वैश्विक पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक (PGII) आणि भारत-मध्य-पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (IMEC) साठी भागीदारी

September 09th, 09:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी 9 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे जी 20 शिखर परिषदेच्या निमित्ताने वैश्विक पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक (पीजीआयआय) आणि भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर (आयएमईसी) साठी भागीदारी या विषयावरील विशेष कार्यक्रमाचे सहअध्यक्षपद भूषविले.

पंतप्रधानांचे जागतिक पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीसाठी भागीदारी (PGII) आणि भारत-मध्य-पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरसाठी भागीदारी कार्यक्रमात निवेदन

September 09th, 09:27 pm

या विशेष सोहळ्यात तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. माझे मित्र बायडन यांच्यासह या कार्यक्रमाचे सहअध्यक्षपद भूषवताना मला अत्यंत आनंद होत आहे. आज आपण सर्वानी एक महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक करार संपन्न होताना पाहिले आहे. आगामी काळात हा करार भारत, पश्चिम आशिया आणि युरोप यांच्यात आर्थिक समानव्य साधण्याचे एक प्रभावी माध्यम बनेल. हा करार संपूर्ण विश्वात संपर्क आणि विकासाला एक शाश्वत दिशा प्रदान करेल.