'मन की बात'चे श्रोते हेच या कार्यक्रमाचे खरे आधारस्तंभ: पंतप्रधान मोदी

September 29th, 11:30 am

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा एकत्र येण्याची संधी मिळाली आहे. आजचा हा भाग मला भावूक करणारा आहे, अनेक जुन्या आठवणी माझ्याभोवती रुंजी घालत आहेत याचं कारण असं की आपल्या या ‘मन की बात’ च्या प्रवासाला आता 10 वर्षे पूर्ण होत आहेत.दहा वर्षांपूर्वी 3 ऑक्टोबर रोजी, विजयादशमीच्या दिवशी ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. आणि पवित्र योगायोग असा की या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी ‘मन की बात’ ला 10 वर्षे पूर्ण होतील तेव्हा नवरात्रीचा पहिला दिवस असेल. ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या वाटचालीत असे अनेक प्रसंग आले आहेत ज्यांना मी कधीच विसरू शकत नाही. ‘मन की बात’ कार्यक्रमाचे कोट्यवधी श्रोते, आपल्या या प्रवासातील असे सहकारी आहेत ज्यांचा सहयोग मला निरंतर लाभत राहिला आहे. देशाच्या काना-कोपऱ्यातून त्यांनी मला माहिती उपलब्ध करून दिली. ‘मन की बात’चे श्रोतेच या कार्यक्रमाचे खरे सूत्रधार आहेत. सहसा असं मानलं जातं की जोपर्यंत एखाद्या कार्यक्रमात चटपटीत बाबींची चर्चा नसेल किंवा काही नकारात्मक बाबी समाविष्ट नसतील तर अशा कार्यक्रमाकडे श्रोते फारसे लक्ष देत नाहीत. पण ‘मन की बात’ या कार्यक्रमाने हे सिध्द करून दाखवले आहे की देशातील लोकांना सकारात्मक माहितीची किती ओढ आहे. सकारात्मक विचार, प्रेरणात्मक उदाहरणे, धैर्य वाढवणाऱ्या कहाण्या लोकांना फारच आवडतात. ‘चकोर’ नावाच्या पक्षाबद्दल असं म्हटलं जातं की तो पक्षी फक्त आकाशातून पडणारे पावसाचे थेंबच पितो. ‘मन की बात’ या कार्यक्रमात आपण पाहिलं की लोक देखील तशाच प्रकारे, चकोर पक्ष्याप्रमाणेच देशाची कामगिरी इतरांच्या सामुहिक यशोगाथा अत्यंत अभिमानाने ऐकतात. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 10 वर्षांच्या वाटचालीने एक अशी श्रुंखला तयार केली आहे ज्याच्या प्रत्येक भागात नव्या कहाण्या, नव्या सफलतेच्या गाथा आणि नवी व्यक्तिमत्वे यांची ओळख होते.आपल्या समाजात सामुदायिकतेच्या भावनेने जे जे कार्य केलं जात आहे त्या कार्याचा ‘मन की बात’ मध्ये गौरव केला जातो. जेव्हा मी ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी आलेली लोकांची पत्रे वाचतो तेव्हा माझं मन देखील अभिमानाने फुलून येतं. आपल्या देशात कितीतरी प्रतिभावंत आहेत आणि त्यांच्यामध्ये देश आणि समाजाची सेवा करण्याची उत्कट इच्छा आहे. असे लोक निःस्वार्थ भावनेनं सेवा करण्यात स्वतःचं संपूर्ण जीवन समर्पित करतात. अशा लोकांचं कार्य जाणून घेतल्यानंतर माझ्यात देखील उर्जेचा संचार होतो. ‘मन की बात’ ची ही संपूर्ण प्रक्रिया माझ्यासाठी एखाद्या मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेण्याप्रमाणे आहे. ‘मन की बात’ मधील प्रत्येक विषय, प्रत्येक घटना आणि प्रत्येक पत्राची मी आठवण काढतो तेव्हा असं वाटतं की माझ्यासाठी देवाचं रूप असलेली ही सर्वसामान्य जनता, तिचं जणूकाही दर्शन मी घेत आहे.

The holistic fusion of carbon credits with social responsibility will serve as the new philosophy of Green Credit: PM Modi

December 01st, 07:22 pm

Addressing a high-level event on 'Green Credit Programme', PM Modi said The holistic fusion of carbon credits with social responsibility will serve as the new philosophy of Green Credit. He added that in the health card of planet Earth there is an addition of some positive points and this will be reinforced through the Green Credit initiative.

गृह मंत्रालयाची वृक्षारोपण मोहीम पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनाच्या दिशेने सर्वांना प्रेरित करेल : पंतप्रधान

August 19th, 11:19 am

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका ट्विट संदेशात माहिती दिली की, गृह मंत्रालयाच्या 'अखिल भारतीय वृक्षारोपण मोहिमे' अंतर्गत, 4 कोटी रोपे लावण्यात आली आहेत. पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारी ही मोहीम राबवल्याबद्दल शाह यांनी सर्व केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांचे अभिनंदन केले .

Despite hostilities of TMC in Panchayat polls, BJP West Bengal Karyakartas doing exceptional work: PM Modi

August 12th, 11:00 am

Addressing the Kshetriya Panchayati Raj Parishad in West Bengal via video conference, Prime Minister Narendra Modi remarked that the no-confidence motion tabled by the Opposition against the NDA government was defeated in the Lok Sabha. “The situation was such that the people of the opposition left the house in the middle of the discussion and ran away. The truth is that they were scared of voting on the no-confidence motion,” he said.

PM Modi addresses at Kshetriya Panchayati Raj Parishad in West Bengal via VC

August 12th, 10:32 am

Addressing the Kshetriya Panchayati Raj Parishad in West Bengal via video conference, Prime Minister Narendra Modi remarked that the no-confidence motion tabled by the Opposition against the NDA government was defeated in the Lok Sabha. “The situation was such that the people of the opposition left the house in the middle of the discussion and ran away. The truth is that they were scared of voting on the no-confidence motion,” he said.

अंमली पदार्थांच्या सेवनाविरुद्धच्या मोहिमेतील तरुणांचा वाढता सहभाग अतिशय उत्साहवर्धक: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

July 30th, 11:30 am

माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’मध्ये तुम्हां सर्वांचे खूप खूप स्वागत.जुलै महिना म्हणचे मान्सूनचा महिना, पावसाचा महिना. नैसर्गिक आपत्तींमुळे गेले काही दिवस चिंता आणि त्रासाने भरलेले होते.यमुनेसहअनेक नद्यांना आलेल्या पुरामुळे बऱ्याच भागांमधल्या लोकांना त्रास झाला. डोंगराळ भागात भूस्खलन होण्याच्या घटना देखील घडल्या. याच दरम्यान, काही काळापूर्वी देशाच्या पश्चिम भागात, पूर्व गुजरातच्या काही क्षेत्रामध्ये बिपरजॉय चक्रीवादळ देखील आले. पण मित्रांनो, या संकटांच्या काळात पुन्हा एकदा आपण सर्व देशवासीयांनी दाखवून दिले की, सामुहिक प्रयत्नांमध्ये किती शक्ती असते. स्थानिक लोकांनी, आपल्या एनडीआरएफच्या जवानांनी, स्थानिक प्रशासनात कार्यरत लोकांनी रात्रंदिवस झगडून अशा संकटांचा सामना केला आहे. कोणत्याही संकटातून बाहेत पडण्यासाठी आपले सामर्थ्य आणि साधनसंपत्ती यांची भूमिका फार मोठी असते – मात्र त्याबरोबरच आपली संवेदनशीलता आणि एकमेकांचा हात धरुन ठेवण्याची भावना देखील तितकीच महत्त्वाची असते. ‘सर्वजन हिताय’ ची हीच भावना भारताची ओळख देखील आहे आणि भारताची शक्ती देखील आहे.

केंद्रीय राखीव पोलीस दल जवानांच्या वृक्षारोपण मोहिमेची पंतप्रधानांकडून प्रशंसा

October 29th, 10:30 pm

सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दल जवानांच्या वृक्षारोपण मोहिमेचे पंतप्रधानांनी प्रशंसा केली आहे. या मोहिमेअंतर्गत विश्वनाथ धाम आणि ज्ञानवापीच्या सुरक्षेसाठी तैनात सीआरपीएफच्या तुकडीने 75,000झाडे लावली आहेत. हे प्रयत्न संपूर्ण देशासाठी एक उदाहरण असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

आपले युवक प्रत्येक क्षेत्रात देशाला बहुमान मिळवून देत आहेत: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

July 31st, 11:30 am

31 जुलै म्हणजे आजच्याच दिवशी, आपण सर्व देशबांधव, शाहिद उधम सिंह जी यांच्या हौताम्याला वंदन करतो. मी अशा इतर सर्व महान क्रांतिकारकांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, ज्यांनी देशासाठी आपले सर्वस्व वाहिले आहे.

पी एस एल व्ही सी-52 अभियानाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांकडून भारतीय अंतराळशास्त्रज्ञांचे अभिनंदन

February 14th, 10:39 am

पी एस एल व्ही सी-52 अभियानाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळशास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या कबरीला भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली

March 27th, 01:16 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या बांग्लादेशच्या दोन दिवसीय दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तुंगीपाडा येथे बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या कबरीला भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली. कोणत्याही राष्ट्रप्रमुखांनी किंवा राज्यप्रमुखांनी किंवा शासनप्रमुखांनी बंगबंधूंच्या या समाधीस्थळाच्या वास्तूला भेट देणे हे प्रथमच घडले आहे, ही अशी पहिलीची भेट नोंदविली गेली आहे. ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बकुळीच्या झाडाचे रोपे याठिकाणी लावले. यावेळी त्यांच्याबरोबर बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना त्यांच्या भगिनी शेख रेहाना यांच्यासह उपस्थित होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 28 फेब्रुवारी 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन

February 28th, 11:00 am

During Mann Ki Baat, PM Modi, while highlighting the innovative spirit among the country's youth to become self-reliant, said, Aatmanirbhar Bharat has become a national spirit. PM Modi praised efforts of inpiduals from across the country for their innovations, plantation and biopersity conservation in Assam. He also shared a unique sports commentary in Sanskrit.

नवी दिल्लीत वाणिज्य भवनाच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन

June 22nd, 11:47 am

मंत्रिमंडळातले माझे सहकारी, वाणिज्य आणि उद्योग मंत्री, सुरेश प्रभू, गृहनिर्माण आणि शहरी कार्य राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीप सिंह पुरी, वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सी.आर. चौधरी, वाणिज्य मंत्रालय आणि संबंधित विभागाचे अधिकारी आणि उपस्थित मान्यवर,

वाणिज्य भवनाच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांचे संबोधन

June 22nd, 11:40 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाच्या वाणिज्य भवन या नवीन कार्यालय संकुलाची पायाभरणी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन ‘मन की बात’ द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (27 मे 2018)

May 27th, 11:30 am

नमस्कार! ‘मन की बात’ च्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या समोर येण्याची संधी मिळाली आहे. आपल्याला चांगलंच आठवत असेल की गेल्या काही महिन्यांपासून नौसेनेतील सहा महिला अधिकाऱ्यांचे दल समुद्रप्रवास करीत होते. “नाविका सागर परिक्रमा”, हो…. मी त्यांच्या विषयी काही सांगू इच्छितो. भारताच्या या सहा सुकन्या, त्यांचा चमू, (two hundred and fifty four days) अडीचशेहून अधिक दिवस, INSV तारिणीवरुन पूर्ण जगभराची सागर परिक्रमा पूर्ण करून, 21 मे रोजी भारतात परत आला आणि संपूर्ण देशाने त्यांचे खूप उत्साहाने स्वागत केले. त्यांनी वेगवेगळे महासागर आणि कितीतरी समुद्रांतून प्रवास करत जवळपास बावीस हजार सागरी मैलांचे अंतर पार केले.

चेन्नईमध्ये कलैवनार अरंगम येथे अम्मा दुचाकी योजनेच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

February 24th, 06:03 pm

सेल्वी जयललीताजी यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरांजली अर्पण करतो आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. तुम्हा सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्या जिथे असतील, तिथे त्या फार आनंदात असतील अशी खात्री मला वाटते.

पंतप्रधानांनी हरिद्वारच्या उमिया धाम आश्रमाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थितांना केले मार्गदर्शन

October 05th, 10:01 am

सामाजिक सुधारणांचे प्रसार केंद्र म्हणून भारतात आध्यात्मिक संस्थांनी कार्य केले आहे. भारतात पर्यटनाची खूप प्राचीन संकल्पना आहे, त्याचबरोबर आध्यात्मिक परंपराही आहे. आज उद्‌घाटन करण्यात आलेल्या आश्रमाचा हरिद्वारला येणाऱ्या भाविकांना, यात्रेकरुनां चांगला लाभ होणार आहे, असे सांगून पंतप्रधान पुढे म्हणाले की, यात्रा हे आपल्या संस्कृतीचे अभिन्न अंग आहे. यात्रेमुळेच देशाच्या विविध भागातील चालीरिती, प्रथांचा परिचय आपल्याला होतो.

It is due of Sardar Patel's efforts that we are realising the dream of 'Ek Bharat, Shreshtha Bharat': PM Modi

September 17th, 12:26 pm

PM Modi today laid foundation stone for 'National Tribal Freedom Fighters' Museum in Gujarat's Dhaboi. Addressing a public meeting, PM Modi said, We remember our freedom fighters from the tribal communities who gave a strong fight to colonialism.

पंतप्रधानांनी सरदार सरोवर धरणाचे लोकार्पण केले आणि राष्ट्रीय आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाची पायाभरणी केली

September 17th, 12:25 pm

गुजरात मध्ये दबोई इथे पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाची पायाभरणी केली. एक जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की वसाहतवादाविरुद्ध लढा देणाऱ्या आमच्या आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांचे आम्हाला स्मरण आहे.

Social Media Corner 16 July 2017

July 16th, 07:40 pm

Your daily dose of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!

स्वामी अवधेशानंद आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान ह्यांनी पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीची प्रशंसा केली

May 15th, 04:08 pm

नर्मदा सेवा यात्रा समारोप समारंभात स्वामी अवधेशानंद आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान ह्यांनी पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीची प्रशंसा केली. मोदींच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या विकास कार्यामुळे देशाचे रूप पालटेल असे त्यांनी म्हटले.