पंतप्रधानांनी पी.टी. उषा यांची संसदेत घेतली भेट

July 20th, 03:58 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीटी उषा यांची संसदेत भेट घेतली आणि त्याबद्दल आनंद व्यक्त केला.

1975 मध्ये लावण्यात आलेली आणिबाणी लोकशाहीतील सर्वात काळोखी रात्र होती: मन की बात कार्यक्रमांत पंतप्रधान मोदी

June 25th, 12:21 pm

जून 1975 मध्ये लादण्यात आलेली आणिबाणी हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातला सर्वात वाईट काळ होता असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात सांगितलं. त्यावेळी लोकांचे अधिकार कसे काढून घेण्यात आले आणि हजारो लोकांना कसे तुरुंगात डांबण्यात आले हे त्यांनी विस्तारपूर्वक सांगितले. ते स्वच्छता, नुकताच झालेला आंतरराष्ट्रीय योग दिन, अंतराळ विज्ञान आणि खेळाच्या क्षेत्रात स्थायित्व याबद्दल देखील ते बोलले

किनलूर येथे ‘उषा स्कूल ऑफ अॅथलेटिक्सच्या’ सिंथेटिक ट्रॅकचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

June 15th, 06:39 pm

‘उषा स्कूल ऑफ अॅथलेटिक्सच्या’ उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी खेळाचे महत्व अधोरखित केले. ती म्हणाले की “sports शब्दाचा विस्तार केल्यास त्याचा अर्थ - एस म्हणजे स्कील अर्थात कौशल्ल्य, पी म्हणजे पर्सरव्हरंस अर्थात चिकाटी, ओ म्हणजे ऑप्टिमिझम अर्थात आशावाद, आर म्हणजे रेझीलियंस अर्थात लवचिकता, टी म्हणजे टेनॅसिटी अर्थात दृढता, एस म्हणजे स्टॅमिना अर्थात काम करण्याची शक्ती” पंतप्रधानांनी सांगितले की भारतात प्रतिभेची कमतरता नाही आणि योग्य प्रकारची संधी उपलब्ध करून देणे आणि प्रतिभांचे पोषण साधण्यासाठी पर्यावरणीय व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. आमच्या देशातल्या महिलांनी सर्व क्षेत्रांत विशेषतः क्रीडा क्षेत्रांत उत्तम कामगिरी करून देशाचा अभिमान वाढविला आहे., असेही ते म्हणाले.