पंतप्रधानांनी घेतली व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष आणि पक्ष सरचिटणीसांची भेट
September 24th, 12:27 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 सप्टेंबर 2024 रोजी न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र आम सभेत आयोजित 'भविष्यासाठी शिखर परिषदे'दरम्यान सोशालिस्ट रिपब्लिक ऑफ व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष आणि व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस टो लॅम यांची भेट घेतली.व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिंग चिंग यांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन (1ऑगस्ट 2024)
August 01st, 12:30 pm
पंतप्रधान फाम मिंग चिंग आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे मी भारतात हार्दिक स्वागत करतो. सर्व प्रथम, सर्व भारतीयांच्या वतीने मी, महासचिव न्युयेन फु चोंग यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करतो.व्हिएतनामच्या पंतप्रधानांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
May 20th, 12:07 pm
दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीमधील प्रगतीचा आढावा घेतला. उच्च स्तरीय आदानप्रदान करण्यावर आणि द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रातील बंध अधिक मजबूत करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा
July 10th, 01:08 pm
व्हिएतनामचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल मोदी यांनी फाम मिन्ह चिन्ह यांचे अभिनंदन केले. भारत-व्हिएतनाम यांच्यातील सर्वसमावेशक मुत्सद्दी भागीदारी पुढेही अशीच कायम राहून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती अधिक मजबूत होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.