India - Sri Lanka Joint Statement: Fostering Partnerships for a Shared Future

December 16th, 03:26 pm

Prime Minister of India His Excellency Shri Narendra Modi and President of Sri Lanka His Excellency Anura Kumara Dissanayake had comprehensive and fruitful discussions at their meeting in New Delhi on 16 December 2024, during the latter’s State Visit to the Republic of India.

श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले निवेदन

December 16th, 01:00 pm

अध्यक्ष दिसनायके यांचे मी भारतात अतिशय जिव्हाळ्याने स्वागत करतो. तुमच्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी तुम्ही भारताची निवड केली त्याबद्दल मला अतिशय आनंद झाला आहे. अध्यक्ष दिसनायके यांच्या भेटीमुळे आमच्या संबंधांमध्ये नव्या उर्जेचा आणि गतिशीलतेचा संचार झाला आहे. आमच्या भागीदारीमध्ये आम्ही भविष्यवेधी दृष्टीकोनाचा अंगिकार केला आहे. आमच्या आर्थिक भागीदारीत आम्ही गुंतवणूक-प्रणीत वृद्धीवर आणि संपर्कव्यवस्थेवर भर दिला आहे आणि भौतिक, डिजिटल आणि ऊर्जा कनेक्टिव्हिटी हे आमच्या भागीदारीचे प्रमुख स्तंभ असतील असा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांदरम्यान विद्युत ग्रीड कनेक्टिव्हिटी आणि बहु-उत्पादन पेट्रोलियम पाईपलाईन्स स्थापन करण्यासाठी आम्ही काम करू. सामपुर सौर ऊर्जा प्रकल्पाला गती दिली जाईल. त्याव्यतिरिक्त श्रीलंकेच्या ऊर्जा प्रकल्पांना एलएनजीचा पुरवठा केला जाईल. द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी दोन्ही बाजू ईटीसीए लागू करण्यासाठी पावले उचलतील.

भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात गुंतवणूकविषयक उच्च स्तरीय कृती दलाच्या पहिल्या बैठकीचे आयोजन

July 28th, 11:37 pm

भारत-सौदी अरेबियाच्या गुंतवणूकविषयक उच्चस्तरीय कृती दलाची पहिली बैठक, पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ.पी.के. मिश्रा आणि सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्री प्रिन्स अब्दुल अजीझ बिन सलमान बिन अब्दुल अजीझ अल सौद यांच्या सहअध्यक्षतेखाली आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाली.

गुजरातमध्ये अहमदाबाद येथील विकासकार्यांची पायाभरणी/उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

March 12th, 10:00 am

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रतजी, गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेलजी, संसदेतील माझे सहकारी आणि गुजरात प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सी.आर.पाटील आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमाशी जोडले गेलेले सर्व राज्यपाल, आदरणीय मुख्यमंत्रीगण, संसद सदस्य, आमदार, मंत्रीगण आणि मला माझ्यासमोर दिसत आहेत,ते 700 हून अधिक ठिकाणांहून तेथील खासदारांच्या नेतृत्वात, तेथील मंत्र्यांच्या नेतृत्वात लाखो लोक आज या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. कदाचित रेल्वेच्या इतिहासात एकाच वेळी भारताच्या कानाकोपऱ्यात इतका मोठा कार्यक्रम कधी झालेला नसेल. 100 वर्षांत पहिल्यांदाच असा कार्यक्रम होत असेल. या भव्य प्रमाणातील आयोजनासाठी मी रेल्वे विभागाचे देखील खूप खूप अभिनंदन करतो.

गुजरातमध्ये अहमदाबाद येथे पंतप्रधानांच्या हस्ते 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण

March 12th, 09:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये अहमदाबाद येथील समर्पित मालवाहतूक मार्गिकेच्या परिचालन नियंत्रण केंद्रात 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये रेल्वेच्या पायाभूत सुविधा, जोडणी सुविधा आणि पेट्रोकेमिकल्स या क्षेत्रांसह विविध क्षेत्रांतील प्रकल्पांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी आज 10 नव्या वंदे भारत रेल्वे गाड्यांच्या सेवेची देखील सुरुवात केली.

ओदिशात जाजपुर येथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

March 05th, 05:30 pm

ओदिशाचे राज्यपाल श्री. रघुवर दास जी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. नवीन पटनायक जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी धर्मेंद्र प्रधान जी, बिश्वेश्वर तुडू जी, इतर मान्यवर, आणि स्त्री-पुरुष सज्जनहो!

पंतप्रधानांच्या हस्ते ओदिशा मध्ये चांदीखोल येथे 19,600 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण

March 05th, 01:44 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशा मध्ये चांदीखोल येथे 19,600 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये तेल आणि वायू, रेल्वे, रस्ते, वाहतूक आणि महामार्ग तसेच अणुऊर्जा या क्षेत्रांशी संबधित कार्यांचा यात समावेश आहे.

तेलंगणात संगारेड्डी इथे विविध विकासकामांचा आरंभ करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

March 05th, 10:39 am

तेलंगणाच्या राज्यपाल तामिलीसै सौंदरराजन, केंद्रीय मंत्रीमंडळातील माझे साथीदार किशन रेड्डीजी, तेलंगणा सरकारातील मंत्री कोंडा सुरेखा जी, के वेंकट रेड्डीजी, संसदेतील माझे मित्र डॉक्टर के. लक्ष्मणजी अन्य सर्व मान्यवर, महिला आणि सज्जन हो!

तेलंगणातील संगारेड्डी येथे 6800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पंतप्रधानांनी केली पायाभरणी आणि राष्ट्रार्पण

March 05th, 10:38 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील संगारेड्डी येथे 6,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. या प्रकल्पांमध्ये रस्ते, रेल्वे, पेट्रोलियम, विमान वाहतूक आणि नैसर्गिक वायू यासारख्या प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे.

बिहारमधील बेगुसराय येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

March 02nd, 08:06 pm

बिहारचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकरजी, मुख्यमंत्री नितीश कुमारजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी गिरीराज सिंहजी, हरदीप सिंह पुरीजी, उपमुख्यमंत्री विजय सिन्हाजी, सम्राट चौधरीजी, व्यासपीठावर उपस्थित इतर सर्व मान्यवर आणि बेगूसराय मधून आलेल्या उत्साही माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील बेगुसराय येथे अनेक विकास प्रकल्पांचे केले लोकार्पण आणि पायाभरणी

March 02nd, 04:50 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील बेगुसराय येथे आज देशभरातील सुमारे 1.48 लाख कोटी रुपयांच्या तेल आणि वायू क्षेत्रातील प्रकल्पांची तसेच बिहारमधील 13,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 फेब्रुवारीला जम्मूला भेट देणार

February 19th, 08:55 am

साधारण सकाळी 11:30 वाजता जम्मू येथील मौलाना आझाद स्टेडियम येथे आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात, पंतप्रधानांच्या हस्ते 30,500 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण, उदघाटन आणि पायाभरणी होणार आहे. हे सर्व प्रकल्प आरोग्य, शिक्षण, रेल्वे, रस्ते, हवाई वाहतूक, पेट्रोलियम, नागरी पायाभूत सेवा आणि इतर अनेक क्षेत्रांशी संबंधित आहेत. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते जम्मू काश्मीर मधील नव्याने नियुक्त झालेल्या 1500 सरकारी कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत. 'विकसित भारत विकसित जम्मू' या कार्यक्रमाचा भाग म्हणून विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत.

ओदिशा मध्ये संबलपुर येथील विविध विकासकामांचे उद्घाटन तसेच पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

February 03rd, 02:10 pm

आज ओदिशाच्या विकासयात्रेतील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे.सुमारे 70 हजार कोटी रुपये खर्चाच्या या विकास प्रकल्पांबद्दल मी ओदिशाच्या लोकांचे खूप खूप अभिनंदन करतो. शिक्षण, रेल्वे, रस्ते, वीज, पेट्रोलियम या क्षेत्रांशी संबंधित अनेक प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे. या प्रकल्पांचा लाभ ओदिशा राज्यातील गरीब, श्रमिक, कर्मचारी, दुकानदार, व्यापारी, शेतकरी यांना म्हणजेच समाजाच्या प्रत्येक वर्गातील लोकांना होणार आहे. हे उपक्रम, ओदिशा राज्यात सोयीसुविधा निर्माण करण्यासोबतच येथील तरुणांसाठी रोजगाराच्या हजारो नव्या संधी देखील घेऊन येणार आहेत.

ओदिशा, संबलपूर इथे, पंतप्रधानांच्या हस्ते, 68,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन अणि लोकार्पण

February 03rd, 02:07 pm

देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ नेते लाल कृष्ण आडवाणी यंना भारत रत्न देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. माजी उपपंतप्रधान अडवाणी यांनी, गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री, तसेच दीर्घकाळ खासदार म्हणूनही देशासाठी अद्वितीय योगदान दिले आहे, असे मोदी म्हणाले.

कृष्णा गोदावरी खोऱ्यातील सखोल पाण्यातून तेल उत्खननाला सुरुवात झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून प्रशंसा

January 08th, 10:06 am

कृष्णा गोदावरी खोऱ्यातील (केजी-डीडब्ल्यूएन-98/2 ब्लॉक बंगालच्या उपसागर किनाऱ्याच्या भागात) सखोल पाण्यातून तेल उत्खननाला सुरुवात झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.

लक्षद्वीपच्या अगत्ती विमानतळावर सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 02nd, 04:45 pm

लक्षद्वीप अनेक संधींनी परिपूर्ण आहे. मात्र नौवहन ही येथील जीवनरेखा असली तरी स्वातंत्र्यानंतर बराच काळ लक्षद्वीपच्या पायाभूत सुविधांकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. परंतु येथील बंदराची पायाभूत सुविधाही कमकुवतच राहिली. शिक्षण असो, आरोग्य असो, अगदी पेट्रोल-डिझेलसाठीही खूप त्रास सहन करावा लागत होता. आमचे सरकार आता या सर्व आव्हानांना तोंड देत आहे. लक्षद्वीपची पहिली बंदरावरील मालवाहतुकीची मोठ्या प्रमाणावरील साठवण सुविधा कावरत्ती आणि मिनिकॉय बेटावर बांधण्यात आली आहे. आता येथे अनेक क्षेत्रांत रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत.

लक्षद्वीपच्या अगत्ती विमानतळावर पंतप्रधान मोदींनी सार्वजनिक कार्यक्रमाला केले संबोधित

January 02nd, 04:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपमधील अगत्ती विमानतळावर आगमन झाल्यानंतर लगेचच एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधान रात्री लक्षद्वीपमध्ये मुक्काम करणार आहेत.

वाराणसी, मधील विविध प्रकल्पांच्या उद्घाटन आणि लोकार्पण प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

December 18th, 02:16 pm

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, गुजरात विधानसभेचे अध्यक्ष आणि बनास डेयरीचे अध्यक्ष आणि आज विशेष रूपाने शेतकऱ्यांना भेट, उपहार देण्यासाठी आलेले शंकर भाई चौधरी, राज्याच्या मंत्रिमंडळातले सदस्य, आमदार, इतर मान्यवर आणि बनारसच्या माझ्या कुटुंबीयांनो…

पंतप्रधानांच्या हस्ते उत्तर प्रदेशात वाराणसी येथे 19,150 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचा कोनशीला समारंभ आणि लोकार्पण

December 18th, 02:15 pm

या प्रकल्पांमध्ये इतर अनेक रेल्वे प्रकल्पांसह 10,900 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नवीन पंडित दीनदयाळ उपाध्याय नगर- नवीन भौपूर समर्पित फ्रेट मार्गिका प्रकल्पाचा समावेश आहे. पंतप्रधानांनी नव्याने उद्घाटन झालेल्या फ्रेट मार्गिका येथे वाराणसी-नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस गाडी, डोहरीघाट-मऊ मेमू रेल्वे या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. त्यांनी बनारस लोकोमोटीव्ह वर्क्स येथे उत्पादित दहा हजाराव्या इंजिनाला देखील झेंडा दाखवून रवाना केले. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी, 370 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करून बांधण्यात आलेल्या शिवपूर-फुलवारिया-लहरतारा ग्रीन फिल्ड मार्ग तसेच दोन रेल्वे पुलांचे उद्घाटन देखील केले. पंतप्रधानांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलेल्या इतर महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये 20 रस्त्यांचे बळकटीकरण आणि विस्तारीकरण; कैथी गावातील संगम घाट रस्ता तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयाच्या निवासी इमारतीचे बांधकाम, पोलीस लाईन आणि भूल्लनपूर येथील पीएसी मध्ये दोनशे आणि दीडशे खाटांची क्षमता असलेल्या दोन बहुमजली बराक इमारती, 9 ठिकाणी बांधण्यात आलेले स्मार्ट बस निवारे आणि आलईपूर येथे उभारण्यात आलेले 132 किलोवॅट क्षमतेचे उपकेंद्र या प्रकल्पांचा समावेश आहे. याशिवाय, त्यांनी स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत एकात्मिक प्रवासी पास यंत्रणेची सुरुवात देखील केली.

PM Modi Addresses public meetings in Sagwara and Kotri, Rajasthan

November 22nd, 09:05 am

The electoral atmosphere intensified as PM Narendra Modi engaged in two spirited rallies in Sagwara and Kotri ahead of the Rajasthan assembly election. “This region has suffered greatly under Congress rule. The people of Dungarpur are well aware of how the misrule of the Congress has shattered the dreams of the youth,” PM Modi said while addressing the public rally.