पंतप्रधान भुवनेश्वर येथे 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस महासंचालक/महानिरीक्षकांच्या परिषदेला पंतप्रधान राहणार उपस्थित
November 29th, 09:54 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2024 या कालावधीत ओडिशा येथे आयोजित अखिल भारतीय पोलीस महासंचालक/महानिरीक्षक परिषद 2024 ला उपस्थित राहणार आहेत. भुवनेश्वरमधील लोकसेवा भवनातील राज्य संमेलन केंद्रात या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.माजी पोलीस प्रमुख प्रकाश सिंग यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
September 03rd, 10:51 am
माजी पोलीस प्रमुख प्रकाश सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेत केलेले भाषण
August 31st, 10:30 am
तुम्ही लोक खूप गंभीर आहात, त्यामुळे मला असे वाटते की हा सोहळाही खूप गंभीर आहे. काही दिवसांपूर्वी मी राजस्थान उच्च न्यायालयाच्या प्लॅटिनम ज्युबिली समारंभाला गेलो होतो. आणि, आज सर्वोच्च न्यायालयाच्या 75 वर्षांच्या वाटचालीच्या निमित्ताने जिल्हा न्यायपालिकेची राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाची 75 वर्षे, हा केवळ एका संस्थेचा प्रवास नाही. हा आहे भारताच्या संविधानाचा आणि संविधानिक मूल्यांचा प्रवास! हा प्रवास आहे- एक लोकशाही म्हणून भारताचा अधिक परिपक्व होण्याचा प्रवास! आणि या प्रवासात आपल्या संविधान निर्मात्यांचे आणि न्यायव्यवस्थेतील अनेक जाणकारांचे योगदान मोलाचे आहे. यात पिढ्यानपिढ्या कोट्यवधी देशबांधवांचे योगदान आहे, ज्यांनी प्रत्येक परिस्थितीत न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला आहे. भारतातील जनतेने सर्वोच्च न्यायालयावर, आपल्या न्यायव्यवस्थेवर कधीच अविश्वास दाखवला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाची ही 75 वर्षे लोकशाहीची माता म्हणून भारताचा बहुमान आणखी वाढवत आहेत. हे आपल्या सांस्कृतिक घोषणेला बळ देते – ज्यामध्ये म्हटले आहे सत्यमेव जयते, नानृतम्. यावेळी देश आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करून संविधानाचा 75 वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. त्यामुळे या प्रसंगी अभिमानही आहे, सन्मान आहे आणि प्रेरणा आहे. या निमित्त मी तुम्हा सर्व विधिज्ञांचे आणि सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. यानिमित्ताने राष्ट्रीय जिल्हा न्यायिक परिषदेच्या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे जिल्हा न्यायपालिकांच्या राष्ट्रीय परिषदेचे केले उदघाटन
August 31st, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेच्या अमृत महोत्सवी 75 वर्षांच्या कार्यकाळाच्या निमित्ताने एका टपाल तिकिटाचे आणि नाण्याचे प्रकाशन देखील केले. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने आयोजित केलेल्या या दोन दिवसीय परिषदेत जिल्हा न्यायव्यवस्थेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा आणि विचारमंथन करण्यासाठी पाच कामकाजांची सत्रे आयोजित केली आहेत; ज्यात पायाभूत सुविधा आणि मानव संसाधने, सर्वांसाठी सर्वसमावेशक न्यायालये, न्यायिक सुरक्षा आणि न्यायिक कल्याण, खटल्यांचे व्यवस्थापन आणि न्यायिक प्रशिक्षण,या विषयांचा समावेश आहे.PM Modi's conversation with Lakhpati Didis in Jalgaon, Maharashtra
August 26th, 01:46 pm
PM Modi had an enriching interaction with Lakhpati Didis in Jalgaon, Maharashtra. The women, who are associated with various self-help groups shared their life journeys and how the Lakhpati Didi initiative is transforming their lives.महाराष्ट्रातल्या जळगाव येथे लखपती दीदी संमेलनात पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 25th, 01:00 pm
महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन जी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी आणि देशाचे कृषीमंत्री, ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान जी, इथले स्थानिक भूमीपुत्र आणि मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रतापराव जाधव, केंद्र सरकार मधील आमचे मंत्री चंद्रशेखर जी, इथल्या स्थानिक भूमिपुत्र भगिनी रक्षा खडसे जी, उपमुख्यमंत्री अजित पवार जी, देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्र सरकार मधले मंत्री, खासदार आणि आमदार तसेच एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या आमच्या माता भगिनी. लांब लांब पर्यंत जिथपर्यंत माझी दृष्टी पोहोचत आहे असं वाटतंय की मातांचा महासागर इथे निर्माण झाला आहे. हे दृश्य माझ्या मनाला अतीव समाधान देत आहेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात जळगाव येथे लखपती दीदी संमेलनाला केले संबोधित
August 25th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात जळगाव येथे लखपती दीदी संमेलनात सहभागी झाले. विद्यमान सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात अलीकडेच लखपती बनलेल्या 11 लाख नवीन लखपती दीदींना त्यांनी प्रमाणपत्रे प्रदान केली तसेच त्यांचा सत्कारही केला. पंतप्रधानांनी देशभरातील लखपती दीदींशी संवादही साधला. मोदी यांनी 2,500 कोटी रुपयांचा फिरता निधी जारी केला, ज्याचा 4.3 लाख बचत गटांच्या सुमारे 48 लाख सदस्यांना फायदा होणार आहे. त्यांनी 5,000 कोटी रुपयांचे बँक कर्ज देखील वितरित केले ज्याचा 2.35 लाख बचत गटांच्या 25.8 लाख सदस्यांना फायदा होणार आहे. लखपती दीदी योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत एक कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्यात आले असून सरकारने तीन कोटी लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.पंतप्रधान 6-7 जानेवारी रोजी अखिल भारतीय पोलीस महासंचालक/महानिरीक्षक परिषदेला उपस्थित राहणार
January 04th, 12:04 pm
तीन दिवसांची ही परिषद 5 ते 7 जानेवारी 2024 या कालावधीत होणार असून यात सायबर गुन्हे, पोलीस कार्यातील तंत्रज्ञान, दहशतवादविरोधी कारवाईतील आव्हाने, नक्षलवाद, तुरुंग सुधारणा यासह पोलीस कार्य आणि अंतर्गत सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली जाईल. नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसाठीच्या आराखड्यावरही परिषदेत चर्चा नियोजित आहे. एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता, डीपफेक इत्यादीसारख्या नवीन तंत्रज्ञानामुळे निर्माण होणारी आव्हाने आणि त्यांच्यावर मात करण्याचे मार्ग यांसारख्या भविष्यातील पोलीस कार्य आणि सुरक्षेशी संबंधित संकल्पनांवर या परिषदेत चर्चा होईल. ठोस कृतीचे मुद्दे निश्चित करणे आणि त्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्याची संधी ही परिषद पुरवते. तसेच या बाबतचे सादरीकरणही पंतप्रधानांसमोर दरवर्षी केले जाते.सरकारी विभागांमध्ये नव्याने भरती झालेल्या 51000+ जणांच्या नियुक्ती पत्रांच्या वितरणावेळी पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन
August 28th, 11:20 am
स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात, देशाचे स्वातंतत्र्याचे आणि देशातील कोटि-कोटि नागरिकांचे अमृत-रक्षक झाल्यानिमित्त तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा. मी तुम्हाला अमृतरक्षक यासाठी म्हटले, कारण आज ज्या तरुणांना नियुक्तीपत्र मिळत आहेत, ते देशाच्या सेवे सोबतच देशाचे नागरिक आणि देशाचेही रक्षण करतील. म्हणून तुम्ही एकाप्रकारे या अमृतकाळाचे जन (नागरीक) आणि अमृत-रक्षक देखील आहात.रोजगार मेळ्याअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 51 हजारांहून अधिक नियुक्तीपत्रं प्रदान
August 28th, 10:43 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवारांना 51 हजारांहून अधिक नियुक्तीपत्रे प्रदान केली. देशभरात 45 ठिकाणी रोजगार मेळे आयोजित करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्या द्वारे, केंद्रीय राखीव पोलीस दल (सी आर पी एफ), सीमा सुरक्षा दल (बी एस एफ), सशस्त्र सीमा दल (एस एस बी), आसाम रायफल्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सी आय एस एफ), भारत तिबेट सीमा पोलीस दल (आय टी बी पी) आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (एन सी बी) तसेच दिल्ली पोलीस अशा विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये (सी ए पी एफ), केंद्रीय गृहमंत्रालय भर्ती करत आहे. देशभरातून निवडलेले नवीन कर्मचारी, गृह मंत्रालयाच्या विविध संस्थांमध्ये, हवालदार (जनरल ड्युटी), उपनिरीक्षक (जनरल ड्युटी) आणि बिगर जनरल ड्युटी श्रेणीतील पदे, अशा विविध पदांवर रुजू होणार आहेत.उत्तर प्रदेश रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश
February 26th, 12:01 pm
या दिवसांमध्ये रोजगार मेळावे माझ्यासाठी एक प्रमुख कार्यक्रम बनले आहेत. मागच्या काही महिन्यांपासून मी बघत आहे की प्रत्येक आठवड्याला भाजपा -शासित कोणत्या ना कोणत्या राज्यामध्ये रोजगार मेळावे होत आहेत, हजारो युवकांना रोजगार नियुक्तीपत्र दिले जात आहेत. मला याचा आनंद आहे की मला त्यामध्ये सहभागी होण्याचं भाग्य मिळत आहे. हे प्रतिभावंत युवक सरकारी यंत्रणेत नवीन विचार घेऊन येत आहेत, कार्यक्षमता वाढवण्यात मदत करत आहेत.उत्तरप्रदेशातील रोजगार मेळाव्याला पंतप्रधानांनी केले संबोधित
February 26th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेश सरकारच्या रोजगार मेळाव्याला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. या मेळाव्यात, उत्तरप्रदेशात पोलिसांत उपनिरीक्षकांच्या थेट भरतीसाठी आणि नागरीक पोलिस, प्लाटून कमांडर तसेच अग्निशमन विभागातील दुय्यम अधिकारी अशा समकक्ष पदांसाठी नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.नवी दिल्लीत 21-22 जानेवारी रोजी होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस महासंचालक/पोलीस महानिरीक्षक परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार
January 20th, 07:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आणि परवा (21- 22 जानेवारी 2023)नवी दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस महासंचालक/पोलीस महानिरीक्षक परिषदेला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय कृषी विज्ञान संकुल, पुसा येथे ही तीन दिवसीय परिषद होईल.महाराष्ट्र रोजगार मेळाव्यातील पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश
November 03rd, 11:37 am
देशातील तरुणांना सरकारी विभागांमध्ये सामूहिकरित्या नियुक्तीपत्र देण्याच्या अभियानात, आज महाराष्ट्राचे नावही जोडले जात आहे. केंद्र सरकारने धनत्रयोदशीच्या दिवशी दहा लाख नोकऱ्या देण्याच्या अभियानाची सुरुवात केली होती. मी तेव्हाच म्हटले होते की येणाऱ्या दिवसात, विविध राज्य सरकारे देखील याच प्रकारे रोजगार मेळावे घेतील. याच शृंखलेत आज महाराष्ट्रात शेकडो तरुणांना एकाच वेळी नियुक्तीपत्रे दिली जात आहेत. ज्या युवक युवतींना आज नियुक्तीपत्र प्राप्त होत आहेत त्यांना मी खूप शुभेच्छा देतो.पंतप्रधानांनी महाराष्ट्र रोजगार मेळाव्याला केले संबोधित
November 03rd, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्र सरकारच्या रोजगार मेळाव्याला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. पंतप्रधानांनी, धनत्रयोदशीच्या दिवशी केंद्रीय स्तरावर रोजगार मेळाव्याच्या संकल्पनेचा शुभारंभ केला. केंद्र सरकारच्या पातळीवर 10 लाख नोकऱ्या देण्याच्या मोहिमेची ही सुरुवात होती. तेव्हापासून पंतप्रधानांनी गुजरात आणि जम्मू-काश्मीर सरकारच्या रोजगार मेळाव्यांना संबोधित केले आहे. इतक्या कमी कालवाधीत झालेले रोजगार मेळाव्याचे आयोजन पाहता “महाराष्ट्र सरकार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृढ संकल्पाने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या काळात महाराष्ट्रात अशा रोजगार मेळाव्यांचा अधिक विस्तार होईल याचा मला आनंद आहे”. महाराष्ट्राचा गृह विभाग आणि राज्याच्या ग्रामीण विकास विभागात हजारो नियुक्त्या होणार आहेत असे मोदी म्हणाले.पंतप्रधान 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर गुजरात आणि राजस्थानच्या दौऱ्यावर
October 29th, 08:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2022 दरम्यान गुजरात आणि राजस्थान दौ-यावर जाणार आहेत.The 'Panch Pran' must be the guiding force for good governance: PM Modi
October 28th, 10:31 am
PM Modi addressed the ‘Chintan Shivir’ of Home Ministers of States. The Prime Minister emphasized the link between the law and order system and the development of the states. “It is very important for the entire law and order system to be reliable. Its trust and perception among the public are very important”, he pointed out.PM addresses ‘Chintan Shivir’ of Home Ministers of States
October 28th, 10:30 am
PM Modi addressed the ‘Chintan Shivir’ of Home Ministers of States. The Prime Minister emphasized the link between the law and order system and the development of the states. “It is very important for the entire law and order system to be reliable. Its trust and perception among the public are very important”, he pointed out.When the forces of good cooperate, the forces of crime cannot operate: PM Modi
October 18th, 01:40 pm
Prime Minister Modi addressed the INTERPOL General Assembly in New Delhi. He said, There are many harmful globalised threats that the world faces. Terrorism, corruption, drug trafficking, poaching and organised crime. The pace of change of these dangers is faster than earlier. When threats are global, the response cannot be just local! It is high time that the world comes together to defeat these threats.नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथे आयोजित इंटरपोलच्या 90 व्या महासभेला पंतप्रधानांनी केले संबोधित
October 18th, 01:35 pm
नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथे आयोजित इंटरपोलच्या 90 व्या महासभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले.