ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल मनू भाकर आणि सरबजोत सिंह यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

July 30th, 01:38 pm

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील 10 मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल, भारतीय नेमबाज मनू भाकर आणि सरबजोत सिंह यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

'हर घर तिरंगा अभियान' तिरंग्याचे वैभव टिकवून ठेवणारा एक अनोखा उत्सव झाला आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

July 28th, 11:30 am

मित्रांनो, क्रीडाविश्वातील या ऑलिम्पिकपेक्षा वेगळे असलेले गणिताच्या जगातील ऑलिम्पिक काही दिवसांपूर्वीच पार पाडले. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड. या ऑलिम्पियाड मध्ये भारतातील विद्यार्थ्यांनी फार उत्तम कामगिरी करून दाखवली. या स्पर्धेत आपल्या भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी करत चार सुवर्णपदके आणि एक रौप्य पदक जिंकले आहे. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड या स्पर्धेत जगातील 100 हून अधिक देशांचे संघ सहभागी होतात आणि एकंदर पदकतालिकेचा विचार करता आपला संघ पहिल्या पाच सर्वोत्तम संघांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. या स्पर्धेत देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आहेत- पुण्याचा आदित्य वेंकट गणेश, पुण्याचाच सिद्धार्थ चोप्रा, दिल्लीचा अर्जुन गुप्ता, ग्रेटर नोईडाचा कणव तलवार, मुंबईचा ऋषील माथुर आणि गुवाहाटीचा आनंदो भादुरी.

Paris Olympics: PM extends best wishes for Indian Contingent

July 26th, 10:50 pm

The Prime Minister Shri Narendra Modi today extended warm wishes to the Indian contingent in the Paris Olympics.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियामध्ये भारतीय समुदायाला केलेले संबोधन

July 09th, 11:35 am

आपले हे प्रेम, आपला हा स्नेह,आपण सर्वांनी इथे येण्यासाठी वेळ काढला, आपणा सर्वांचा मी खूप- खूप आभारी आहे. मी एकटाच आलो नाही.माझ्यासमवेत खूप काही घेऊन आलो आहे. मी माझ्यासमवेत हिंदुस्तानच्या मातीचा गंध घेऊन आलो आहे. मी 140 कोटी देशवासीयांचे प्रेम माझ्यासोबत घेऊन आलो आहे.आपणा सर्वांसाठी त्यांच्या शुभेच्छा घेऊन आलो आहे आणि तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर भारतीय समुदायासमवेत माझा पहिला संवाद इथे मॉस्कोमध्ये आपणा समवेत होत आहे ही आनंदाची बाब आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियातील भारतीय समुदायाशी साधला संवाद

July 09th, 11:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मॉस्को येथे आयोजित एका कार्यक्रमात रशियातील भारतीय समुदायाशी संवाद साधला. भारतीय समुदायाने त्यांचे जल्लोषात हार्दिक स्वागत केले.

पॅरिस ऑलिंपिकच्या भारतीय चमूबरोबर पंतप्रधानांनी साधलेला संवाद

July 05th, 05:07 pm

सूत्रसंचालकः - परम आदरणीयपंतप्रधान जी, माननीय मंत्रीगण, डॉ पी.टी. उषा। आज आपले पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे सर्व खेळाडू तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आले आहेत. सरांनी मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. सुमारे 98 लोक ऑनलाईन जोडले गेले आहेत सर, कारण त्यांचे परदेशात प्रशिक्षण सुरू आहे, देशाच्या इतर केंद्रांमध्ये प्रशिक्षण सुरू आहे. आणि पुढच्या काही दिवसांत तुम्ही सर्व जण पॅरिसला रवाना व्हाल. मी सरांना विनंती करतो की कृपया त्यांनी सर्वांना मार्गदर्शन करावे, त्यांना प्रोत्साहित करावे.

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या भारतीय चमूशी पंतप्रधानांनी साधला संवाद

July 04th, 09:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या भारतीय चमूशी संवाद साधला.