न्यायमूर्ती पी.एन.भगवती यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

June 15th, 11:20 pm

न्यायमूर्ती पी.एन.भगवती यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकभावना व्यक्त केल्या असून श्रद्धांजली वाहिली आहे.“भारताचे ज्येष्ठ कायदेतज्ञ, न्यायमूर्ती पी.एन.भगवती यांच्या निधनाच्या वृत्ताने आपल्याला दु:ख झाले आहे. त्यांना माझी श्रद्धांजली.आपल्या न्यायपद्धतीचा लाभ अनेकांना सहजपणे घेता यावा, यासाठी न्यायमूर्ती पी.एन.भगवती यांनी केलेले प्रयत्न विशेष लक्षात राहण्यासारखे आहेत तसेच न्याय पद्धतीतून आवाज उठवता येऊ शकतो. हे त्यांनी लक्षावधी लोकांच्या लक्षात आणून दिले” असे पंतप्रधानांनी शोकसंदेशात म्हटले आहे.