मेघालयमध्ये शिलाँग येथे विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 18th, 04:22 pm
खुबलेइ शिबोन! (खासी आणि जयंतिया मध्ये नमस्ते) नमेंग अमा! (गारो मध्ये नमस्ते) मेघालय, निसर्ग आणि संस्कृतीने समृद्ध प्रदेश आहे. ही समृद्धी आपल्या स्वागत-सत्कारामधूनही झळकते. आज पुन्हा एकदा मेघालय च्या विकासाच्या उत्सवात सहभागी होण्याचं भाग्य मला लाभलं आहे. मेघालयच्या माझ्या सर्व बंधू-भगिनींचं, कनेक्टिव्हिटी, शिक्षण, कौशल्य आणि रोजगाराच्या डझनभर योजनांसाठी खूप-खूप अभिनंदन.मेघालयची राजधानी, शिलॉंग येथे पंतप्रधानांच्या हस्ते, 2450 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाचे विविध विकास प्रकल्पांचे राष्ट्रार्पण, उद्घाटन आणि पायाभरणी
December 18th, 11:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेघालयची राजधानी शिलौंग इथे, 2450 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे राष्ट्रार्पण, उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्याआधी, पंतप्रधानांनी शिलॉंग येथे नॉर्थ ईस्टर्न परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त झालेल्या बैठकीत मार्गदर्शन केले. शिलॉंग इथे, राज्य संमेलन केंद्रात झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले होते.आसाममध्ये कर्करोग रुग्णालयांची पायाभरणी आणि लोकार्पण करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन
April 28th, 02:30 pm
आसामचे राज्यपाल जगदीश मुखी जी, आसामचे लोकप्रिय आणि उत्साही मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे वरिष्ठ सहकारी सर्बानंद सोनोवाल जी, श्री रामेश्वर तेली जी,देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारे रतन टाटा जी, आसाम सरकारमधील मंत्री, केशब महंता जी, अजंता निओग जी, अतुल बोरा जी आणि या धरतीचे सुपुत्र आणि भारताच्या न्याय जगतात, ज्यांनी सर्वोत्तम सेवा दिली आणि आज आम्हाला कायदे बनवण्याच्या प्रक्रियेत सहकार्य करणारे रंजन गोगोई जी. खासदार, आमदार आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!पंतप्रधानांच्या हस्ते आसाममधल्या सात कर्करोग रुग्णालयांचे लोकार्पण आणि आसाममधील आणखी नव्या सात कर्करोग रुग्णालयांची पायाभरणी
April 28th, 02:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसामच्या डिब्रूगढ़ इथल्या कार्यक्रमात, सहा कर्करोग रुग्णालयांचे लोकार्पण केले. ही रुग्णालये, डिब्रूगढ़, कोकराझार, बारपेटा, दारांग, तेजपूर, लखीमपूर आणि जोरहट इथे बांधण्यात आली आहेत. डिब्रूगढ़ इथल्या आणखी एका रुग्णालयाचे लोकार्पण पंतप्रधानांनी सकाळी केले, आणि त्यावेळी त्यांनी रुग्णालय परिसराला देखील भेट दिली. त्याशिवाय, आणखी सात कर्करोग रुग्णालयाची पायाभरणी देखील त्यांच्या हस्ते झाली. यात, धुबरी, नालबारी, गोलपारा, नागाव, सिवसागर, तीनसुखिया आणि गोलाघाट इथे, दोन टप्प्यात बांधली जाणार आहेत. आसामचे राज्यपाल, जगदीश मुखी, मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा, केंद्रीय मंत्री सर्वांनंद सोनोवाल, रामेश्वर तेली, माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभा सदस्य रंजन गोगोई, आणि सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा देखील उपस्थित होते.