईन आणि भूल्लनपूर येथील पीएसी मध्ये दोनशे आणि दीडशे खाटांची क्षमता असलेल्या दोन बहुमजली बराक इमारती, 9 ठिकाणी बांधण्यात आलेले स्मार्ट बस निवारे आणि आलईपूर येथे उभारण्यात आलेले 132 किलोवॅट क्षमतेचे उपकेंद्र या प्रकल्पांचा समावेश आहे. याशिवाय, त्यांनी स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत एकात्मिक प्रवासी पास यंत्रणेची सुरुवात देखील केली.

देशातील महिला विकसित भारत संकल्प यात्रेच्या प्रमुख भागीदार

November 30th, 01:26 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विकसित भारत संकल्प यात्रेतील लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्यांनी प्रधानमंत्री महिला किसान ड्रोन केंद्राचेही उदघाटन केले. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी एम्स, देवघर येथील 10,000 जनौषधी केंद्राचे लोकार्पण केले. यावेळी, मोदींनी देशातील जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत नेण्याच्या कार्यक्रमासही आरंभ केला.महिला बचत गटांना ड्रोन पुरवणे आणि जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवणे या दोन्ही उपक्रमांची घोषणा पंतप्रधानांनी वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केली होती. या आश्‍वासनांची पूर्ती या कार्यक्रमाने झाली आहे.

देशातील महिला विकसित भारत संकल्प यात्रेच्या प्रमुख भागीदार

November 30th, 01:26 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विकसित भारत संकल्प यात्रेतील लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्यांनी प्रधानमंत्री महिला किसान ड्रोन केंद्राचेही उदघाटन केले. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी एम्स, देवघर येथील 10,000 जनौषधी केंद्राचे लोकार्पण केले. यावेळी, मोदींनी देशातील जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत नेण्याच्या कार्यक्रमासही आरंभ केला.महिला बचत गटांना ड्रोन पुरवणे आणि जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवणे या दोन्ही उपक्रमांची घोषणा पंतप्रधानांनी वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केली होती. या आश्‍वासनांची पूर्ती या कार्यक्रमाने झाली आहे.

जम्मूमधील सीमावर्ती भागातील,समर्पित वृत्तीने आपले काम करणाऱ्या महिला सरपंचाचे पंतप्रधानांनी केले कौतुक

November 30th, 01:25 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी प्रधानमंत्री महिला किसान ड्रोन केंद्राचाही शुभारंभ केला. सुरू केले. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी देवघर इथल्या एम्स रुग्णालयात 10,000 व्या जन औषधी केंद्राचे लोकार्पण केले. मोदींनी देशातील जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवण्याचा कार्यक्रमही सुरू केला. पंतप्रधानांनी या दोन्ही उपक्रमांची आज घोषणा केली, महिला बचत गटांना ड्रोन पुरवणे आणि जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवणे या वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केलेल्या आश्‍वासनांची पूर्तता झाल्याची खूणगाठ दर्शविणारा हा कार्यक्रम आहे.

पंतप्रधानांनी लाभार्थी शेतकऱ्याचे ‘जय जगन्नाथ’ म्हणत केले स्वागत

November 30th, 01:25 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. प्रधानमंत्री महिला किसान ड्रोन केंद्राचाही त्यांनी प्रारंभ केला. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी एम्स, देवघर येथे ऐतिहासिक 10,000 व्या जन औषधी केंद्राचे लोकार्पण केले.देशातील जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवण्याचा कार्यक्रमही मोदी यांनी यावेळी सुरू केला.या वर्षाच्या सुरुवातीला स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान, महिला बचत गटांना ड्रोन पुरवणे आणि जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवणे या या दोन्ही उपक्रमांची घोषणा पंतप्रधानांनी केली होती. या आश्‍वासनांची पूर्तता झाल्याची साक्ष आजचा हा कार्यक्रम आहे..