Prime Minister Narendra Modi to visit Assam, Arunachal Pradesh, West Bengal and Uttar Pradesh
March 08th, 04:12 pm
Prime Minister will visit Assam, Arunachal Pradesh, West Bengal and Uttar Pradesh on 8th-10th March, 2024गुजरातमधे तारभ येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 22nd, 02:00 pm
कसे आहात तुम्ही सर्वजण? या गावातील जुन्या साधुंचे दर्शन घडले, जुन्या - जुन्या साथीदारांची भेट घडली. बंधूंनो, वाडीनाथ भेटीने तर रंगत आणली, मी यापूर्वी देखील वाडीनाथला आलो आहे, अनेकदा आलो आहे, मात्र आजचा उत्साह काही आगळाच आहे. जगात माझे कितीही जोशात स्वागत झालेले असो, सन्मान झालेला असो, परंतु जेव्हा हे स्वागत, हा सन्मान जेव्हा आपल्या घरात होतो तेव्हा त्याचा आनंद काही वेगळ्याच स्वरुपाचा असतो. माझ्या गावामधले काही जण अधून-मधून दिसत होते आज, आणि मामाच्या घरी आलो आहे तर त्याचा आनंद देखील खुप अनोखा असतो, असे वातावरण मी पाहिले आहे, त्याच्याच आधारे मी सांगतो आहे की श्रद्धा आणि आस्थेने ओतप्रोत भरलेल्या तुम्हा सर्व भक्त गणांना माझा सादर प्रणाम. योगायोग पहा कसा आहे, आजपासून बरोबर एका महिन्यांपूर्वी, 22 जानेवारीला मी अयोध्येत प्रभु श्रीरामाच्या चरणी लीन होतो. तिथे मला प्रभु रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेच्या ऐतिहासिक आयोजनात सहभागी होण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. त्यानंतर 14 फेब्रुवारीला, वसंत पंचमीच्या दिवशी अबु धाबीमध्ये, आखाती देशातील पहिल्या हिंदू मंदिराचे लोकार्पण करण्याची संधी मिळाली आणि आत्ताच, दोन तीन दिवसांपूर्वीच मला उत्तर प्रदेशातील संभल येथील कल्की धाम मंदिराची पायाभरणी करण्याची देखील संधी मिळाली. आणि आता आज, मला येथे, तरभ गावात या भव्य, दिव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठेनंतर पूजा करण्याच्या समारंभात सहभागी होण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे.पंतप्रधानांकडून गुजरातमध्ये तारभ, मेहसाणा येथे 13,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण
February 22nd, 01:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील तारभ, महेसाणा येथे 13,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. या प्रकल्पांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी, रेल्वे, रस्ते, शिक्षण, आरोग्य, दळणवळण, संशोधन आणि पर्यटन अशा अनेक क्षेत्रांचा समावेश आहे.विकसित भारत विकसित गुजरात कार्यक्रमात पंतप्रधानांचे संबोधन
February 10th, 01:40 pm
गुजरातच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, केम छो...मजा मा. आज विकसित भारत-विकसित गुजरात हे फार मोठे अभियान सुरु होत आहे. आणि मला असे सांगण्यात आले आहे की, गुजरातमधील विधानसभेच्या सर्वच्या सर्व 182 जागांवर गुजरातच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. विकसित गुजरातच्या या प्रवासात तुम्ही सर्वजण इतक्या उत्साहाने सहभागी झाला आहात...मी तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो.‘विकसित भारत विकसित गुजरात’ कार्यक्रमात पंतप्रधानांचे मार्गदर्शन
February 10th, 01:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘विकसित भारत विकसित गुजरात’ या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी प्रधानमंत्री आवास योजना(PMAY) आणि इतर गृहनिर्माण योजनांतर्गत गुजरातमध्ये बांधण्यात आलेल्या 1.3 लाखांपेक्षा जास्त घरांचे उद्घाटन आणि भूमीपूजन केले. यावेळी त्यांनी आवास योजनेच्या काही लाभार्थ्यांसोबत संवाद देखील साधला.विकसित भारत संकल्प यात्रेत पंतप्रधानांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून केलेल्या भाषणाचा मजकूर
January 18th, 12:47 pm
विकासित भारत संकल्प यात्रेला 2 महिने पूर्ण झाले आहेत. या प्रवासात धावणारा विकासाचा रथ हा श्रद्धेचा रथ असून आता लोक त्याला हमीचा रथ देखील म्हणू लागले आहेत. योजनांच्या लाभापासून कुणीही वंचित राहणार नाही, कुणीही लाभ मिळाल्या वाचून राहणार नाही, असा विश्वास आता निर्माण होत आहे. त्यामुळे ज्या गावांमध्ये मोदींच्या हमीची गाडी अद्याप पोहोचलेली नाही, तिथे तिची आता अगदी आतुरतेने प्रतिक्षा होत आहे. आणि म्हणूनच आम्ही यापूर्वी 26 जानेवारीपर्यंत ही यात्रा सुरु ठेवण्याचा विचार केला होता, परंतु आम्हाला एवढा पाठिंबा मिळाला, एवढी मागणी वाढली, प्रत्येक गावातील लोक सांगत आहेत की मोदींची हमी असलेले वाहन आमच्या ठिकाणी यावे. तेव्हा मला हे कळल्यावर मी आमच्या सरकारी अधिकाऱ्यांना सांगितले की 26 जानेवारीपर्यंतच नाही तर आणखी थोडी मुदतवाढ द्या. लोकांना गरज आहे, लोकांची मागणी आहे तर ती आपल्याला पूर्ण करावी लागेल. आणि त्यामुळे कदाचित काही दिवसांनी हे ही निश्चित होईल की मोदींची हमीची गाडी कदाचित फेब्रुवारी महिन्यातही चालवली जाईल.विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद
January 18th, 12:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात देशभरातून विकसित भारत संकल्प यात्रेचे हजारो लाभार्थी सामील झाले. कार्यक्रमात केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधीही सहभागी झाले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी रोजी पीएम जनमन अंतर्गत, प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण च्या 1 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता करणार जारी
January 14th, 01:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (पीएम जनमन) अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण (पीएमएवाय - जी) च्या 1 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता जारी करतील. यावेळी, पंतप्रधान पीएम-जनमन अभियानाच्या लाभार्थ्यांशी संवादही साधतील.