
झारखंड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील सात जिल्ह्यांमध्ये भारतीय रेल्वेच्या दोन बहुमार्गिका प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता; यामुळे रेल्वेचे जाळे सुमारे 318 किलोमीटरने वाढणार
June 11th, 03:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आज झालेल्या बैठकीत आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने रेल्वे मंत्रालयाच्या एकूण 6,405 कोटी रुपयांच्या दोन प्रकल्पांना मंजुरी दिली. या प्रकल्पांमध्ये पुढील कामांचा समावेश आहे:-
भारतीय रेल्वेच्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
May 28th, 03:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज प्रवासी आणि मालवाहतूक सुरळीत आणि जलद गतीने व्हावी, यासाठी भारतीय रेल्वेच्या दोन मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली.
गुजरातमधील दाहोद येथे विविध विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 26th, 11:45 am
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, गुजरात सरकारच्या मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, खासदार, आमदार आणि इतर सर्व मान्यवर आणि दाहोदचे माझे प्रिय बंधू आणि भगिनी, कसे आहात आपण? जरा मोठय़ा आवाजात उत्तर द्या, आता दाहोदचा प्रभाव वाढला आहे. आज 26 मे आहे. 2014 मध्ये आजच्याच दिवशी मी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. तिरंगा झेंडा हवा आहे, तुम्ही गुजरातच्या जनतेने मला भरभरून आशीर्वाद दिला आणि नंतर देशातील कोट्यवधी जनतेनेही मला आशीर्वाद देण्यात कोणतीही कसर सोडली नाही. तुमच्या आशीर्वादाच्या बळावर मी दिवसरात्र देशवासीयांच्या सेवेत आहे. या वर्षांमध्ये देशाने असे निर्णय घेतले, जे अकल्पनीय होते, ते अभूतपूर्व आहेत. या वर्षांमध्ये देशाने अनेक दशकांच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या, देश प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे. आज देश निराशेच्या अंधारातून बाहेर येऊन श्रद्धेच्या प्रकाशात तिरंगा झेंडा फडकवत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील दाहोद येथे 24,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण
May 26th, 11:40 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील दाहोद येथे 24,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले. उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, 26 मे या दिवसाला विशेष महत्व आहे कारण 2014 मध्ये आजच्याच दिवशी त्यांनी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. देशाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवणाऱ्या गुजरातच्या जनतेच्या अढळ पाठिंब्याचा आणि आशीर्वादाचा त्यांनी उल्लेख केला. या विश्वासाने आणि प्रोत्साहनाने देशाची दिवसरात्र सेवा करण्याप्रति त्यांच्या समर्पणाला बळ दिले आहे असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. गेल्या काही वर्षांमध्ये भारताने असे काही निर्णय घेतले आहेत जे अभूतपूर्व आणि अकल्पनीय होते, दशकांच्या जुन्या बंधनांमधून मुक्त होत आज देश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. आज, देश निराशेच्या आणि अंधाराच्या युगातून आत्मविश्वास आणि आशावादाच्या नवीन युगात उदयाला आला आहे, असे ते म्हणाले.अंतराळ संशोधनावरील (स्पेस एक्सप्लोरेशन) जागतिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे केलेले संबोधन
May 07th, 12:00 pm
ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन कॉन्फरन्स (अंतराळ संशोधन परिषद) 2025 मध्ये आपल्या सर्वांबरोबर सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे. अंतराळ हा केवळ एक टप्पा नसून, जिज्ञासा, साहस आणि सामूहिक प्रगतीची घोषणा आहे. भारताचा अंतराळ प्रवास याच भावनेचे प्रतिबिंब आहे. 1963 मध्ये एक छोटे रॉकेट प्रक्षेपित करण्यापासून ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिला देश ठरण्यापर्यंतचा आमचा प्रवास उल्लेखनीय आहे. आमची रॉकेट केवळ पेलोडच नव्हे तर एक अब्ज चाळीस कोटी भारतीयांची स्वप्ने सोबत घेऊन जातात. भारताची कामगिरी हे एक महत्वाचे वैज्ञानिक यश आहे. शिवाय मानवी आकांक्षा गुरुत्वाकर्षणाचा प्रतिरोध करू शकते, याचा हा पुरावा आहे. भारताने 2014 मध्ये पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचून इतिहास रचला होता. चांद्रयान-1 ने चंद्रावर पाण्याचा शोध घेण्यासाठी सहाय्य केले. चांद्रयान-2 ने आपल्याला चंद्राची सर्वाधिक रिझोल्यूशनची (स्पष्ट) छायाचित्र पाठवली. चांद्रयान -3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाबाबत आपल्याला अधिक माहिती पुरवली. आम्ही विक्रमी वेळेत क्रायोजेनिक इंजिन तयार केले. आम्ही एकाच मोहिमेत 100 उपग्रह प्रक्षेपित केले. आम्ही आमच्या प्रक्षेपण वाहनां द्वारे 34 देशांचे 400 हून अधिक उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. यावर्षी आम्ही दोन उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले, जे एक मोठे पाऊल आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक अंतराळ संशोधन परिषद (GLEX) 2025 ला केले संबोधित
May 07th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जागतिक अंतराळ संशोधन परिषद (GLEX) 2025 ला संबोधित केले. जगभरातील प्रतिष्ठित प्रतिनिधी, वैज्ञानिक आणि अंतराळवीरांचे त्यांनी स्वागत केले. GLEX 2025 मध्ये त्यांनी भारताचा उल्लेखनीय अंतराळ प्रवास अधोरेखित केला. ते म्हणाले की, अंतराळ हे केवळ एक गंतव्यस्थान नाही तर कुतूहल, धैर्य आणि सामूहिक प्रगतीची घोषणा आहे.केरळमध्ये तिरुवनंतपुरम येथे विझिंजम आंतरराष्ट्रीय सागरी बंदराच्या लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 02nd, 02:06 pm
आज भगवान आदि शंकराचार्य जी यांची जयंती आहे. तीन वर्षांपूर्वी सप्टेंबर महिन्यात आदि शंकराचार्य यांच्या जन्मभूमीला भेट देण्याचे सद्भाग्य मला लाभले होते. काशी या माझ्या लोकसभा मतदारसंघात विश्वनाथ धाम परिसरात आदि शंकराचार्य जी यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे याचा मला आनंद आहे. उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे आदि शंकराचार्य यांच्या दिव्य पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य देखील मला लाभले आहे. आणि आजच देवभूमी उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराचे द्वार दर्शनासाठी उघडले आहे, केरळमधून बाहेर पडून देशाच्या विविध कानाकोपऱ्यात मठांची स्थापना करून आदि शंकराचार्य जी यांनी राष्ट्रीय चैतन्याची जाणीव जागृत केली. या पवित्र प्रसंगी मी त्यांना श्रद्धापूर्वक वंदन करतो.केरळमध्ये 8,800 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या विझिंजम आंतरराष्ट्रीय सागरी बंदराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
May 02nd, 01:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमध्ये तिरुवनंतपुरम येथे 8,800 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या विझिंजम खोल पाण्यातील आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय सागरी बंदराचे लोकार्पण केले. भगवान आदि शंकराचार्य यांच्या जयंतीदिनाच्या मंगल प्रसंगी कार्यक्रमासाठी जमलेल्या उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी तीन वर्षांपूर्वी सप्टेंबर महिन्यात आदि शंकराचार्य यांच्या वंदनीय जन्मस्थानाला भेट देण्याचा सन्मान प्राप्त झाल्याची आठवण सांगितली. काशी या पंतप्रधानांच्या लोकसभा मतदारसंघात आदि शंकराचार्य यांचा भव्य पुतळा उभारण्यात आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. हा पुतळा म्हणजे आदि शंकराचार्य यांची प्रचंड अध्यात्मिक विद्वत्ता आणि शिकवण यांच्याप्रती आदरांजली प्रतीक आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आपल्याला उत्तराखंडातील पवित्र केदारनाथ धाम येथे आदि शंकराचार्य यांच्या दिव्य पुतळ्याचे अनावरण करण्याचा सन्मान देखील प्राप्त झाला आहे. केदारनाथ मंदिराची कवाडे आज भाविकांसाठी खुली झाल्यामुळे, आजच्या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. मुळचे केरळचे असलेल्या आदि शंकराचार्य यांनी देशाच्या विविध कानाकोपऱ्यात मठांची स्थापना करून राष्ट्रीय चैतन्याची जाणीव जागृत केली, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. आदि शंकराचार्य यांच्या प्रयत्नांनी एकसंघ आणि अध्यात्मिकदृष्ट्या जागृत भारताच्या उभारणीचा पाया रचला यावर पंतप्रधानांनी अधिक भर दिला.पंतप्रधानांनी भूषवले 46 व्या प्रगती बैठकीचे अध्यक्षपद
April 30th, 08:41 pm
सक्रीय प्रशासन आणि तत्पर अंमलबजावणीसाठी आयसीटी-आधारित प्रगती या केंद्र आणि राज्य सरकारांचा समावेश असलेल्या मल्टी- मोडल मंचाच्या 46 व्या बैठकीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी अध्यक्षस्थान भूषवले.इंडिया स्टील 2025 कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण
April 24th, 02:00 pm
आज आणि पुढील दोन दिवस, आपण भारताच्या सनराईज सेक्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलाद क्षेत्राच्या सामर्थ्य आणि संधींवर सविस्तर चर्चा करणार आहोत. हे एक असे क्षेत्र आहे, जे भारताच्या प्रगतीचा आधार आहे, विकसित भारताचा मजबूत पाया आहे, आणि जो भारतात मोठा बदल घडवून आणणाऱ्या नव्या युगाची गाथा लिहीत आहे. मी इंडिया स्टील 2025 मध्ये आपले मन:पूर्वक स्वागत करतो. मला विश्वास आहे की हा कार्यक्रम नव्या कल्पनांची देवाणघेवाण, नव्या भागीदारींची निर्मिती आणि नवप्रवर्तनाला चालना देणाऱ्या एका नव्या प्लॅटफॉर्मची भूमिका पार पाडेल. पोलादक्षेत्रात एका नव्या पर्वाची ही सुरुवात ठरेल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी इंडिया स्टील 2025 या कार्यक्रमाला केले संबोधित
April 24th, 01:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत झालेल्या इंडिया स्टील 2025 या कार्यक्रमाला व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुढचे दोन दिवस भारताच्या उदयोन्मुख क्षेत्राची - स्टील अर्थात पोलाद उद्योग क्षेत्राची क्षमता आणि संधी यावर चर्चा होणार असल्याचे ते म्हणाले. हे क्षेत्र भारताच्या प्रगतीचा पाया आहे, हे क्षेत्र विकसित भारताचा पाया मजबूत करणारे क्षेत्र आहे, तसेच हे क्षेत्र देशाच्या परिवर्तनाचा नवा अध्याय लिहीत आहे, असे ते म्हणाले. आपल्या संबोधनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया स्टील 2025 या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांचे स्वागत केले. हा कार्यक्रम परस्परांसोबत नवीन कल्पना सामायिक करण्यासाठी, नवीन भागीदाऱ्या स्थापित करण्यासाठी तसेच नवोन्मेषाला चालना देण्यासाठीचे व्यासपीठ म्हणून कामी येईल असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. हा कार्यक्रम पोलाद उद्योग क्षेत्राच्या विकासाच्या नव्या अध्यायाशी संबंधित पाया रचेल असे ते म्हणाले.भारतीय रेल्वेच्या महाराष्ट्र, ओदिशा आणि छत्तीसगड या तीन राज्यांमधील 15 जिल्ह्यांना व्यापणाऱ्या चार मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
April 04th, 03:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने रेल्वे मंत्रालयाच्या चार प्रकल्पांना मंजुरी दिली आहे ज्यांचा एकूण खर्च 18,658 कोटी रुपये (अंदाजे) आहे. महाराष्ट्र, ओदिशा आणि छत्तीसगड या तीन राज्यांमधील 15 जिल्ह्यांना व्यापणाऱ्या या चार प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेचे विद्यमान जाळे सुमारे 1247 किलोमीटरने वाढेल.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरच्या चर्चेला पंतप्रधानांनी राज्यसभेत दिलेले उत्तर
February 06th, 04:21 pm
आदरणीय राष्ट्रपती जी यांनी भारताच्या कामगिरीविषयी,जगाच्या भारताकडून असलेल्या अपेक्षांविषयी आणि भारताच्या जनसामान्यांचा आत्मविश्वास, विकसित भारत हा संकल्प या सर्व विषयांवर विस्तृत चर्चा केली आहे आणि देशाला आगेकूच करण्यासाठी दिशाही दाखवली आहे. आदरणीय राष्ट्रपती जी यांचे भाषण प्रेरकही होते, प्रभावीही होते आणि भविष्यासाठी काम करण्याकरिता आम्हा सर्वांसाठी मार्गदर्शन करणारेही होते. आदरणीय राष्ट्रपती जी यांच्या संबोधनासाठी धन्यवाद देण्याकरिता मी उपस्थित आहे.Prime Minister Shri Narendra Modi’s reply to the Motion of Thanks on the President’s Address in Rajya Sabha
February 06th, 04:00 pm
PM Modi, replying to the Motion of Thanks on the President’s Address in Rajya Sabha, highlighted India’s development journey under his government since 2014. He emphasized Sabka Saath, Sabka Vikas as the guiding principle, focusing on inclusive growth, SC/ST/OBC empowerment, Nari Shakti, and economic self-reliance through initiatives like MUDRA and PM Vishwakarma Yojana.विविध रेल्वे प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणी प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण.
January 06th, 01:00 pm
तेलंगणाचे राज्यपाल श्रीमान जिष्णु देव वर्मा जी, ओदिशाचे राज्यपाल श्री हरि बाबू जी, जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा जी, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री श्रीमान उमर अब्दुल्ला जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री श्रीमान रेवंत रेड्डी जी, ओदिशाचे मुख्यमंत्री श्रीमान मोहन चरण मांझी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहयोगी अश्विनी वैष्णव जी, जी किशन रेड्डी जी, डॉ. जीतेंद्र सिंह जी, व्ही. सोमैया जी, रवनीत सिंह बिट्टू जी, बंडी संजय कुमार जी, अन्य मंत्रीगण, संसद सदस्य, आमदार, अन्य महानुभाव तसेच बंधू आणि भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
January 06th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. पंतप्रधानांनी नवीन जम्मू रेल्वे डिव्हीजनचे उद्घाटन केले. त्यांनी ईस्ट कोस्ट रेल्वेच्या रायगडा रेल्वे डिव्हीजनच्या इमारतीची पायाभरणी केली आणि तेलंगणातील चारलापल्ली नवीन टर्मिनल स्थानकाचे उद्घाटन केले.India - Sri Lanka Joint Statement: Fostering Partnerships for a Shared Future
December 16th, 03:26 pm
Prime Minister of India His Excellency Shri Narendra Modi and President of Sri Lanka His Excellency Anura Kumara Dissanayake had comprehensive and fruitful discussions at their meeting in New Delhi on 16 December 2024, during the latter’s State Visit to the Republic of India.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत प्रमुख सचिवांची चौथी राष्ट्रीय परिषद संपन्न
December 15th, 10:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत मुख्य सचिवांच्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित केले. ही तीन दिवसीय परिषद 13 ते 15 डिसेंबर 2024 या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.भारतीय रेल्वेच्या तीन ‘मल्टीट्रॅकिंग’ प्रकल्पांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी : संपर्क यंत्रणा प्रदान करणे , प्रवास सुलभ करणे,वाहतूक खर्च कमी करणे, तेल आयात कमी करणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे उद्दिष्ट्य
November 25th, 08:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीची आज बैठक झाली. यामध्ये रेल्वे मंत्रालयाच्या एकूण अंदाजे 7,927 कोटी रूपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.केंद्रीय मंत्रिमंडळाने 6,798 कोटी रुपये अंदाजे खर्चाच्या दोन रेल्वे प्रकल्पांना दिली मंजुरी
October 24th, 03:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने रेल्वे मंत्रालयाच्या एकूण 6,798 कोटी रुपये (अंदाजे) खर्चाच्या दोन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.