Joint Fact Sheet: The United States and India Continue to Expand Comprehensive and Global Strategic Partnership

September 22nd, 12:00 pm

President Biden and PM Modi reaffirmed the U.S.-India Comprehensive Global and Strategic Partnership, highlighting unprecedented levels of trust and collaboration. They emphasized shared values like democracy, freedom, and human rights, while commending progress in defense cooperation. President Biden praised India's global leadership, including its G-20 role and humanitarian efforts in Ukraine. Both leaders supported India's permanent membership in a reformed U.N. Security Council and underscored the importance of the U.S.-India partnership in building a secure, prosperous, and inclusive future.

PM Modi's conversation with Lakhpati Didis in Jalgaon, Maharashtra

August 26th, 01:46 pm

PM Modi had an enriching interaction with Lakhpati Didis in Jalgaon, Maharashtra. The women, who are associated with various self-help groups shared their life journeys and how the Lakhpati Didi initiative is transforming their lives.

महाराष्ट्रातल्या जळगाव येथे लखपती दीदी संमेलनात पंतप्रधानांनी केलेले भाषण

August 25th, 01:00 pm

महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन जी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी आणि देशाचे कृषीमंत्री, ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान जी, इथले स्थानिक भूमीपुत्र आणि मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रतापराव जाधव, केंद्र सरकार मधील आमचे मंत्री चंद्रशेखर जी, इथल्या स्थानिक भूमिपुत्र भगिनी रक्षा खडसे जी, उपमुख्यमंत्री अजित पवार जी, देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्र सरकार मधले मंत्री, खासदार आणि आमदार तसेच एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या आमच्या माता भगिनी. लांब लांब पर्यंत जिथपर्यंत माझी दृष्टी पोहोचत आहे असं वाटतंय की मातांचा महासागर इथे निर्माण झाला आहे. हे दृश्य माझ्या मनाला अतीव समाधान देत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात जळगाव येथे लखपती दीदी संमेलनाला केले संबोधित

August 25th, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात जळगाव येथे लखपती दीदी संमेलनात सहभागी झाले. विद्यमान सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात अलीकडेच लखपती बनलेल्या 11 लाख नवीन लखपती दीदींना त्यांनी प्रमाणपत्रे प्रदान केली तसेच त्यांचा सत्कारही केला. पंतप्रधानांनी देशभरातील लखपती दीदींशी संवादही साधला. मोदी यांनी 2,500 कोटी रुपयांचा फिरता निधी जारी केला, ज्याचा 4.3 लाख बचत गटांच्या सुमारे 48 लाख सदस्यांना फायदा होणार आहे. त्यांनी 5,000 कोटी रुपयांचे बँक कर्ज देखील वितरित केले ज्याचा 2.35 लाख बचत गटांच्या 25.8 लाख सदस्यांना फायदा होणार आहे. लखपती दीदी योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत एक कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्यात आले असून सरकारने तीन कोटी लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलिश कबड्डीपटूंची घेतली भेट

August 22nd, 09:48 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वॉर्सा येथे पोलंडच्या कबड्डी महासंघाचे अध्यक्ष मिचल स्पिक्झको आणि पोलंडच्या कबड्डी महासंघाच्या बोर्ड सदस्य ऍना काल्बार्झिक यांची भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिलेनियमचे मुख्य कार्यकारी अधिकारी गावेल लोपिन्स्की यांची भेट

August 22nd, 09:22 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिलेनियम प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी गावेल लोपिन्स्की यांची भेट घेतली. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्‍ये कार्यरत असलेल्‍या या प्रख्‍यात पोलिश कंपनीचे पुणे येथे कार्यालय आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘टीझेडएमओ’ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालिका ॲलिना पोसलुसझनी यांची घेतली भेट

August 22nd, 09:20 pm

वैविध्यपूर्ण स्वच्छता उत्पादनांची निर्मिती करणारी प्रमुख पोलिश उत्पादक कंपनी ‘टीझेडएमओ’इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालिका ॲलिना पोसलुसझनी यांची भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात पोलिश इंडोलॉजिस्टची घेतली भेट

August 22nd, 09:18 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रख्यात पोलिश इंडोलॉजिस्टच्या समूहाची भेट घेतली. या समूहात पुढील व्यक्तींचा समावेश होता:

भारत-पोलंड धोरणात्मक भागीदारीच्या अंमलबजावणीसाठीची कृती योजना (2024-2028)

August 22nd, 08:22 pm

वॉर्सॉ येथे दिनांक 22 ऑगस्ट, 2024 रोजी भारत आणि पोलंड च्या पंतप्रधानांनी केलेल्या चर्चेतून गाठलेल्या सहमतीच्या आधारावर आणि धोरणात्मक भागीदारीच्या स्थापनेतून निर्माण झालेल्या द्विपक्षीय सहकार्याच्या गतीला मान्यता देऊन प्राधान्यक्रम म्हणून खालील क्षेत्रांमध्ये 2024-2028 या काळात द्विपक्षीय सहकार्याला दिशा देणारी पंचवार्षिक कृतीयोजना तयार करण्यास दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी संमती दिली:

भारत-पोलंड संयुक्त निवेदन "धोरणात्मक भागिदारीची स्थापना”

August 22nd, 08:21 pm

पोलंड प्रजासत्ताकाचे पंतप्रधान माननीय श्री डोनाल्ड टस्क यांच्या निमंत्रणावरून, भारतीय प्रजासत्ताकाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 21-22 ऑगस्ट 2024 या कालावधीत पोलंडला औपचारिक भेट दिली. दोन्ही राष्ट्रे आपल्या राजनैतिक संबंधांचा 70 वा वर्धापन दिन साजरा करत असताना ही ऐतिहासिक भेट झाली.

पोलंडमधील वॉर्सा येथे अज्ञात सैनिकाच्या समाधीस्थळी पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

August 22nd, 08:12 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोलंडमधील वॉर्सा येथे अज्ञात सैनिकाच्या समाधीस्थळी आदरांजली वाहिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची भेट

August 22nd, 06:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची आज वॉर्सा येथे भेट घेतली. पोलंडच्या ‘फेडरल चॅन्सेलरी’ येथे आगमन झाल्यावर पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. आणि त्यानंतर त्यांचे समारंभपूर्वक स्वागत करण्‍यात आले.

पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान मोदी यांनी दिलेले निवेदन

August 22nd, 03:00 pm

वॉर्सासारख्या सुंदर शहरामध्ये अतिशय उत्साहात केलेले स्वागत, भव्य आदरातिथ्य, सत्कार आणि मित्रत्वाच्या नात्याने भारलेले शब्द, यासाठी मी पंतप्रधान टस्क यांचे अगदी हृदयापासून आभार व्यक्त करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉर्सा येथील डॉब्री महाराजा स्मारकस्थळी वाहिली आदरांजली

August 21st, 11:57 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी वॉर्सा येथील डोब्री महाराजा स्मारकाला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

पंतप्रधानांनी कोल्हापूर स्मारकाला दिली भेट

August 21st, 11:56 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोलंडमधील वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारक इथे पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

मॉंटे कॅसिनो इथे असलेल्या युद्ध स्मारकाला पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली.

August 21st, 11:55 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वार्सामधील मॉंटे कॅसिनो इथे असलेल्या युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली.

पोलंडमधील वॉर्सा इथे भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

August 21st, 11:45 pm

हे दृश्य खरोखरच अद्भुत आहे आणि तुमचा उत्साह देखील अद्भुत आहे . मी इथं पाय ठेवल्यापासून पाहतो आहे तुम्ही थकतच नाही आहात. तुम्ही सर्व जण पोलंडच्या वेगवेगळ्या भागातून आला आहात, सर्वांची भाषा, बोली, खाण्याच्या सवयी भिन्न आहेत. मात्र प्रत्येकजण भारतीयत्वाच्या भावनेने जोडलेला आहे. तुम्ही माझे येथे इतके छान स्वागत केले आहे, या स्वागतासाठी मी तुम्हा सर्वांचा, पोलंडच्या जनतेचा खूप आभारी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले पोलंडमधील भारतीय समुदायाला संबोधित

August 21st, 11:30 pm

त्याआधी पोलंडमधल्या भारतीय समुदायाने पंतप्रधानांचे मोठ्या जल्लोष आणि उत्साहात स्वागत केले. सुमारे 45 वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान पोलंडच्या भेटीवर आल्याची बाब पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात नमूद केली. या भेटीत आपण पोलंडचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेज डुडा आणि पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची भेट घेण्यासाठी, तसेच भारत आणि पोलंडमधली संबंध अधिक दृढ करण्यासाठी आतुर असल्याचे त्यांनी सांगितले. भारत ही लोकशाहीची जननी आहे, या नात्याने तसेच भारत आणि पोलंडमधली एकसामाईक मूल्ये दोन्ही देशांना

PM Modi pays tributes to Jam Saheb of Nawanagar Memorial in Warsaw, Poland

August 21st, 10:27 pm

PM Modi paid tributes to Jam Saheb of Nawanagar Memorial in Warsaw, Poland. Shri Modi said that the Jam Saheb of Nawanagar Memorial in Warsaw, Poland highlights the humanitarian contribution of Jam Saheb Digvijaysinhji Ranjitsinhji Jadeja, who ensured shelter as well as care to Polish children left homeless due to the Second World War.

पंतप्रधान मोदींचे पोलंडमध्ये वॉर्सा येथे आगमन

August 21st, 06:11 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंडमधील वॉर्सा येथे दाखल झाले आहेत. भारताच्या पंतप्रधानांची गेल्या 45 वर्षांतील ही पहिलीच भेट आहे. ते अध्यक्ष माननीय श्री आंद्रेज सेबॅस्टियन डुडा तसेच पंतप्रधान माननीय श्री. डोनाल्ड टस्क यांची भेट घेणार असून पोलंडमधील भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत.