आपल्या देशातील ऐक्य आणि बंधुत्वाच्या बंधनांचे सदैव रक्षण करण्याप्रती असलेल्या आमच्या कटिबद्धतेला आम्ही दुजोरा देत आहोत : पंतप्रधान नरेंद्र मोदी
August 14th, 09:51 am
देशाच्या फाळणीच्या काळात प्रभावित झालेल्या व्यक्तींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त, एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान मोदी यांनी फाळणीमुळे असंख्य लोकांवर झालेले भयंकर परिणाम आणि सहन कराव्या लागलेल्या वेदना यांचे स्मरण केले आहे.नुतनीकरण केलेल्या जालियनवाला बाग स्मारकाच्या लोकार्पणानंतर पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 28th, 08:48 pm
पंजाबचे राज्यपाल श्री व्ही पी सिंह बदनोरजी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंहजी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी श्री जी किशन रेड्डीजी, श्री अर्जुन राम मेघवालजी, श्री सोम प्रकाशजी, संसदेतले माझे सहकारी श्री श्वैत मलिकजी, कार्यक्रमात सहभागी सर्व आदरणीय मुख्यमंत्री महोदय, लोक-प्रतिनीधी, शहीदांचे कुटुंबिय, बंधू आणि भगिनींनो!नूतनीकरण केलेल्या जालियनवाला बाग स्मारक संकुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रार्पण
August 28th, 08:46 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे नूतनीकरण केलेलया जालियनवाला बाग स्मारक संकुलाचे राष्ट्रार्पण केले. या कार्यक्रमादरम्यान, त्यांनी स्मारकातील संग्रहालय दालनांचे उद्घाटनही केले. या कार्यक्रमात संकुलाच्या विकासासाठी सरकारने हाती घेतलेले अनेक विकास उपक्रम प्रदर्शित करण्यात आले. पंतप्रधानांनी पंजाबच्या शूर भूमीला आणि जालियनवाला बागच्या पवित्र मातीला वंदन केले. ज्यांच्यात पेटलेले स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग विझवण्यासाठी अभूतपूर्व अमानुषतेला सामोरे गेलेल्या भारतमातेच्या मुलांनाही त्यांनी सलाम केला.