कर्नाटकमध्ये हुबळी येथे 26व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 12th, 04:30 pm

कर्नाटकचे हे क्षेत्र आपली परंपरा, संस्कृती आणि ज्ञान यासाठी प्रसिद्ध आहे. येथील अनेक विभूतींना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या भागाने देशाला एकापेक्षा एक महान संगीतकार दिले आहेत. पंडित कुमार गंधर्व, पंडित बसवराज राजगुरु, पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आणि पंडिता गंगुबाई हनगल जींना मी आज हुबळीच्या भूमीवर येऊन नमन करत आपली श्रद्धांजली अर्पण करतो.

पंतप्रधानांच्या हस्ते कर्नाटकात हुबळी इथे 26 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्‌घाटन

January 12th, 04:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कर्नाटकात हुबळी इथं 26 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन झालं. स्वामी विवेकानंदाची जयंती म्हणून त्यांचे आदर्श, त्यांची शिकवण आणि देश उभारणीत त्यांचे योगदान याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 12 जानेवारी हा दिवस देशभर राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त आयोजित संमेलनाची संकल्पना, ‘विकसित युवा-विकसित भारत’ अशी असून, देशाच्या सर्व भागातील विविधांगी संस्कृती एका मंचावर आणून ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ हे तत्व अधिक बळकट करण्याचा या महोत्सवाचा उद्देश आहे.

पंडित भीमसेन जोशी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी केले त्यांचे स्मरण

February 04th, 07:57 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित भीमसेन जोशी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले आहे.

पंडित भीमसेन जोशी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली

February 04th, 05:14 pm

पंडित भीमसेन जोशी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.